मुंबईत एअरटेल 5 जी ट्रायल नेटवर्क लाईव्ह; आधीपेक्षा अधिक डाउनलोड स्पीड मिळवण्यात यश
कंपनी 5 जी टेस्ट ट्रायलदरम्यान अल्ट्रा-लो लेटेन्सीसह 1.2 जीबीपीएसचा स्पीड प्राप्त करण्यास सक्षम झाली आहे. त्याचबरोबर कंपनीने 850 एमबीपीएसच्या आसपास अपलोड स्पीड प्राप्त करण्यासही यश मिळवले आहे.
मुंबई : एअरटेल 5 जी नेटवर्क टेस्ट ट्रायल सोमवारी मुंबईच्या लोअर परळ परिसरामध्ये लाईव्ह करण्यात आले. फिनिक्स मॉलमध्ये नोकिया 5 जी गियरचा वापर करीत टेलिकॉम दिग्गजांद्वारे 5 जी नेटवर्कचे ट्रायल करण्यात आले. एअरटेलच्या ट्रायल नेटवर्कच्या स्पीड टेस्टचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओवरून असे लक्षात येते कि कंपनी 5 जी टेस्ट ट्रायलदरम्यान अल्ट्रा-लो लेटेन्सीसह 1.2 जीबीपीएसचा स्पीड प्राप्त करण्यास सक्षम झाली आहे. त्याचबरोबर कंपनीने 850 एमबीपीएसच्या आसपास अपलोड स्पीड प्राप्त करण्यासही यश मिळवले आहे. (Airtel 5G Trial Network Live in Mumbai; Success in getting higher download speeds than ever before)
ज्यावेळी गुडगावच्या सायबर हब एरियामध्ये 5 जी नेटवर्क ट्रायल करण्यात आली होती, त्यावेळी एयरटेलने 1 जीबीपीएसचा आधीच स्पीड मागे टाकला होता. सर्वात प्रथम ईटी टेलीकॉमने या गोष्टीची माहिती दिली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अशाच प्रकारचा ट्रायल लवकरच कोलकाता शहरात सुरु होणार आहे. या वर्षाच्या जानेवारीत एअरटेल हे एनएसए (नॉन-स्टँड अलेन) नेटवर्क टेक्नोलॉजीच्या माध्यमातून हैदराबादमध्ये 1800 मेगाहर्ट्ज बॅण्डमध्ये एका कमर्शियल नेटवर्कवर 5 जी सर्व्हिसला यशस्वी प्रदर्शित करणारे पहिले टेलिकॉम नेटवर्क बनले.
एअरटेलला मिळाले 4 टेलीकॉम सर्कल्समध्ये स्पेक्ट्रम
टेलिकॉम विभागाने एअरटेलला मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि दिल्लीसह चार भारतीय टेलिकॉम सर्कल्समध्ये स्पेक्ट्रम वितरित केले आहेत. यासंबंधी वृत्तात म्हटले आहे की, एअरटेलच्या 3500 मेगाहर्ट्ज, 28 गीगाहर्ट्झ आणि 700 मेगाहर्ट्जमध्ये 5 जी ट्रायल स्पेक्ट्रम वितरीत करण्यात आले आहेत. रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाला 700 मेगाहर्ट्झ, 3.5 गीगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ बॅंडमध्ये स्पेक्ट्रम अलॉट झाला आहे. टीएसपीमध्ये एअरटेल, रिलायन्स जियो, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएल या कंपन्यांचा सहभाग आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला टेलिकॉम विभागाने टेलिकॉम सर्व्हिस प्रोवाइडर्सला (टीएसपी) भारतामध्ये 5 जी टेक्नोलॉजीचा वापर आणि अप्लिकेशनसाठी टेस्टिंगची परवानगी दिली होती. टीएसपीने ओरिजनल डिव्हाइस मेकर्स आणि टेक्नोलॉजी प्रोवाइडर्स एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉटसमवेत करार केला आहे. टेस्टिंग पीरियड अर्थात चाचणीचा कालावधी सध्या 6 महिन्यांचा आहे. यात उपकरणे खरेदी करणे तसेच सेट अप उभारण्यासाठी 2 महिन्यांच्या कालावधीचा समावेश आहे.
भारतामध्ये लवकरच 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव
भारतीय टेलिकॉम नियामक प्राधिकरण (ट्राय) 5 जी स्पेक्ट्रमसाठी सध्या भारतात लिलावाचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला माहिती तंत्रज्ञानावर स्थायी समितीला सूचित करण्यात आले होतो. कॅलेंडर ईयर 2021 च्या शेवटी किंवा 2020 च्या सुरुवातीपर्यंत भारतात आवश्यक कामकाजासाठी 5G जी नेटवर्क काही मर्यादेपर्यंत सुरु केला जाऊ शकते. (Airtel 5G Trial Network Live in Mumbai; Success in getting higher download speeds than ever before)
कल्याण डोंबिवलीची वाहतूक कोंडीबाबत श्रीकांत शिंदेंची एमएमआरडी आयुक्तांसोबत बैठकhttps://t.co/XXY4Oez1Fw#ShrikantShinde |#MLC |#meeting |#MMRDA
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
इतर बातम्या
June Retail Inflation: महागाईच्या आघाडीवर दिलासादायक बातमी, जूनमध्ये किरकोळ महागाई घटली