Meta च्या मुल्यात 250 अब्ज डॉलर्सची घट, जाणून घ्या फेसबूकच्या अडचणी वाढण्याची कारणं

मेटाच्या (Meta - पूर्वी Facebook म्हणून ओळखले जाणारे) खराब कमाईनंतर त्यांच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मागील तिमाहीतील निराशाजनक निकालानंतर कंपनीचे शेअर 26.4 टक्क्यांनी घसरले आहेत.

Meta च्या मुल्यात 250 अब्ज डॉलर्सची घट, जाणून घ्या फेसबूकच्या अडचणी वाढण्याची कारणं
Mark Zuckerberg
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 12:16 PM

मुंबई : मेटाच्या (Meta – पूर्वी Facebook म्हणून ओळखले जाणारे) खराब कमाईनंतर त्यांच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मागील तिमाहीतील निराशाजनक निकालानंतर कंपनीचे शेअर 26.4 टक्क्यांनी घसरले आहेत. मेटाला झालेल्या विक्रमी दैनंदिन तोट्याचे एकूण मूल्यांकन करायचे झाल्यास कंपनीला जवळपास 230 अब्ज डॉलर्स (17.17 लाख कोटी रुपये) नुकसान झाले आहे. याशिवाय कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्गच्या (Mark Zuckerberg) एकूण संपत्तीत सुमारे 30 बिलियन डॉलर्सची घट झाली आहे. कंपनीने स्थापनेपासून गेल्या 18 वर्षांत पहिल्यांदाच दैनिक सक्रिय युजर्सच्या (daily active users) संख्येत घट पाहिली आहे. कोणत्याही कंपनीच्या मूल्यांकनातील एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. 4 फेब्रुवारी रोजी, मेटाचे शेअर्स 322 डॉलरवरून 237 डॉलरवर घसरले.

भारतीय दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड डेटाच्या किमतीत केलेल्या वाढीमुळे 2021 च्या चौथ्या तिमाहीत देशातील Facebook च्या एकूण वाढीवर परिणाम झाला आहे. कंपनीने याबाबत खुलासा केला आहे. नोव्हेंबरमध्ये, भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड टॅरिफ दर 25 टक्क्यांपर्यंत वाढवले. मेटाचे सीएफओ डेव्ह वेनर यांनी कंपनीच्या तिमाही अर्निंग (कमाई) कॉलमध्ये सांगितले की चौथ्या तिमाहीत फेसबुक युजर्सच्या वाढीवर काही हेडविंड्सचा परिणाम झाला.

मेटाच्या मालकीच्या व्हाट्सअॅपचे देशात 400 मिलियन युजर्स आहेत. पहिल्यांदाच, Facebook ने जागतिक स्तरावर डेली युजर्स गमावले आहेत, ज्याने अपेक्षेपेक्षा कमी जाहिरात वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे त्यांचा स्टॉक जवळपास 20 टक्क्यांनी घसरला आहे. मोठ्या प्रमाणात स्टॉक घसरल्याने त्यांचे बाजार मूल्य सुमारे 200 डॉलरने घटले आहे. कंपनीने पुष्टी केली की त्यांच्या इतिहासातील ही पहिली क्रमिक घट आहे.

फेसबुक कंपनी अडचणीत का आली?

  • यूजर ग्रोथ सॅचुरेशन लो पॉइंटवर आहे
  • Apple ची अॅप ट्रॅकिंग पारदर्शकता
  • टिकटॉकशी स्पर्धा
  • मेटाव्हर्सच्या विकासावर अधिक खर्च
  • Google चा ऑनलाइन जाहिरात शेअरमध्ये भाग
  • 6 नवीन राज्य कायदे

इतर बातम्या

सावधान | ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा…

7700 mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले, Motorola Moto Tab G70 बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.