कोट्यवधी एअरटेल युजर्सना मिळणार ‘फ्री’ गिफ्ट, कंपनी देत आहे एक्स्ट्रा डेटाचा फायदा
मोफत डेटा कोणाला नको असतो. जर तुम्हीही एअरटेल कंपनीचे प्रीपेड सिम वापरत असाल आणि तुम्हालाही फ्री डेटा हवा असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की फ्री डेटाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?
![कोट्यवधी एअरटेल युजर्सना मिळणार 'फ्री' गिफ्ट, कंपनी देत आहे एक्स्ट्रा डेटाचा फायदा कोट्यवधी एअरटेल युजर्सना मिळणार 'फ्री' गिफ्ट, कंपनी देत आहे एक्स्ट्रा डेटाचा फायदा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Airtel.jpg?w=1280)
भारतात अनेक मोठं मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. यातील प्रत्येक टेलिकॉम कंपन्या नवीन ग्राहक जोडण्यासाठी नवनवीन प्लॅन व योजना लाँच करत असतात. तर अनेक टेलिकॉम कंपन्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार ऑफर्स देत असतात. नुकतीच एअरटेलनेही एक ऑफर युजर्ससाठी घेऊन आले आहेत जी पाहून तुम्ही आनंदाने खुश व्हाल. कंपनीकडून लाखो युजर्सना फ्री डेटा दिला जात आहे, पण तुम्हाला या ऑफरचा फायदा कसा मिळणार? जर तुम्ही असा विचार करत असाल तर आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात फ्री डेटाचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकाल.
Airtel Offerचा लाभ फक्त त्यांनाच दिला जात आहे जे प्रीपेडवरून पोस्टपेडकडे स्विच करत आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, कंपनी युजर्सला प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये अपग्रेड करण्यासाठी आकर्षित करत आहे.
एअरटेलच्या 449 प्लॅनची माहिती
एअरटेल ऑफरचा फायदा कंपनीच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन ४९९ रुपयांसोबत मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ५० जीबी हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस सेवा मिळणार आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Palace.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/IIFL.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/pune-cricket-stadium.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/bangladesh-flag-1.jpg)
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये सिमकार्ड स्विच केले तर तुम्हाला कंपनीकडून अतिरिक्त 25 जीबी हायस्पीड डेटा मोफत दिला जाईल. म्हणजेच ५० जीबी डेटामध्ये २५ जीबी अतिरिक्त फ्री डेटाचा फायदा मिळणार आहे. एअरटेलच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा मिळणार आहे. डेटा पूर्ण पणे वापरल्यानंतर 2 पैसे प्रति एमबी शुल्क आकारले जाणार आहे.
अतिरिक्त फायदे
तसेच या ऑफरमध्ये युजर्सना डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप, एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियम 3 महिन्यांसाठी मोफत हॅलो ट्यून आणि ब्लू रिबन बॅग सेवा मिळेल. तीन महिन्यांनंतर एअरटेल एक्सट्रीम प्ले सब्सक्रिप्शनसाठी दरमहा ९९ रुपये आकारले जातील, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही सेवा बंद देखील करू शकता.
एअरटेल प्रीपेड ते एअरटेल पोस्टपेडमध्ये अपग्रेड करण्याचे फायदे?
प्रीपेडवरून पोस्टपेडकडे स्विच करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे युजर्संना २०० जीबी डेटा रोलओव्हर, तसेच ओटीटी बेनिफिट्स मिळतात. विशेष म्हणजे 449 रुपयांच्या प्लॅनवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.