AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5G In India : Airtel आणि Jio आज 5G नेटवर्क लाँच करण्याची शक्यता, Vodafone Idea कधी लाँच करणार? जाणून घ्या…

5G In India : Jio च्या नेटवर्कला 5G गती मिळण्याची अपेक्षा आहे. कारण Jio ने मिड-बँडविड्थ स्पेक्ट्रम विकत घेतला आहे. तर Airtel ने sub-GHz (700 MHz) स्पेक्ट्रम विकत घेतलाय.

5G In India : Airtel आणि Jio आज 5G नेटवर्क लाँच करण्याची शक्यता, Vodafone Idea कधी लाँच करणार? जाणून घ्या...
5G सेवाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 10:57 AM

नवी दिल्ली : नुकताच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपला आहे. देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या गेल्या दोन वर्षांपासून 5G नेटवर्कची चाचणी घेत आहेत आणि आता एअरटेल (Airtel), जिओ (Jio), Vodafone Idea 5G लाँच (5G In India) करण्यासाठी सज्ज आहेत. स्पेक्ट्रम लिलावानंतर जिओनं सांगितले होते की ते 5G नेटवर्क लाँच करून आझादीचा अमृत महोत्सव साजरा करेल. जिओनंतर एअरटेलनंही असंच विधान केलं आहे. अशा परिस्थितीत आज म्हणजेच 15 ऑगस्टला जिओ आणि एअरटेलचे 5जी लाँच होण्याची शक्यता आहे. Vodafone Idea ने अद्याप 5G लाँच करण्याबाबत असे कोणतेही विधान केलेले नाही. रिलायन्स जिओने 5G बद्दल मोठा दावा केला आहे. जिओचं म्हणणं आहे की ते लवकरच देशातील 1,000 शहरांमध्ये 5G कव्हरेज पूर्ण करेल. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की Jio कडे अनेक बँडसह 5G चे सर्वाधिक बँड आहेत.

हायलाईट्स

  1. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज सुनील भारती मित्तल यांच्या भारती एअरटेलने 43,084 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले
  2. व्होडाफोन आयडियाने 18,799 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे
  3. स्पेक्ट्रम अधिग्रहित करणार्‍यांना 20 समान वार्षिक हप्त्यांमध्ये भरण्याव्यतिरिक्त संपूर्ण रक्कम आगाऊ भरण्याचा पर्याय

सर्वाधिक स्पेक्ट्रमसाठी बोली

जिओने सर्वाधिक स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आणि व्होडाफोन आयडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. Jio च्या नेटवर्कला 5G गती मिळण्याची अपेक्षा आहे. कारण Jio ने मिड-बँडविड्थ स्पेक्ट्रम विकत घेतला आहे. तर Airtel ने sub-GHz (700 MHz) स्पेक्ट्रम विकत घेतला आहे.

आगाऊ भरण्याचा पर्याय

दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज सुनील भारती मित्तल यांच्या भारती एअरटेलने 43,084 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे, तर व्होडाफोन आयडियाने 18,799 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. स्पेक्ट्रम अधिग्रहित करणार्‍यांना 20 समान वार्षिक हप्त्यांमध्ये भरण्याव्यतिरिक्त संपूर्ण रक्कम आगाऊ भरण्याचा पर्याय आहे.

हप्त्यांमध्ये पैसे भरायचे असल्यास….

सर्व यशस्वी बोलीदारांनी हप्त्यांमध्ये पैसे भरायचे ठरवले, तर सरकारला देय तारखेला 13,412.58 कोटी रुपये मिळतील. यामध्ये रिलायन्स जिओला 7,864.78 कोटी रुपये द्यावे लागतील. अदानी डेटा नेटवर्कला 18.94 कोटी रुपये, भारती एअरटेलला 3,848.88 कोटी रुपये आणि व्होडाफोन आयडियाला 1,679.98 कोटी रुपये द्यावे लागतील.

5G सेवा एका महिन्यात

दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी सोमवारी सांगितले की, देशात 5G सेवा एका महिन्यात सुरू होऊ शकते. आशिया आणि ओशनिया क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या प्रादेशिक मानकीकरण मंच (RSF) च्या उद्घाटन समारंभात संबोधित करताना चौहान यांनी ही अपेक्षा व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.