AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“घिबली”च नाही, आता ChatGPT मध्ये तयार करा ‘सायबरपंक’ ते ‘मंगा’ सारखी 10 जादुई चित्रं!

थोडीशी सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता दाखवली तर कोणतंही साधं चित्र तुम्ही कलेच्या अनोख्या नमुन्यात बदलू शकता. प्रॉम्प्टमध्ये जितकं स्पष्टपणे सांगाल, तितकं चित्र तुमच्या कल्पनेला साजेसं मिळेल. ChatGPT-४ओ ने एआय आर्टच्या माध्यमातून सर्जनशीलतेची नवीन दारं खुली केली आहेत.

घिबलीच नाही, आता ChatGPT मध्ये तयार करा 'सायबरपंक' ते 'मंगा' सारखी 10 जादुई चित्रं!
AI Meets Art ChatGPT-4o Unleashes Creative Freedom with Stunning Image Styles
Follow us
| Updated on: Apr 08, 2025 | 2:05 PM

डिजिटल कलेच्या विश्वात क्रांती घडवत, ओपनएआयच्या ChatGPT-4ओ या नव्या प्लॅटफॉर्मने इमेज जनरेशनमध्ये अनोखी प्रगती साधली आहे. अलीकडेच या एआयने घिबली शैलीत तयार केलेली चित्रं इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मात्र ही केवळ सुरुवात आहे ChatGPT आता तब्बल १० वेगवेगळ्या शैलींमध्ये चित्र निर्माण करू शकतो.

घिबली म्हणजे भावनिक, सजीव आणि कथानक सांगणारी चित्रशैली, जी ‘स्पिरिटेड अवे’ किंवा ‘माय नेबर टोटरो’सारख्या चित्रपटांत दिसते. ChatGPT चा इमेज जनरेशन इंजिन इतकं प्रगत झालं आहे की, वापरकर्त्याच्या कल्पनेनुसार चित्रं विविध स्टाइलमध्ये तंतोतंत उभी राहतात. हे सॉफ्टवेअर कोणत्याही स्केच किंवा साध्या कल्पनेवरून सुरेख डिजिटल आर्ट तयार करू शकतं.

या एआय प्लॅटफॉर्मद्वारे निर्माण होणाऱ्या काही लोकप्रिय शैलींमध्ये ‘सायबरपंक नीयॉन’ ही सर्वाधिक मागणी असलेली शैली आहे. यामध्ये भविष्यातील उंच इमारती, निळसर नीयॉन दिवे आणि गडद वातावरण दिसून येतं. त्याचप्रमाणे ‘पिक्सार-प्रेरित अ‍ॅनिमेशन’ स्टाईलमध्ये भावनांनी भरलेली, रंगीत आणि गोड पात्रं साकारली जातात, जी मुलांसाठी खूप आकर्षक असतात.

हे सुद्धा वाचा

‘मंगा अ‍ॅनिमे’ शैली जपानी आर्टप्रेमींसाठी तर ‘पिक्सेल आर्ट’ ही गेमिंगच्या जुन्या आठवणी जागवणारी शैली आहे. बॅरोक ऑइल पेंटिंग आणि इम्प्रेशनिस्ट ब्रशवर्कसारख्या पारंपरिक शैलीदेखील एआयद्वारे सहज साकारता येतात. ही विविधता कलाकारांना स्वतःच्या कल्पनाशक्तीला बळ देण्यासाठी नवे मार्ग देते.

यामध्ये वापरकर्त्याला केवळ एक कल्पना सुचवायची असते जसे की, “रात्रभर उजळलेलं गॉथिक नॉइर शहर” किंवा “डोंगराच्या पार्श्वभूमीवर सूर्यास्ताचं इम्प्रेशनिस्ट दृश्य” आणि एआय त्या कल्पनेनुसार १० शैलींमध्ये वेगवेगळं चित्र तयार करून देतो. प्रॉम्प्टमध्ये रंग, पोत, प्रकाश आणि मूडविषयी थोडं अधिक सांगितल्यास परिणाम आणखीनच प्रभावी होतो.

एक नवं सर्जनशील साधन

या तंत्रज्ञानाचा फायदा केवळ कलाकारांनाच नव्हे, तर एज्युकेशन, जाहिरात, ब्रँडिंग, गेम डेव्हलपमेंट आणि सोशल मीडिया कंटेंट तयार करणाऱ्या लोकांनाही होतो आहे. पूर्वी जी कामं तासन्‌तास लागत असत, ती आता काही मिनिटांत पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे एआय आर्ट हे आता एक नवं सर्जनशील साधन बनलं आहे.

‘घिबली’ पासून मंगा’ पर्यंतचा हा प्रवास

भविष्यात, एआय आर्टमुळे केवळ डिजिटल कलेत नव्हे तर संपूर्ण व्हिज्युअल माध्यमांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. कलाकार आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी ही एक सुवर्णसंधी असून कल्पनाशक्तीच्या सीमा आता एआयसोबत अधिक विस्तारत आहेत. ‘घिबलीपासून मंगा’ पर्यंतचा हा प्रवास केवळ सुरुवात आहे – पुढे अजून बरंच काही येणार आहे!

लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती.
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे.
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च.
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल.
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला.
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्...
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्....
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये.
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी.
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.