iPhone 13 च्या लाँचिंगनंतर गुगलवर लोक सर्च करतायत कोणत्या अवयवाशिवाय माणूस जिवंत राहील?

Apple उत्पादनांच्या (Apple Products) किमती इतक्या जास्त असतात की अनेकांना त्यांचे प्रोडक्ट्स परडवत नाहीत. मात्र ते विकत घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.

iPhone 13 च्या लाँचिंगनंतर गुगलवर लोक सर्च करतायत कोणत्या अवयवाशिवाय माणूस जिवंत राहील?
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 8:24 PM

मुंबई  : Apple उत्पादनांच्या (Apple Products) किमती इतक्या जास्त असतात की अनेकांना त्यांचे प्रोडक्ट्स परडवत नाहीत. मात्र ते विकत घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी अॅपलने आयफोन 13 लाँच केला. यात 5G कनेक्टिव्हिटी (5G Connectivity) सह अनेक नवीन फिचर्सचा समावेश आहे. यासह, त्याचा कॅमेरा देखील अॅडवांस करण्यात आला आहे. लॉन्च इव्हेंटनंतर, सोशल मीडियावर या फोनच्या किंमतीबद्दल मिम्स शेअर केले जात आहेत. यातले काही मजेशीर मिम्स आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत. (After the launch of iPhone 13, people searching on Google. Without which organ can a person survive?)

अमेरीकन टेक कंपनी Apple ने मंगळवारी California Streaming या इव्हेंटदरम्यान iPad मिनी, वॉच सीरीज 7 सह iPhone 13 सिरीज सादर केली.

Apple iPhone 13 च्या डिझाईनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. आयफोन 12 चं फ्लॅट-एज डिझाइन, डायगोनल ट्विन रिअर कॅमेरा सेटअप, आयपी 68 रेटिंगसह हा फोन पाच नवीन रंगात सादर करण्यात आला आहे. यामध्ये पिंक, ब्लू, मिडनाइट, स्टारलाईट आणि रेड या रंगांचा समावेश आहे. नवीन आयफोन 13 सीरीजमध्ये अॅपलचा नवीन ए 15 बायोनिक चिपसेट असेल. हा 6 कोर CPU आहे ज्यामध्ये 2 हाय परफॉर्मन्स कोर आणि 4 एफिशियन्सी कोर आहेत. डिस्प्लेमध्ये 1200 एनआयटी ब्राइटनेस आहे आणि एक्सडीआर डिस्प्ले युजर्ससाठी ब्राइट, रिच एक्सपीरियंस देण्याचे आश्वासन देते. आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीमध्ये डिस्प्ले साईज 6.1-इंच आणि 5.4 इंच इतकी आहे.

आयफोन 13 मिनीची किंमत 699 डॉलर्सपासून (51,470 रुपये) सुरू होते आणि अमेरिकेत आयफोन 13 ची किंमत 799 डॉलर्स पासून (58,832 रुपये) सुरू होते. दोन्ही फोनचे सुरुवातीचे व्हेरिएंट 64GB ऐवजी 128GB स्टोरेजसह येतात.

नवीन iPad मिनी लाँच

आयपॅड मिनीमध्ये टॉप बटन म्हणून टच आयडीसह 8.3 इंच स्क्रीन आहे. मागील पिढीच्या आयपॅड मिनीच्या तुलनेत Apple 40 टक्के वेगवान सीपीयू परफॉर्मन्स आणि जीपीयू कामगिरीमध्ये मोठी उडी घेण्याचे आश्वासन देत आहे. हे A13 बायोनिक चिपसेटवर देखील चालते. IPad मिनीमध्ये आता USB-C पोर्ट आहे. आपण ते आपल्या कॅमेरा, लॅपटॉप तसेच इतर कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. तसेच आयपॅड 5G ला सपोर्ट करतो. IPad आयपॅड मिनीचा मागचा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे ज्यात 4 के मध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे. त्याची प्रारंभिक किंमत $ 499 (36,742 रुपये) सुरु होते.

Apple Watch Series 7 लाँच

नवीन Apple वॉच सिरीज 7 वॉचओएस 8 च्या अपडेटसह लाँच करण्यात आली आहे. वॉचओएस 8 ऑटोमॅटिक बाईक राइड आणि फॉल डिटेक्शन करेल. हे ईबाईक्सला देखील सपोर्ट करते. Apple Watch Series 7 ला नवीन डिझाईन देण्यात आलं आहे. त्याचा नवीन रेटिना डिस्प्ले वॉच सीरीज 6 पेक्षा 20 टक्के मोठा आहे. बॉर्डर 40 टक्के पातळ आहेत आणि सोप्या अॅक्सेससाठी मोठी बटणे आहेत. Apple Watch Series 7 ची किंमत $ 399 पासून (29,379 रुपये) सुरू होते.

इतर बातम्या

ट्रिपल कॅमेरा, 5050mAh बॅटरी, नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात

डुअल फ्लॅशसह सेल्फी, 5000mAh बॅटरी, 64GB स्टोरेजसह 7 हजारांच्या रेंजमध्ये दमदार स्मार्टफोन लाँच

सुरु होतोय Flipkart Big Billion Days सेल, ‘या’ प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या सर्वकाही

(After the launch of iPhone 13, people searching on Google. Without which organ can a person survive?)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.