देशात 29 वर्षांपूर्वी या दोन व्यक्तीत झाला पहिला मोबाईल संवाद, कोणत्या कंपनीचा होता हॅंडसेट?

First Mobile Call : भारत आज मोबाईल आणि टेलिकॉम इंडस्ट्रीजमध्ये सर्वात अव्वल स्थानी आहे. भारत ही मोबाईल हँडसेट आणि इंटरनेटच्या वापरातील मोठी बाजारपेठ आहे. भारताचा प्रवास 5G च नाही तर 6G कडे सुरू झाला आहे. भारतात पहिला मोबाईल कॉल 31 जुलै 1995 रोजी झाला होता.

देशात 29 वर्षांपूर्वी या दोन व्यक्तीत झाला पहिला मोबाईल संवाद, कोणत्या कंपनीचा होता हॅंडसेट?
पहिला मोबाईल कॉल
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 2:38 PM

देशात मोबाईल आणि हँडसेट इंडस्ट्रीज झपाट्याने फोफावत आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीजमध्ये सर्वात अव्वल स्थानी आहे. भारत ही मोबाईल हँडसेट आणि इंटरनेटच्या वापरातील मोठी बाजारपेठ आहे. भारताचा प्रवास 5G च नाही तर 6G कडे सुरू झाला आहे. भारतात पहिला मोबाईल कॉल 31 जुलै 1995 रोजी झाला होता. या दोन नेत्यांमध्ये देशातील पहिला वायरलेस संवाद झाला होता. त्यावेळी मोबाईल आणि इंटरनेट हा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग होईल असे कुणालाही वाटले नव्हते.

या दोन नेत्यांमध्ये झाला पहिला मोबाईल संवाद

देशातील पहिल्या वायरलेस कॉलने भारतीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानातील इतिहास बदलवून टाकला. 31 जुलै 1995 रोजी हा पहिला कॉल करण्यात आला होता. जगातील पहिला दोन मोठ्या नेत्यांमध्ये हा मोबाईल संवाद झाला होता. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू आणि त्यावेळीचे केंद्रीय दूरसंचार मंत्री सुख राम या दोन मोठ्या नेत्यांमध्ये हा संवाद झाला होता. ही देशातील पहिली ऐतिहासिक घटना होती.

हे सुद्धा वाचा

या हँडसेटचा झाला वापर

दिवंगत ज्योती बसू आणि सुख राम यांच्यात हा पहिला वायरलेस फोन कॉल करण्यात आला होता. हा फोन कॉल नोकिया हँडसेटवरून (Nokia Handset) करण्यात आला होता. भारताचा बी. के. मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या Telstra यांच्या एकत्रित Modi Telstra Network यांच्यामुळे हा पहिला कॉल यशस्वी झाला. तिथून पुढील वीस वर्षांत देशात मोबाईल आणि इंटरनेट क्षेत्रात मोठी पावलं टाकण्यात आली. तर त्यानंतर देशात या क्षेत्रात मोठा बदल झाला. कॉलनंतर इंटरनेटला, डेटा महत्त्व पूर्ण झाला.

किती आला होता खर्च

देशातील हा पहिला मोबाईल कॉल हा दोन शहरात झाला होता. कोलकत्ता आणि नवी दिल्ली या दोन शहरात हा मोबाईल कॉल करण्यात आला होता. त्यावेळी या दोन नेत्यांमधील संवादासाठी जवळपास प्रत्येक मिनिटाला 8.4 रुपयांचा खर्च आला होता. त्यात इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल विविध करांसह हा खर्च आला होता. यावेळी दोन्ही नेत्यांच्या या कॉलसाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येक मिनिटाला 16.8 रुपये खर्च आला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.