Airtel : एअरटेलचा स्पेशल रिचार्ज, मात्र 148 रुपयांमध्ये डेटा अन्‌ ओेटीटीची मजा लूटा

एअरटेलकडून अनेक आकर्षक योजना ऑफर करण्यात येत आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटासोबत ओटीटी सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. युजर्स त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सहजपणे ॲक्सेस मिळवू शकतील.

Airtel : एअरटेलचा स्पेशल रिचार्ज, मात्र 148 रुपयांमध्ये डेटा अन्‌ ओेटीटीची मजा लूटा
Airtel
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 8:39 AM

मुंबई : टेलीकॉम कंपन्यांनी आता रिचार्ज योजनांना बंडल प्लॅनमध्ये रूपांतरित केले आहे. म्हणजेच, आता या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ टेलिकॉम फायदेच नाहीत तर इतरही सुविधांचा लाभ घेता येणार आहे. अलीकडच्या काळात, कंपन्यांनी रिचार्जसह ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरही युजर्सना ॲक्सेस मिळवून देणे सोपे केले आहे. असाच एक स्वस्त प्लॅन एअरटेलने ऑफर (new plan) केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटासह (data) ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रवेश करता येईल. कंपनीची ही योजना अगदी सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे. या लेखातून एअरटेलच्या नव्या योजनांबाबत माहिती घेऊ या.

एअरटेल डेटा व्हाउचर

एअरटेल 148 रुपयांचे व्हाउचर ऑफर करत आहे. या रिचार्जमध्ये युजर्सना FUP मर्यादेसह 15GB डेटा मिळतो. हे 4G डेटा व्हाउचर आहे, म्हणजे तुम्हाला अधिक डेटा हवा असल्यास, तुम्ही ते अॅड-ऑन म्हणून वापरू शकता. हे व्हाउचर वापरकर्त्यांच्या सध्याच्या पात्र प्रीपेड प्लॅनमध्ये जोडले जाईल. या रिचार्जची खासियत म्हणजे त्यात उपलब्ध डेटा तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मचा ॲक्सेसदेखील मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

ओटीटीचा ॲक्सेस मिळणार

यामध्ये यूजर्सला एअरटेल एक्सस्ट्रीम मोबाईलमध्ये ॲक्सेस मिळतो. युजर्स 28 दिवसांसाठी या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतात. Airtel Xstream Mobile वर, युजर्स कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म निवडू शकतात आणि त्यातील कंटेंट डाउनलोड करू शकतात. दरम्यान, कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यासाठी, युजर्सना Airtel Xstream मोबाइल अॅप डाउनलोड करावे लागणे आवश्‍यक आहे.

एकाच प्लॅटफॉर्मचा कंटेंट दिसणार

दरम्यान, युजर्सनी हे लक्षात ठेवावे लागेल की ते या प्लॅनमध्ये फक्त एकाच प्लॅटफॉर्मचा कंटेंट पाहू शकणार आहेत. ही सुविधा 28 दिवसांसाठी उपलब्ध असेल. प्लॅटफॉर्मवर तुम्हाला SonyLiv, LionsgatePlay, Eros Now, HoiChoi यासह अनेक पर्याय मिळतील. एअरटेलच्या या रिचार्ज व्हाउचरमध्ये उपलब्ध डेटाची वैधता युजर्सच्या विद्यमान प्लॅन सारखीच असेल. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश फक्त 28 दिवसांसाठी उपलब्ध असेल. तुम्ही Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर Airtel X-Stream मोबाइल अॅप डाउनलोड करू शकता. कंपनी 118 रुपयांचे डेटा व्हाउचर देखील देत आहे, ज्यामध्ये तुम्हाला 12GB डेटा मिळेल.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.