Internet : एकदम सुपरफास्ट, कित्येक तासांचे व्हिडिओ डाऊनलोड करा सेकंदात, पुन्हा इंटरनेट क्रांती
Internet : भारतात इंटरनेट क्रांती येऊ घातली आहे. 4G, 5G पर्यंतचा स्पीड अनेक भारतीय त्यांच्या मोबाईलमध्ये अनुभवत आहेत. आता त्यांना यापेक्षा अधिक गती मिळेल. भारतात नवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. कित्येक तासांचे व्हिडिओ अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करता येणार आहेत.
नवी दिल्ली : भारतात गेल्या काही वर्षांपासून टेलीकॉम क्षेत्रात (Telecom Sector) क्रांती आली आहे. एक फोटो डाऊनलोड होण्यासाठी काही मिनिटांची वाट पूर्वी पहावी लागत होती. पण आता तर मोबाईलमधील इंटरनेट (Internet) सूसाट आहे. 4G नंतर देशात 5G दाखल झाले आहे. हा स्पीड पण भारतीयांना कमी वाटत आहे. त्याच्या पुढे पाऊल टाकत भारतात अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊ घातले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे भारतीयांना कित्येक तासांचे व्हिडिओ अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करता येतील. 142 तासांचा कंटेट एका सेकंदात डाऊनलोड करता येईल. त्यामुळे इंटरनेट क्रांतीने भारतात काय बदल होतील. काय फायदा होईल, हे सध्या तरी कल्पने पलिकडे आहे.
इंटरनेट हायस्पीड भारतात टेलिकॉम टेक्नॉलॉजी आणि 6G सेवेचा विकास करण्यात येत आहे. एक दिवसापूर्वीच 3 जुलै रोजी भारत 6जी एलायन्सची (Bharat 6G Alliance) सुरुवात झाली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात युनियन टेलिकॉम आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी याचा श्रीगणेशा केला. गुजरातमध्ये येत्या महिनाभरात सेमीकंडक्टर चीप प्लँट सुरु होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
देशात डेटा कायदा देशात इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता, डेटा संरक्षण कायदा आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. हा कायदा तयार आहे. येत्या मान्सून सत्रात हा कायदा सर्वसंमतीने मंजूर होण्यासाठी संसदेसमोर ठेवण्यात येणार आहे. देशात 6G सेवेसाठी पायाभूत सुविधा उभ्या करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘भारत 6जी अलायन्स’ ची (B6GA) स्थापना करण्यात आली आहे.
लवकरच चाचणी देशात 6G नेटवर्क सुरु करण्यासाठी लवकरच चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘भारत 6जी अलायन्स’ ची (B6GA) स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था पुढील इंटरनेट क्रांतीची टेस्ट करणार आहे. ही संस्था स्थानिक उद्योग, शैक्षणिक संस्था, भारतीय संशोधन संस्था आणि केंद्र सरकाच्या अधिपत्याखालील काही संस्थांचे एक संघटन आहे. सरकार हा प्रकल्प सुरु करण्यासाठी इतर संस्थांना मदत करेल. भारत 6G नेटवर्कसाठी संशोधन आणि स्टार्टअप इकोसिस्टम विकसीत करण्यावर भर देत आहे.
कधीपर्यंत सुरु होणार 6G दोन टप्प्यात 6G सेवेसाठीची पायाभरणी करण्यात येईल. पहिला टप्पा 2023-2025 हा कालावधी तर दुसऱ्या टप्प्यात 2025 ते 2030 या काळात सेटअप पूर्ण करण्यात येईल. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, 6G तंत्रज्ञानावर आधारीत 200 अधिक पेटेंट भारताने मिळवले आहे. B6GA ही संस्था पुढील सात वर्षात 6G तंत्रज्ञान आणि उत्पादनात मोठे योगदान देणार आहे.
भारताची 5G मध्ये आघाडी भारत आज 5G मध्ये जगातील काही देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. देशात 5G च्या 2.70 लाख साइट तयार झाल्या आहेत. या क्षेत्रात भारताला अजून आघाडी घ्यायची आहे. ग्रामीण भागात अजून ही 5G सेवा पोहचली नाही. काही तालुक्याच्या ठिकाणी अद्यापही टू जीचा स्पीड मिळतो.
6G चा असा असेल स्पीड
- 6G चा इंटरनेट स्पीड 5G पेक्षा 100 पटीने अधिक असेल
- हा स्पीड जवळपास 100 गीगाबाईट प्रति सेकंद असेल
- 142 तासांचे कंटेट अवघ्या 1 सेकंदात डाऊनलोड होईल
- सध्या 5G चा उच्चतम स्पीड प्रति सेकंद 10 गीगाबाईट आहे
- तर 6G चा इंटरनेट स्पीड उच्च पातळीवर 1 टेरा बाईट असेल