Airtel चा ग्राहकांना मोठा झटका, कंपनीने घेतला मोठा निर्णय

एअरटेल कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. ग्राहकांना आता ऍपल म्युझिकमध्ये प्रवेश मिळेल. कंपनीने 2014 मध्ये हे ॲप लॉन्च केले होते.

Airtel चा ग्राहकांना मोठा झटका, कंपनीने घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 10:09 PM

भारतात एअरटेलचे लाखो ग्राहक आहेत. एअरटेलचे ग्राहकांना मात्र कंपनीने मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपला म्युझिक ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विंक नावाच्या या ॲपमध्ये युजर्सना अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळत होत्या. मात्र आता कंपनीने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. एअरटेलच्या अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राशी बोलताना याची पुष्टी केली. या ॲपचे ऑपरेशन बंद करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कारण ते सर्व विंक कर्मचाऱ्यांना एअरटेल इकोसिस्टमचा भाग बनवणार आहेत.

एअरटेलने 2014 साली Wynk Music ॲप लाँच केले होते. हे ॲपही लोकप्रिय झाले होते. मात्र आता एअरटेलने ते बंद करण्याचा निर्णय घेतलाय. विंकचे ५० कर्मचारी एअरटेलच्या इकोसिस्टममध्ये जोडले जाणार आहेत. Wynk चे LinkedIn पेज दर्शविते की सध्या कंपनीत 50 कर्मचारी होते आणि आता त्यांना एअरटेलच्या अंतर्गत प्रणालीमध्ये स्थानांतरित केले जाणार आहे.

कंपनीने यासाठी Apple सोबत हातमिळवणी केली आहे. आता यूजर्सना ऍपल म्युझिकमध्ये प्रवेश करता येणार आहे. म्हणजे युजर ऍपल म्युझिकचा आनंद घेऊ शकतो. कंपनीने सांगितले की, ‘ज्यांनी Wynk चे सदस्यत्व घेतले होते. आता त्यांना कंपनीने यासाठी ॲपलशी हातमिळवणी केली असून त्यांना ॲपल म्युझिकचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. म्हणजेच त्यांना प्रीमियम सेवेचा लाभ मिळेल जो स्वतःच खूप वेगळा आहे.

Apple Music बद्दल बोलायचे झाले तर ते Airtel युजर्ससाठी ते उपलब्ध असेल. विंक म्युझिक ऑपरेशन्स काही महिन्यांत पूर्णपणे बंद होतील. एअरटेल ग्राहकांना Apple म्युझिकचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील हे अद्याप एअरटेलकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. सध्या Apple Music चे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला दरमहा 99 रुपये द्यावे लागतील. याशिवाय त्यांना कोणते अतिरिक्त फायदे मिळतील हे देखील एअरटेलने स्पष्ट केलेले नाही. पण एअरटेल युजर्स या सेवेचा फायदा घेऊ शकतात असे कंपनीने नक्कीच सांगितले आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.