Aashirvaad Atta : गृहिणींसाठी खास उपक्रम, ‘रहो चार कदम आगे’चा शुभारंभ

आशीर्वादकडून फ्लिपकार्ट व हुनर ऑनलाइन कोर्सेससोबत सहयोगाने भारतातील गृहिणींना साहृय करण्‍याचा मनसुबा असलेला खास उपक्रम 'रहो चार कदम आगे'चा शुभारंभ

Aashirvaad Atta : गृहिणींसाठी खास उपक्रम, 'रहो चार कदम आगे'चा शुभारंभ
आशीर्वाद आटाImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 3:46 PM

मुंबई : आशीर्वाद आटा (Aashirvaad Atta) या भारतातील (India) पहिल्‍या क्रमांकाच्‍या पॅकेज आटा ब्रॅण्‍डने विशेष उपक्रम ‘रहो चार कदम आगे’ची घोषणा केली. या मोहिमेचा गृहिणींना त्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षा अपस्किलिंगच्‍या माध्‍यमातून संपादित करण्‍यामध्‍ये सक्षम करण्‍याचा आणि संपादित केलेल्‍या कौशल्‍यांमधून कमाई करण्‍यात मदत करण्‍याचा मानस आहे. ‘रहो चार कदम आगे’ब्रॅण्‍डच्‍या 20 वर्षाच्‍या महत्त्वपूर्ण प्रवासाला साजरा करत आहे. या कालावधीमध्‍ये ब्रॅण्‍डने लाखो गृहिणींना उत्‍साहित केले आहे. त्‍यांच्‍यासोबतचे नाते अधिक दृढ करण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये ब्रॅण्‍डने महिलांना समकालीन कौशल्‍यांसह सुसज्‍ज करणारे कोर्स (Course) देण्‍यासाठी आणि त्‍यांचा उद्योजकता प्रवास सुरू करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी ऑनलाइन अध्‍ययन व्‍यासपीठ हुनर ऑनलाइन कोर्सेससोबत सहयेाग केला आहे.

महिलांसाठी विशेष प्रयत्न

आशीर्वादने कोर्स पूर्ण झाल्‍यानंतर महिलांना विक्री व्‍यासपीठ मिळवून देण्‍यासाठी भारतातील स्‍वदेशी ई-कॉमर्स बाजारस्‍थळ फ्लिपकार्टसोबत देखील सहयोग केला आहे. या उपक्रमाचा भाग म्‍हणून आशीर्वादचा 45 कोटी रूपयांहून अधिक मूल्‍य असलेले कोर्स देण्‍याचा आणि 1 लाख 50 हजार हून अधिक महिलांपर्यंत पोहोचण्‍याचा मनसुबा आहे. सहभाग घेण्‍यासाठी गृहिणी आशीर्वाद आटाचा प्रमोशन पॅक खरेदी करत आणि क्‍यूआर कोड स्‍कॅन करत किंवा पॅकवर उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या क्रमांकावर मिस्‍ड कॉल देत त्‍यांची नोंदणी करू शकतात. नोंदणी पूर्ण झाल्‍यानंतर युजर्सना आशीर्वाद व्‍हॉट्सअ‍ॅप बॉटकडे नेले जाईल, जे ग्राहकांना वैयक्तिक सहाय्य करण्‍यासाठी आणि अनेक हुनर ऑनलाइन कोर्सेसमधून त्‍यांच्‍या पसंतीचा कोर्स निवडण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.

20 हून अधिक कोर्स

हुनरवर 20 हून अधिक कोर्स आहेत. ज्‍यामधून गृहिणी निवड करू शकतात. हे कोर्स आहेत आंतरराष्‍ट्रीय पाककला, भरतकाम, उद्योजकता, बेकिंग, होम डेकॉर, चॉकलेट मेकिंग, फॅशन डिझाइनिंग व इतर. हुनर ग्राहकांना फॅकल्‍टी सत्रे, लाइव्‍ह सत्रे, असाइनमेंट सबमिशन्‍स व प्रमाणनासह त्‍यांच्‍या ऑनलाइन कोर्सेसमध्‍ये एण्‍ड-टू-एण्‍ड सहाय्य करत आली आहे. सहयोग करण्‍यासाठी आणि ग्राहकांना त्‍यांच्‍या कोर्सदरम्‍यान मदत करण्‍यासाठी आशीर्वाद व हुनर व्‍हॉट्सअ‍ॅप बॉटच्‍या माध्‍यमातून 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सहाय्य करेल, ज्‍यामधून ग्राहकांच्‍या शंकांचे वेळेवर निराकरण होण्‍याची खात्री मिळेल. प्रमाणन मिळण्‍यासाठी प्रत्‍येक ग्राहकाने त्‍यांच्‍या डिजिटल कोर्सच्‍या शेवटी अंतिम परीक्षेमध्‍ये उत्तीर्ण होणे गरजेचे असेल.

हे सुद्धा वाचा

ग्राहकांनी त्‍यांचे कोर्स पूर्ण केल्‍यानंतर फ्लिपकार्टचे व्‍यासपीठ व अनेक नेटवर्क्‍स त्‍यांचे उद्यम किंवा व्‍यवसाय स्‍थापित करण्‍यामध्‍ये मदत करतील. आशीर्वाद मदतीचा हात पुढे करण्‍यासोबत ऑनबोर्डिंग प्रशिक्षक, वन-ऑन-वन प्रशिक्षण सत्रे, ऑन-ग्राऊण्‍ड कार्यशाळांच्‍या माध्‍यमातून ई-कॉमर्स परिसंस्‍थेसह ऑनबोर्ड करण्‍यापर्यंत, त्‍यांच्‍या प्रक्रियेमधील अडथळ्यांना दूर करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी विशेष सहाय्य करण्‍यापर्यंत त्‍यांच्‍या उद्योजकता प्रवासाचा महत्त्वपूर्ण भाग बनेल.आशीर्वादने या उपक्रमाचा प्रसार करण्‍यासाठी जाहिरात मोहिम देखील लाँच केली आहे, जी येथे पाहता येऊ शकते.

टीव्‍हीसी लिंक: https://youtu.be/11nEN9tBzN0

या जाहिरातीमध्‍ये महिलांची उदरनिर्वाहकरण्याची, प्रगतीकरण्याची आणि त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा सुरेखरित्‍या मांडण्यातआलीआहे. ही जाहिरात दोन महिलांच्‍या कथेला सादर करते, ज्‍यांनी आशीर्वादच्‍या मदतीने त्‍यांच्‍या कौशल्‍यांच्‍या आधारावर अर्थपूर्ण व्‍यवसाय निर्माण करत स्‍वत:चे नावलौकिक केले आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना आयटीसी लि.च्‍या स्‍टेपल्‍स, स्‍नॅक्‍स व मील्‍सचे एसबीयू चीफ एक्झिक्‍युटिव्‍ह श्री. गणेश सुंदररामण म्‍हणाले,”मागील दोन दशकांपासून आशीर्वाद आटाने उच्‍च दर्जाच्‍या ऑफरिंग्‍जच्‍या पोटफोलिओसह लाखो कुटुंबांना उत्‍साहित केले आहे. आयटीसीमध्‍ये आम्‍ही भारतीय गृहिणींसोबतच्‍या विश्‍वास व सहवासाचे खास नाते जपले आहे, जे वर्षानुवर्षे अधिक दृढ व मजबूत झाले आहे. अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या आणि उद्देशासह ब्रॅण्‍डच्‍या अस्‍सल उत्‍साहामध्‍ये परिवर्तनाचे उत्‍प्रेरक असण्‍याच्‍या आमच्‍या कटिबद्धतेशी बांधील राहत आम्‍ही महत्त्वाकांक्षी गृहिणींना त्‍यांची स्‍वप्‍ने साकारण्‍यामध्‍ये, तसेच बदलाचे स्रोत बनण्‍यामध्‍ये सहाय्य व प्रोत्‍साहित करण्‍यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा त्‍यांना संबंधित कौशल्‍य उपक्रमांची सुविधा देत आवश्‍यक पाठिंबा/मदत देण्‍याच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या उद्योजकता प्रवासामध्‍ये मदत करण्‍याचा मनसुबा आहे. रहो चार कदम आगे आपल्‍या देशातील महिलांसाठी व्‍यासपीठ आहे, जे त्‍यांना त्‍यांच्‍या जीवनाचा भार सांभाळण्‍यास आणि त्‍यांचे स्‍वप्‍नवत जीवन जगण्‍यास मदत करते.” ते पुढे म्‍हणाले,”आम्‍हाला आशीर्वादचा हा विशेष उपक्रम अधिक प्रबळ करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी हुनर ऑनलाइन कोर्सेस व फ्लिपकार्टसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.”

फ्लिपकार्टच्‍या सर्व उद्योजकांना समान संधी देण्‍याच्‍या दृष्टीकोनाशी बांधील राहत हा उपक्रम गृहिणींना त्‍यांचे कौशल्‍य दाखवण्‍यासाठी मार्ग देत आणि आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी व यशस्‍वी होण्‍यामध्‍ये मदत करत त्‍यांच्‍यासोबत उत्तम नाते निर्माण करतो. फ्लिपकार्टचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मनिष कुमार म्‍हणाले,”स्‍वदेशी कंपनी म्‍हणून फ्लिपकार्टने नेहमीच उद्योजकतेच्‍या उत्‍साहाला प्रोत्‍साहित केले आहे आणि महिलांच्‍या भूमिकेसंदर्भातील समज बदलण्‍याप्रती काम केले आहे. आम्‍हाला या विशेष उपक्रमासाठी आशीर्वादसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. हा उपक्रम अनेक उद्योजक महिलांना त्‍यांचे यश व स्‍वावलंबीपणाचे मार्ग रचण्‍यामध्‍ये सक्षम करेल. मी दोन दशकांचा लक्षणीय टप्‍पा पूर्ण करण्यासाठी आशीर्वादचे अभिनंदन करतो.”

हुनर ऑनलाइन कोर्सेसच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी निष्‍ठा योगेश म्‍हणाल्‍या,”आम्‍हाला महिलांना पाठिंबा देण्‍यावर लक्ष केंद्रित करणा-या आणि भारतीय गृहिणीच्‍या अध्‍ययन प्रवासामध्‍ये प्रमुख भूमिका बजावणा-या या मोहिमेसाठी आशीर्वाद आटासोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. ही मोहिम देशभरातील महिलांना सक्षम करण्‍याच्‍या आणि आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी बनण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी त्‍यांना नवीन कौशल्‍यांसह सुसज्‍ज करण्‍याच्‍या आमच्‍या ब्रॅण्‍ड उद्देशाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. मी अधिकाधिक महिलांच्‍या जीवनामध्‍ये सकारात्‍मक परिणाम घडवून आणण्‍यास उत्‍सुक आहे.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.