5G In India : देशात ऑगस्टमध्ये 5G लाँच होणार, एअरटेलच्या सीईओंची मोठी माहिती, 5G स्पेक्ट्रममध्ये एअरटेलचा वाटा किती?

दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनीही एका महिन्यात 5जी सेवा सुरू होण्याची आशा व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात एअरटेलने ऑगस्टमध्ये 5G सेवा ही सुरू करण्याचा दावा केला होता. 

5G In India : देशात ऑगस्टमध्ये 5G लाँच होणार, एअरटेलच्या सीईओंची मोठी माहिती, 5G स्पेक्ट्रममध्ये एअरटेलचा वाटा किती?
देशात ऑगस्टमध्ये 5G लाँच करण्याची तयारीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 2:31 PM

मुंबई : भारती एअरटेल (Airtel) या महिन्यात देशात 5G सेवा (Airtel 5G services) सुरू करणार आहे. तसेच एअरटेलने मार्च 2024 पर्यंत देशभरात 5G सेवा कव्हर करण्याचा दावा केला आहे. सोमवारी याची घोषणा करताना एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल (CEO Gopal Vittal) म्हणाले की आम्ही ऑगस्टमध्ये 5G लाँच करण्याचा विचार करत आहोत आणि त्यानंतर लवकरच ते देशभरात आणू इच्छितो. ते म्हणाले की, देशातील दूरसंचार सेवेची किंमत खूपच कमी आहे आणि ती वाढवण्याची गरज आहे. याशिवाय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनीही एका महिन्यात 5जी सेवा सुरू होण्याची आशा व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात देखील एअरटेलने ऑगस्टमध्ये 5G सेवा सेवा ही सुरू करण्याचा दावा केला होता.

5 हजार शहरांसाठी 5G रोलआउटची योजना

कंपनीने सांगितले होते की त्यांनी भारतात 5G सेवेसाठी Ericsson, Nokia आणि Samsung सोबत भागीदारी केली आहे. विट्टल यांनी सोमवारी एअरटेलच्या कॉल दरम्यान सांगितले की आम्ही भारतातील सुमारे 5 हजार शहरांसाठी 5G रोलआउटची योजना करत आहोत. आमच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रोलआउट असेल. यामुळे नव्या सेवेची वाट पाहिली जात आहे.

हायलाईट्स

  1. एअरटेलने मार्च 2024 पर्यंत देशभरात 5G सेवा कव्हर करण्याचा दावा केला
  2. गेल्या आठवड्यात देखील एअरटेलने ऑगस्टमध्ये 5G सेवा सेवा ही सुरू करण्याचा दावा केला
  3. भारतातील सुमारे 5 हजार शहरांसाठी 5G रोलआउटची योजना करत आहोत
  4. देशात 5G साठी एकूण 1,50,173 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला
  5. भारती एअरटेलने 19867 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम आणि व्होडाफोन-आयडियाने 6228 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले
  6. एकट्या रिलायन्स जिओने 88,078 कोटींचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे
  7. 50 टक्क्यांहून अधिक स्पेक्ट्रम जिओच्या ताब्यात

5G पुढील महिन्यात सुरू होईल

दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनीही एका महिन्यात देशातील मोठ्या भागात 5जी सेवा सुरू होण्याची आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हाय स्पीड इंटरनेटसाठी सज्ज व्हा, पुढील महिन्यापर्यंत देशात 5G सेवा सुरू होण्याची आशा आहे.

5G स्पेक्ट्रममध्ये एअरटेलचा वाटा किती?

देशात 5G साठी एकूण 1,50,173 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारती एअरटेलने 19867 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम आणि व्होडाफोन-आयडियाने 6228 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. तर एकट्या रिलायन्स जिओने 88,078 कोटींचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. म्हणजेच 50 टक्क्यांहून अधिक स्पेक्ट्रम जिओच्या ताब्यात आहे.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.