Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 15 Feature : आयफोनचे ISROशी खास कनेक्शन! युझर्सला असा होईल फायदा

iPhone 15 Feature : आयफोन 15 चे एक एक फीचर समोर येत आहे. या फीचरमुळे जग भारताचा जलवा दिसेल. जगभरातील वापरकर्त्यांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. काय आहे इस्त्रोशी कनेक्शन

iPhone 15 Feature : आयफोनचे ISROशी खास कनेक्शन! युझर्सला असा होईल फायदा
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 7:16 PM

नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : ॲप्पल (Apple) कंपनीने iPhone 15 लाँच केला आहे. iPhone 15 मालिकेत चार नवीन मॉडेल आले आहेत. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max ही खास मॉडेल बाजारात आली आहेत. त्यातील प्रो आणि मॅक्स या मॉडेलमध्ये आता A17 pro chipset बसविण्यात आले आहे. परिणामी या स्मार्टफोनची एकूणच कामगिरी सुधारली आहे. बॅटरी पण अधिक काळ टिकणार आहे. आता या स्मार्टफोनचे खास फीचर्स समोर येत आहे. यापूर्वी अनेक फीचर्स लोकांना माहिती होते. फीचर्सकडे वापरकर्त्यांचे अधिक लक्ष असते. पण यातील एका फीचरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्त्रोने (ISRO) अनेक पराक्रम केले आहेत. आयफोनशी पण इस्त्रोचे नाव जोडल्या गेले आहे. आता जगभरातील वापरकर्ते इस्त्रोची ताकद ओळखतील, कोणते आहे हे फीचर

हे खास आले फीचर

आयफोनमध्ये अनेक फीचर आले आहेत. लूक आणि डिझाईने तर युझर्सची मने जिंकलीच आहेत. पण अनेक सुधारणा पण या स्मार्टफोनमध्ये आल्या आहेत. सर्वच आयफोनमध्ये 48MP कॅमेरा देण्यात आला आहे. आता फोनच्या GPS मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. त्याचीच आता जगभर चर्चा सुरु आहे. हे GPS काय आहे आणि कसे करते ते काम, जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा

iPhone 15 मॉडेलमध्ये इस्त्रोचे GPS

ॲप्पलच्या iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये इस्त्रोचे GPS बसविण्यात आले आहे. हे मॉडेल इंडियन सॅटेलाईट नेव्हिगेशन सिस्टमचा वापर करणार आहे. पहिल्यांदाच ॲप्पलने असा निर्णय घेतला आहे. आता आयफोन वापरकर्ते परदेशी नाही तर भारतीय जीपीएस सिस्टमचा वापर करतील. त्यामुळे भारतीय युझर्सला प्रवासा दरम्यान, नकाशा पाहण्यासाठी या नॅव्हिगेशनचा वापर करता येईल.

इस्त्रोचे NavIC काय आहे

इस्त्रोने 2018 मध्ये NavIC भारतात लाँच केले होते. ही एक भारतीय स्टँडअलोन नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना अवघ्या काही वेळात त्याच्या आजुबाजूच्या परिसराची, ठिकाणांची अचूक माहिती मिळेल. हे जीपीएस एकूण 7 सॅटेलाईट आणि ग्राऊंड स्टेशनच्या नेटवर्कचा वापर करुन एक खास डिझाईन तयार करण्यात येते. त्याआधारे वापरकर्त्यांना प्रवासात मदत मिळेल.

NavIC मुळे iPhone महागला

रॉयटर्सच्या दाव्यानुसार, देशातील जीपीएस सिस्टममुळे iPhone ची किंमत इतर देशांपेक्षा भारतात अधिक आहे. भारत सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, या स्मार्टफोनमध्ये परदेशी नॅव्हिगेशनचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी NavIC चा वापर करावा. त्यामुळे या मोबाईलच्या हार्डवेअरमध्ये बदल करावा लागला. त्यामुळे देशात iPhone महागला.

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार.