2021 हे वर्ष फोल्डेबल स्मार्टफोन्सचं, ‘या’ कंपन्या भारतात दमदार स्मार्टफोन्स लाँच करणार

बजेट आणि मिड सेगमेंटमध्ये लीड केल्यानंतर शाओमी, ओप्पो, व्हिवो या कंपन्या लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करु शकतात.

2021 हे वर्ष फोल्डेबल स्मार्टफोन्सचं, 'या' कंपन्या भारतात दमदार स्मार्टफोन्स लाँच करणार
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 10:07 PM

मुंबई : जगभरात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEMs) आहेत ज्या सध्या ग्राहकांना फोल्डेबल स्मार्टफोन्स (Foldable Smartphones) देत आहेत. परंतु मार्केटची हवा आता बदलतेय. पुढील वर्षी हे चित्र बदलण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टन्टचे (DSCC) संस्थापक आणि सीईओ रॉस यंग यांनी एक ट्विट करुन माहिती दिली आहे की, पुढील वर्षी फोल्डेबल सेगमेंटमध्ये चार नवे खेळाडू दमदार फोल्डेबल स्मार्टफोन्ससह उतरणार आहेत. यामध्ये ओप्पो, व्हिवो, शाओमी आणि गुगल या कंपन्यांचा समावेश आहे. (2021 may be the year of foldable smartphones)

रॉस यंग म्हणाले की, ओप्पो, व्हिवो, शाओमी आणि गुगल या कंपन्या सध्या फोल्डेबल फोन बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. या कंपन्यांनी संपूर्ण फोकस उत्तमोत्तम फोल्डेबल फोन्स बनवण्याकडे वळवला आहे. दरम्यान, ओप्पो, व्हिवो, शाओमी आणि गुगल या कंपन्यांना आघाडीची स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगही जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सॅमसंग कंपनी लवकरच स्मार्टफोन्सचे नवे मॉडेल लाँच करणार आहे. ही सीरिज सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप या नावाने लाँच केली जाणार आहे.

9to5 गुगलच्या रिपोर्टनुसार गुगलने नुकतीच घोषणा केली आहे की, पिक्सल सध्या फोल्डेबल फोन बनवण्यावर काम करत आहे. या फोनचं कोडनेम पासपोर्ट असं असेल, असं सांगितलं जात आहे. हा फोनदेखील 2021 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. दरम्यान भारतातील आघाडीची स्मार्टफोन विक्रेती कंपनी शाओमीदेखील फोल्डेबल स्मार्टफोन बनवत आहे. कंपनीने क्लॅमशेल फोल्डेबल फोनवर काम सुरु केलं आहे. ZDNet कोरियानेही असाच एक रिपोर्ट जारी केला आहे, त्यात म्हटलं आहे की, शाओमी या चिनी स्मार्टफोन कंपनीने सॅमसंगच्या डिस्प्लेंची एम मोठी ऑर्डर दिली आहे.

व्हिवो सब ब्रँड iQoo च्या फोल्डेबल स्मार्टफोनचे फोटो गेल्या वर्षी लिक झाले होते. चिनी मायक्रोब्लॉगिंक वेबसाईट विबोवर याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. तचे ओप्पो या स्मार्टफोन कंपनीने हुवावे मेट X प्रमाणे डिझाईनवाल्या प्रोटोटाईपचा खुलासा केला आहे.

Xiaomi चा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन लाँचिंगच्या मार्गावर

बजेट आणि मिड सेगमेंटमध्ये (किफायतशीर आणि मध्यम किंमतीतले फोन) लीड केल्यानंतर शाओमी (Xiaomi) लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन (Foldable Smartphone) लाँच करु शकते. शाओमीने यापूर्वी MI Mix Alpha या स्मार्टफोनचा खुलासा केला होता. हा फोन फ्लेक्सिबल OLED डिस्लेप्रमाणे होता. परंतु कंपनीने हा फोन लाँच केला नाही. आता कंपनी फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

XDA च्या रिपोर्टनुसार शाओमी कंपनी सध्या फोल्डेबल डिव्हाईसवर काम करत आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या डिव्हाईसचं नाव ‘Cetus’ असू शकतं. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, नवीन फोल्डेबल स्मार्टफोन MIUI च्या अँड्रायड 11 वर काम करेल. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या फोनचा कॅमेरा, या फोनमध्ये तब्बल 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रगॅन 800 सिरीजचा प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो हाय एंड स्पेक्समध्ये गणला जातो. या फोन खूप महाग असणार आहे. कंपनीने पहिल्यांदाच फोल्डेबल फोनबाबत माहिती दिलेली नाही. यापूर्वीदेखील कंपनीने फोल्डेबल फोनचं डिझाईन लिक केलं होतं.

संबंधित बातम्या

Amazon Sale : अवघ्या 23 हजारात आयफोन, सेलमध्ये आयपॅड आणि मॅकबुकचाही समावेश

128 जीबी स्टोरेज आणि 6000mAh ची बॅटरी, किंमत अवघी 11,999, Moto चा दमदार फोन लाँच

(2021 may be the year of foldable smartphones)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.