Elon musk : भारतात इंटरनेटचे तुफान,  लवकरच Satellite Internet वॉर! एलॉन मस्क याचा मेगा प्लॅन

Elon musk : लवकरच भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. DoT च्या अधिकाऱ्यानुसार, 20 सप्टेंबर रोजी याविषयी एक बैठक होत आहे. जगाचा अब्जाधीश एलॉन मस्क याच्या कंपनीला परवानगी देण्याचा निर्णय यामध्ये होईल.

Elon musk : भारतात इंटरनेटचे तुफान,  लवकरच Satellite Internet वॉर! एलॉन मस्क याचा मेगा प्लॅन
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 2:00 PM

नवी दिल्ली | 29 ऑगस्ट 2023 : भारतात खऱ्या अर्थाने इंटरनेटचे तुफान येण्याची शक्यता आहे. लवकरच भारतात सॅटेलाईट इंटरनेटचा (Satellite Internet) झंझावात अनुभवायला मिळू शकतो. दूरसंचार विभागाची (DoT) त्यादृष्टीने लवकरच एक बैठक होणार आहे. 20 सप्टेंबर रोजी बैठक होईल. या बैठकीत जगातील अब्जाधीश एलॉन मस्क ( Elon Musk) याच्या कंपनीला भारतात सॅटेलाईट इंटरनेट सुरु करण्याचा परवाना द्यायचा की नाही, याचा निर्णय होईल. सध्या एलॉन मस्क याची कंपनी जगातील 32 देशांमध्ये सेवा पुरवत आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, युक्रेनमध्ये दूरसंचार सेवा कोलमडली, तेव्हा सॅटेलाईट इंटरनेटने महत्वपूर्ण भूमिका निभावली. त्यामुळे युक्रेन या युद्धात अजूनही टिकून आहे. एकमेकांशी संपर्क करण्यासाठी या माध्यमाचा मोठा उपयोग झाला आहे. या वृत्तांमुळे जिओसह एअरटेल कंपन्यांना बाजारात मोठा स्पर्धक समोर असेल. त्यांना आता अधिक तयारी करावी लागेल.

स्टारलिंकचा होणार श्रीगणेशा?

एलॉन मस्कची कंपनी स्टारलिंक (Starlink) ही जगभरात सॅटेलाईट इंटरनेटची सेवा पुरवते. सध्या जगातील 32 देशांमध्ये ही सेवा आहे. 20 सप्टेंबर रोजी बैठक होईल. भारतीय दूरसंचार विभागाने परवाना दिल्यास लवकरच ही सेवा भारतात सुरू होऊ शकते. स्टारलिंकनुसार, त्यांना नियमीत परवाना आणि अधिकृत परवानगीची अद्याप प्रतिक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

स्टारलिंकने दिली ही माहिती

स्टारलिंकने या घाडमोडीचे अपडेट दिले आहे. त्यानुसार, स्टारलिंकने भारतीय दूरसंचार विभागाकडे परवान्यासाठी अर्ज केला आहे. यामध्ये ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशनसाठी अर्ज केला आहे. सॅटेलाईट परवान्यासाठी (GMPCS) परवानगी मागण्यात आली आहे. सध्या जगातील 32 देशांमध्ये स्टारलिंक ही सेवा पुरवते.

कंपनीला अजून प्रतिक्षा

2021 मध्ये स्टारलिंकने भारतात प्री-बुकिंग चॅनलची सुरूवात केली आहे. पण केंद्र सरकारने त्यांना त्यासाठी परवाना घेण्यासाठी बाध्य केले. त्यामुळे स्टारलिंकचे गाडे आडले. स्टारलिंकनुसार, त्यांना नियमीत परवाना आणि अधिकृत परवानगीची अद्याप प्रतिक्षा आहे. एअरटेलने वनवेब आणि जिओने जीएमपीसीएस परवान्यासाठी अर्ज केला आहे.

परवाना आवश्यकच

याविषयी दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्याने एक वक्तव्य केले आहे. त्यानुसार, कोणत्याही कंपनीला अशी सेवा देण्यापूर्वी रीतसर पूर्वपरवानगी मिळवणे आवश्यक आहे. Skype च्या बाबतीत ही गोष्ट समोर आली होती. कोणतीच कंपनी नियंत्रणाबाहेर असेल तर तिला अधिकृत परवाना कसा देता येईल आणि त्यांची सेवा अधिकृत कशी करता येईल, असा सवाल विचारण्यात आला.

ओटीटी साठी परवाना आवश्यक

ओटीटी सेवा (Over-The-Top) सुद्धा नियंत्रणा खाली आणणे आवश्यक आहे. भारतीय वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी ते महत्वाचे असल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले. जर ओटीटी प्लेयर्स परवाना प्रक्रियेचे पालन करतील तर त्यांना भारतीय कायद्याचे, नियमांचे पालन करावे लागणार आहे.

एअरटेल आणि जिओ पण मैदानात

स्टारलिंकसोबत एअरटेल आणि जिओ पण भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. एअरटेलने वनवेब आणि जिओने जीएमपीसीएस परवान्यासाठी अर्ज केला आहे. पुढील प्रक्रियेत या कंपन्यांना सॅटेलाईट स्पेक्ट्रम खरेदी करणे आवश्यक आहे. पण यामुळे सध्या भारतात सॅटेलाईट इंटरनेटची स्पर्धा सुरु झाली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.