AC कुलींग करत नाही का ? फक्त ‘हे’ एक काम करा आणि ताबडतोब फरक पाहा!
उन्हाळ्यात एसीची हवा कमी झालीये आणि बिल पाहून घाम फुटतोय? वाटतंय काहीतरी मोठा बिघाड झाला असेल? पण थांबा! या मोठ्या समस्येमागचं कारण कदाचित तुमच्या एसीच्या फिल्टरमध्ये लपलेलं असू शकतं! चला, जाणून घेऊया या फिल्टरचं महत्त्व आणि ते साफ न ठेवल्यास तुमच्या खिशाला आणि एसीच्या आरोग्याला कसा फटका बसतो!

उन्हाळ्याचा जोर वाढतोय आणि त्याचबरोबर घराघरात AC चालूच असतो. सुरुवातीला थंडगार हवा देणारा हा AC, काही दिवसांनी मात्र उबदार वाऱ्यासारखी हवा फेकू लागतो. त्यात वीज बिल मात्र नेहमीपेक्षा जास्त येतं! अशा वेळी अनेकांना वाटतं, AC खराब झाला की काय? पण खरं कारण इतकं गंभीर नसतं. बहुतेक वेळा प्रॉब्लेम असतो फक्त ‘फिल्टर’चा!
होय, AC चा फिल्टर जर घाण झालेला असेल, तर तो नीट हवा खेचू शकत नाही. त्यामुळे खोली नीट थंड होत नाही आणि कंप्रेसरला जास्त मेहनत घ्यावी लागते. याचं थेट परिणाम विजेच्या बिलावर होतो आणि AC चं आयुष्यही कमी होतं.
AC चा फिल्टर म्हणजे त्याचं श्वास घेण्याचं साधन आहे. त्यामुळे, बाहेरून येणारी हवा फिल्टरमधून जाऊन थंड होऊन आपल्या खोलीत येते. पण जर हा फिल्टर धुळीने आणि घाणीत भरून गेला, तर हवा व्यवस्थित जाऊ शकत नाही. यामुळे काय होतं?
थंड हवा कमी होते : फिल्टर घाण झाल्यावर हवा नीट फिरत नाही, त्यामुळे खोली थंड होण्याचा वेग कमी होतो.
वीज बिल वाढतं : हवा कमी असल्यामुळे AC चा कंप्रेसर जास्त वेळ चालू राहतो. परिणामी जास्त वीज लागते आणि बिल वाढतं.
मशीनवर ताण येतो : फिल्टर चोक असल्यामुळे AC ला नेहमीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे मशीन लवकर खराब होण्याची शक्यता वाढते.
ACतून येणारे पाणी दुषीत होते : धुळीचा साठा असलेला फिल्टर आरोग्यासाठी देखील धोकादायक ठरतो. Allergies आणि सांस घेण्याचे त्रास वाढू शकतात.
फिल्टर कधी आणि कसा साफ करावा?
तज्ज्ञ सांगतात, जर एसी दररोज ४-६ तास वापरला जात असेल, तर दर दीड ते दोन महिन्यांनी फिल्टर धुणं आवश्यक आहे. पण जर वापर जास्त असेल (दिवसाचे १०-१२ तास) तर महिन्यातून एकदा तरी नक्कीच हे काम करायला हवं.
साफ करायची पद्धत अगदी सोपी आहे:
1. AC बंद करा
2. इनडोअर युनिटचं कव्हर उघडा
3. फिल्टर बाहेर काढा आणि पाण्याने स्वच्छ धुवा
4. मग तो फिल्टर पूर्ण वाळू द्या आणि पुन्हा नीट लावा
लक्षात ठेवा: फिल्टर स्वच्छ राहिला तर AC ची हवा थंड आणि फ्रेश राहते, वीजेचं बिल कमी येतं आणि मशीनचं आयुष्यही वाढतं!