AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI Deepafake : एखाद्याचा नकली व्हिडीओ बनवाल तर पडेल महागात, दंड तर भरावाच लागेल पण ‘इतकी’ वर्ष खावी लागेल तुरूंगाची हवा

Deepfake Video : डीपफेक व्हिडिओ बनवून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. IT कायदा, 2000 अन्वये, यासाठी दंड तर भरावा लागतोच पण तुम्हाला जेलची हवाही खावी लागू शकते.

AI Deepafake : एखाद्याचा नकली व्हिडीओ बनवाल तर पडेल महागात, दंड तर भरावाच लागेल पण 'इतकी' वर्ष खावी लागेल तुरूंगाची हवा
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 3:02 PM

AI Deepafake : अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna)  हिच्या व्हायरल होणाऱ्या फेक व्हिडीओमुळे मोठी खळबळ निर्माण झाली. इंटरनेटवर तिचा डीपफेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यासंदर्भात रश्मिकाने एक पोस्टही शेअर केली. त्यानंतर खुद्द बिग बी , अमिताभ बच्चन यांनीही घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. यामुळे डीपफेक व्हिडीओबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. आर्टिफिशअल इंटेलिजन्सद्वारे (AI) बनलेल्या या फेक व्हिडीओमुळे डीपफेक (deepfake)  टेक्नॉलॉजीबद्दल पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे.

एखाद्याच्या प्रायव्हसीमध्ये दखल देऊन फेक किंवा बनावट कंटेट तयार करणं हे योग्य नाही. याचा समाजावर खूप विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषत: निवडणुकीच्या वातावरणात नेत्यांच्या बनावट व्हिडिओंद्वारे मतदारांची दिशाभूल होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. भारतात डीपफेक तंत्रज्ञानाचा सामना करण्याचा कोणताही मार्ग नाही का?

भारतात, डीपफेकशी संबंधित प्रकरणे माहिती तंत्रज्ञान कायदा (technology act), 2000 अंतर्गत हाताळली जातात. नागरिकांच्या प्रायव्हसीचे किंवा गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी या कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. जर आपण रश्मिका मंदानाच्या केसकडे पाहिले तर सरकार या कायद्यानुसार डीपफेक तयार करणाऱ्या आणि शेअर करणाऱ्यांवर कारवाई करू शकते. आयटी कायद्यांतर्गत या प्रकरणात काय कारवाई होऊ शकते आणि किती शिक्षा होऊ शकते ते जाणून घेऊया.

IT Act, 2000 (Sec. 66C): 3 वर्षांचा तुरुंगवास

IT ॲक्ट आणि भारतीय दंड संहिता (IPC) हे AI जनरेटेड डीपफेक मुद्याच्या समस्येला सामोरे जाऊ शकते. आयटी कायद्याच्या कलम 66C मध्ये ओळख चोरीची तरतूद आहे. जर कोणी फसवणूक करून किंवा अप्रामाणिकपणे इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी, पासवर्ड किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची विशिष्ट ओळख वापरत असेल तर त्याला 1 लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. याचा अर्थ दोषी व्यक्तीच्या तुरुंगवासाची शिक्षा 3 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. याशिवाय एक लाख रुपयांचा दंडही होऊ शकतो.

IT Act, 2000 (Sec. 66E): दंड आणि तुरुंगवास

कलम 66E हे प्रायव्हसी किंवा गोपनीयतेशी संबंधित प्रकरणांशी संबंधित आहे. जर कोणी हेतुपुरस्सर किंवा जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीच्या प्रायव्हसीचे उल्लंघन करत असेल आणि त्याच्या संमतीशिवाय त्यांच्या प्रायव्हेट एरिआची इमेज कॅप्चर करून ती पब्लिश किंवा व्हायरल करत असेल. तर यासाठी 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाख रुपये दंड अशी शिक्षा भोगावी लागू शकते. या कलमांतर्गत, दोषीच्या तुरुंगवासाची शिक्षा 3 वर्षांपर्यंत वाढविली जाऊ शकते आणि 2 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. AI द्वारे एखाद्याचा बनावट व्हिडिओ तयार करून तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता.

IT Act, 2000 (Sec. 67): अश्लील कंटेट पसरवल्याबद्दल शिक्षा

कलम 67 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील कंटेट पब्लिश करणे किंवा तो व्हायरल करणे यासाठी देखील शिक्षेची तरतूद आहे. जर कोणी अश्लील किंवा लैंगिकतेला प्रोत्साहन देणारा कंटेंट तयार केला किंवा तो पब्लिश केला तर हे (गुन्हा) पहिल्यांदा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड होऊ शकतो. पण तोच गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास, तुरुंगवासाची शिक्षा 5 वर्षांपर्यंत वाढू शकते आणि दंडाची रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत वाढू शकते.

काय आहे प्रकरण ?

आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स बाजारात आल्यापासून याचा चुकीचा वापर होताना देखील दिसत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा फेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. व्हिडीओमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी महिलेने अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा वापर केल्याची देखील चर्चा रंगली आहे. रश्मिका हिचा फेक व्हिडीओ एक्स ‘ट्विटर’वर तुफान व्हायरल झाला. जवळपास 2 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ ‘डीपफेक’ या सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.डीपफेक हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडिया आहे. ज्यामध्ये AI वापरून एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा व्हिडिओचा वापर करत दुसऱ्या व्यक्तीसोबत बदलण्यात येतो.

काय म्हणाली रश्मिका ?

या फेक व्हिडीओनंतर रश्मिका मंदाना हिने पहिल्यांदाच भाष्य केले. रश्मिका मंदाना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट म्हटले की, हे शेअर केल्यानंतर मी खरोखरच खूप जास्त दुखावले गेले आहे. माझ्याबद्दलचा एक डीपनेक व्हिडीओ ऑलाईन व्हायरल केला जात आहे. हे फक्त माझ्यासाठीच नाही. तंत्रज्ञानाचा कसा दुरुपयोग केला जातोय आणि हे आपल्यापैकी प्रत्येकासाठीच खूप जास्त भीतीदायक आहे.

बिग बी देखील उतरले मैदानात

रश्मिका मंदाना हिच्या त्या व्हिडीओनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. या व्हिडीओमुळे मोठी खळबळ निर्माण झाली.अनेकांनी थेट कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला देखील दिला. या सर्व प्रकारानंतर बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे रश्मिका मंदाना हिच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले. अमिताभ बच्चन यांनी एक खास पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर घडलेल्या प्रकारानंतर अमिताभ बच्चन यांनी संताप व्यक्त करत नाराजी देखील जाहीर केली.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....