Elon Musk चा स्वॅगच भारी, आधी ट्विटरचे शेअर खरेदी, आता म्हणतो एडिट बटण पाहिजे
टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरची (Twitter) 9.2 टक्के निष्क्रिय भागीदारी (Passive Stake) विकत घेतली आहे.
नवी दिल्ली: टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरची (Twitter) 9.2 टक्के निष्क्रिय भागीदारी (Passive Stake) विकत घेतली आहे. सोमवारी रेग्युलेटरी फायलिंगमधून ही माहिती समोर आली आहे. या बातमीने ट्विटरच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरचा शेअर 16 टक्क्यांच्या उसळीसह ट्रेड करताना पाहायला मिळाला. मार्चच्या सुरुवातीला, एलॉन मस्क म्हणाले होते की ते नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा विचार करत आहेत. रेग्युलेटरी फायलिंगनुसार, एलॉन मस्क यांनी 10 फेब्रुवारी 2022 रोजीच ट्विटरमध्ये ही भागीदारी घेतली होती. दरम्यान, टेस्लाने शनिवारी पहिल्या तिमाहीतील कार विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. टेस्लाने पहिल्या तिमाहीत विक्रमी इलेक्ट्रिक वाहने वितरीत केली आहेत.
अलीकडेच एलॉन मस्क यांनी सांगितले की, ते सध्या एका सोशल मीडिया अॅपवर काम करत आहेत. मस्क यांनी ट्विट केले आहे की, त्यांना ट्विटरला एक चांगला पर्याय आणायचा आहे, कारण ते भाषण स्वातंत्र्याच्या तत्त्वांचे पालन करण्यात अयशस्वी झाले आहेत. मस्क म्हणाले, “ट्विटर एक वास्तविक सार्वजनिक टाउन स्क्वेअर म्हणून काम करतं आणि भाषण स्वातंत्र्याच्या तत्त्वांचे पालन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे,” यापूर्वी टेस्ला आणि स्पेसएक्सनेही ट्विट केले होते की लोकशाहीसाठी भाषण स्वातंत्र्य (फ्री स्पीच) आवश्यक आहे.
सोशल मीडियावर ट्विटर विकत घेण्याचा सल्ला मिळाला
मस्क यांनी त्यांचा इरादा व्यक्त केल्यानंतर अनेकांनी म्हटले की, मस्क यांनी नवीन सोशल प्लॅटफॉर्म विकसित करु नये. त्याऐवजी मस्क यांनी स्वतःच ट्विटर विकत घ्यायला हवं. एका युजरने म्हटले होते की, ‘काश एलॉन मस्क यांनी ट्विटर आधीच विकत घेतले असते….’
टेस्लाच्या उत्पादनांवर परिणाम
टेस्लाचे उत्पादन मागील तिमाहीच्या तुलनेत कमी राहिले आहे. पुरवठा साखळीतील (सप्लाय चेन) व्यत्यय आणि चिनी कारखान्यातील कामकाज ठप्प झाल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. सीईओ एलॉन मस्क म्हणाले, “चीनच्या झिरो-कोविड धोरणामुळे आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे ही एक कठीण तिमाही होती.” टेस्लाने गेल्या तिमाहीत 3,10,048 वाहने वितरित केली. हे मागील तिमाहीपेक्षा किंचित जास्त आहे आणि एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 68 टक्क्यांनी जास्त आहे.
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स