Airtel Vs JioFiber Vs BSNL: 50Mbps स्पीडसह 500 रुपयांपेक्षा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन, जाणून घ्या बेस्ट ऑप्शन्स
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (ISPs) जसे की Airtel XStream, JioFiber आणि BSNL Bharat 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत ब्रॉडबँडसह इतर प्लॅन्स ऑफर करत आहेत.
मुंबई : इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (ISPs) जसे की Airtel XStream, JioFiber आणि BSNL Bharat 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत ब्रॉडबँडसह इतर प्लॅन्स ऑफर करत आहेत. हे एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन्स अॅप-स्पेशल स्ट्रीमिंगसह येतात, त्यापैकी काही OTT लाभांसह येत नाहीत. (Airtel, JioFiber, BSNL Broadband plan with 50Mbps internet speed under 500 rupees)
बहुतेक प्लॅन कॉलिंग बेनेफिट्ससह येतात. काही ISP मासिक आधारावर मेंबरशिप घेण्यासाठी 500 रुपयांपेक्षा स्वस्तात बेसिक स्कीम्सचादेखील अॅक्सेस देत नाहीत, परंतु सेमी-अॅन्युअल किंवा वार्षिक आधारावर मेंबरशिप घेतली तर 500 रुपयांपेक्षा कमी खर्चात चांगले प्लॅन्स मिळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांच्या एंट्री लेव्हल ब्रॉडबँड स्कीम्सबद्दल माहिती देत आहोत.
JioFiber : 399 रुपयांचा ब्रॉडबँड प्लान
हा प्लॅन 30Mbps स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट ऑफर करतो. हा प्लॅन कोणत्याही OTT सबस्क्रिप्शनसह येत नाही परंतु यात अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळते.
एयरटेल एक्सस्ट्रीम फायबरचा 499 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
एअरटेल अनलिमिटेड ब्रॉडबँड प्लॅन 499 रुपयांमध्ये दिला जात आहे. या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 40 Mbps स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट आणि एअरटेल एक्सस्ट्रीम, विंक म्युझिक आणि शॉ अकादमीची मेंबरशिप मिळते. Airtel Xstream मेंबरशिपद्वारे Voot Basic, Eros Now, Hungama Play, Shemaroo M आणि Ultra चा अॅक्सेस मिळतो.
BSNL भारत फायबरचा 449 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन
या प्लॅनला फायबर बेसिक प्लॅन असेही म्हणतात. या अंतर्गत, 3 टीबी स्पीड किंवा 3300 जीबी एफयूपी लिमिटपर्यंत 30 एमबीपीएसची स्पीड ऑफर केली जात आहे. FUP लिमिट संपल्यानंतर, 2Mbps पर्यंत स्पीड मिळेल. या प्लॅनची निवड करणाऱ्या ग्राहकांना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा मिळेल.
BSNL भारत फायबरचा 100GB CUL ब्रॉडबँड प्लॅन
हा प्लॅन दर महिन्याला 100GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो ज्यानंतर स्पीड 50 Mbps च्या बँडविड्थसह 2 Mbps पर्यंत खाली येतो. प्लॅनची किंमत 499 रुपये आहे.
इतर बातम्या
WhatsApp News Emoji : व्हाट्सअॅपवर चॅटिंगची मजा होणार आणखी ‘रंगतदार’, इमोजीमध्ये आणणार व्हेरिएशन
Google Pay New Feature : ‘गुगल पे’मध्ये आलं नवं फिचर, आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं
गुगल मॅप्सचं Area Busy फीचर, कोरोना काळात तुम्हाला गर्दीपासून दूर राहण्यासाठी मदत करेल
(Airtel, JioFiber, BSNL Broadband plan with 50Mbps internet speed under 500 rupees)