WhatsApp Feature | तुमचा मोबाईल क्रमांक नाही दिसणार, व्हॉट्सॲपचे युनिक फीचर

WhatsApp Feature | व्हॉट्सॲप सातत्याने नवनवीन फीचर आणते. त्यातील काही धमाल फीचरमुळे युझर्सला मदत होते. त्यांचा आनंद वृद्धीगंत होतो. व्हॉट्सॲप आता केवळ चॅटिंग ॲप राहिले नाही तर एक बहुपयोगी प्लॅटफॉर्म ठरला आहे. पैशांची देवाणघेवाणीसाठी सुद्धा त्याचा वापर होतो. आता तुमचा मोबाईल क्रमांक न दिसता सुद्धा तुम्हाला चॅटिंग करता येणार आहे.

WhatsApp Feature | तुमचा मोबाईल क्रमांक नाही दिसणार, व्हॉट्सॲपचे युनिक फीचर
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 4:50 PM

नवी दिल्ली | 31 डिसेंबर 2023 : व्हॉट्सॲप जगातील सर्वाधिक वापर होणारे मॅसेजिंग ॲपपैकी एक आहे. दररोज कोट्यवधीच नाही तर अब्जावधी लोक त्याचा वापर करतात. आता हा केवळ मॅसेजिग ॲप पुरते मर्यादीत राहिलेले नाही. त्यावर व्हिडिओ-ऑडिओ कॉल, पैशांचा व्यवहार आणि इतर अनेक धमाल करता येतात. व्हॉट्सॲपवर अनोळखी लोकांशी संवाद साधताना अडचण येते. आपला मोबाईल क्रमांक नाहक अनोळखी व्यक्तीला द्यावा वाटत नाही. त्यासाठी व्हॉट्सॲप खास फीचर आणण्याच्या तयारीत आहे. काय आहे हे फीचर, कसा होतो त्याचा वापर, कसा होईल त्याचा फायदा?

नवीन फीचरवर सुरु आहे काम

बिझनेस टुडेमध्ये याविषयीचा एक अहवाल सादर झाला आहे. WA Beta Info च्या दाव्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, मोबाईल क्रमांक शेअर करण्याविषयीची अडचण लवकरच दूर होईल. कारण व्हॉट्सअपने यावर तोडगा काढला आहे. व्हॉट्सॲप या नवीन फीचरवर काम करत आहे. त्यात तुमचा मोबाईल क्रमांक न उघड होता, अनोळखी व्यक्तीशी तुम्हाला चॅटिंग करता येईल.

हे सुद्धा वाचा

मोबाईल क्रमांकावऐवजी दिसेल युझरनेम

या अहवालानुसार, व्हॉट्सॲपचे युझर्स लवकरच या फीचरचा वापर करु शकतील. या फीचरचा वापर करुन युझर एक युनिक युझरनेम तयार करु शकतील. त्यामुळे त्यांची ओळख लपवून त्यांना संवाद साधता येईल. त्यांचा मोबाईल क्रमांक दिसणार नाही आणि युझरनेम पण युनिक ठेवता येईल. ॲड्राईड आणि वेबच्या युझर्ससाठी ही नवीन सुविधा मिळेल.

युझरच्या नावानेच होईल सर्च

या फीचरचे आणखी एक वैशिष्ट्ये समोर आले आहे. डब्ल्यूए बीटा इंफो नुसार, युझरच्या नावाने सर्च करता येईल. सर्च बार वर जाऊन युझरचे नाव टाईप करावे लागेल. त्यामुळे युझरचा फोन क्रमांक उघड होणार नाही आणि युझरची वैयक्तिक माहिती उघड होणार नाही. त्यांना बिनधास्त चॅटिंग करता येईल.

सध्या सुरु आहे चाचपणी

सध्या या फीचरची चाचपणी सुरु आहे. व्हॉट्सॲपची मुळ कंपनी मेटाने या फीचरविषयी अजून अधिकृतपणे काहीच जाहीर केलेले नाही. सध्या बीटा युझर्सच्या काही ग्रुपवर या फीचरची टेस्टिंग सुरु आहे. त्यातील अडचणी दूर झाल्या नंतर हे फीचर युझर्ससाठी रोलआऊट होईल. या फीचरचा वापर करुन युझर एक युनिक युझरनेम तयार करु शकतील. त्यामुळे त्यांची ओळख लपवून त्यांना संवाद साधता येईल.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.