5G services: 4जी पेक्षा 10 पट स्पीड, एक पिक्चर 20 सेकंदात डाऊनलोड; 6 दिवसांत स्पेक्ट्रमचा लिलाव
केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Cabinet) देशात 5-G सेवांसाठी स्पेक्ट्रमच्या लिलावाला ग्रीन सिग्नल दिला होता. अदानी ग्रूप 5-G स्पेक्ट्रम लिलावात पूर्ण तयारीनिशी उतरला आहे.
नवी दिल्लीः 5-G तंत्रज्ञानाची (5-G Technology) प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी गूड न्यूज आहे. चालू वर्षात टेलिकॉम ऑपरेटर्स 5G मोबाईल सेवा सुरू करू शकतात. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरादरम्यान ही माहिती दिली. 5G लिलाव प्रक्रियेला येत्या 26 जुलैपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. आतापर्यंत लिलाव प्रक्रिेयसाठी चार प्रमुख कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये अदानी ़डाटा नेटवर्क्स लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम, वोडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Cabinet) देशात 5-G सेवांसाठी स्पेक्ट्रमच्या लिलावाला ग्रीन सिग्नल दिला होता. अदानी ग्रूप 5-G स्पेक्ट्रम लिलावात पूर्ण तयारीनिशी उतरला आहे. बड्या कंपन्यांमध्ये स्पेक्ट्रमच्या खरेदीसाठी (Spectrum sell) रस्सीखेच असणार आहे.
अदानींची एंट्री
अदानी समूहानं कंपनी स्वत:च्या वापरासाठी स्पेक्ट्रम वापरणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, तज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार गौतम अदानी टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहे. केवळ भारतच नव्हे तर आशियातील टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये विस्तार करण्याच्या तयारीत अदानी समूह आहे.
अदानी की अंबानी?
स्पेक्ट्रम लिलावात अदानी व अंबानी दोघांत मोठी रस्सीखेच असणार आहे. रिलायन्सने इन्फोटेल ब्रॉडब्रँडची खरेदी करुन टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री घेतली होती. वर्ष 2010 च्या लिलावात 2300MHz स्पेक्ट्रमची खरेदी केली होती. दरम्यान, केद्र सरकारने लायन्ससाठी अर्ज मागविले होते. त्यावेळी रिलायन्सने लायसन्स घेऊन वर्ष 2016 मध्ये जिओ लाँच करुन टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलथापालथ घडवून आणली होती.
5-G चा नेमका फायदा?
- मोबाईल क्षेत्रात अमुलाग्र बदल
- 5-G चा स्पीड 4-G च्या तुलनेत दहापट
- 5-G मुळे ऑटोमेशन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
- ग्रामीण भागात इंटरनेट प्रसाराला मोठ्या प्रमाणात वेग
- 4G नेटवर्क मध्ये किमान स्पीड 45 एमबीपीएसच्या दरम्यान होती. 5G मध्ये स्पीड 100 एमबीपीएस पर्यंत पोहचण्याचा अंदाज
- एक सिनेमा 5-G स्पीड मध्ये केवळ 20 सेकंदात डाउनलोड