Airtel Plan : महागाईची झळ मोबाईल बिलांपर्यंत, रिचार्ज 501 रुपयांपर्यंत महागणार, एअरटेलने किंमती वाढवल्या
दूरसंचार सेवा प्रदाता (टेलिकॉम सर्विस प्रोवाइडर) कंपनी भारती एअरटेलने (Bharti Airtel) प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यामध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
नवी दिल्ली : दूरसंचार सेवा प्रदाता (टेलिकॉम सर्विस प्रोवाइडर) कंपनी भारती एअरटेलने (Bharti Airtel) प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यामध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 26 नोव्हेंबरपासून नवीन टॅरिफ दर लागू होतील. एअरटेलनंतर आता इतर टेलिकॉम कंपन्याही दर वाढवू शकतात. (Airtel prepaid plans will costlier from November 26, other telcom Companies can hikes tariffs by 20-25 percent)
कंपनीने सांगितले आहे की, त्यांचा 79 रुपयांचा बेस प्लान आता 99 रुपयांचा झाला आहे. यात 50 टक्के जास्त टॉकटाइम मिळेल. त्याचप्रमाणे 149 रुपयांचा प्लॅन आता 179 रुपयांना मिळणार आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 28 दिवसांच्या वैधतेसह 2 GB डेटा मिळेल. त्याचप्रमाणे 219 रुपयांचा प्लॅन आता 265 रुपयांचा झाला आहे. यामध्ये, 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100 एसएमएस आणि 1 जीबी डेटा उपलब्ध असेल.
एयरटेल विरुद्ध जियो
एअरटेल बेस प्लॅन 20 रुपयांनी महाग झाला आहे, तर सर्वात महागड्या प्लानमध्ये 501 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात महागडा प्लान 2498 रुपयांचा होता, जो आता 2999 रुपयांचा झाला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 2 जीबी डेटा एका वर्षासाठी उपलब्ध आहे.
या दरवाढीनंतर एअरटेलचे पीपेड प्लॅन रिलायन्स जिओपेक्षा 30 ते 50 टक्के महाग झाले आहेत. Jio च्या 2GB डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत 129 रुपये आहे, तर Airtel च्या याच प्लॅनची किंमत 179 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, Jio च्या 84 दिवसांची वैधता आणि 1.5 GB प्रतिदिन डेटा असलेल्या प्लॅनची किंमत 555 रुपये आहे, तर Airtel ग्राहकांना यासाठी 719 रुपये मोजावे लागतील.
दर आणखी वाढू शकतात
एअरटेलने एका निवेदनात म्हटले आहे की अॅव्हरेज रेवेन्यू पर यूजर (ARPU – प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) 200 रुपये असावा आणि नंतर तो 300 रुपयांपर्यंत वाढवावा. जेणेकरून गुंतवलेल्या भांडवलावर कंपन्यांना वाजवी परतावा मिळू शकेल. हेल्दी बिझनेस मॉडेलसाठी (healthy business model) हे आवश्यक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. एआरपीयू या स्तरावर आल्याने नेटवर्क आणि स्पेक्ट्रमसाठी आवश्यक गुंतवणूक उपलब्ध होईल, असेही कंपनीने म्हटले आहे. यासोबतच कंपनीला देशात 5G सेवा सुरू करण्यासाठी संसाधने मिळू शकतील. त्यामुळे कंपनीने नोव्हेंबरमध्ये दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
एअरटेलनंतर इतर कंपन्याही टॅरिफ दर बदलू शकतात. विशेषत: वोडाफोन आयडिया कंपनी यात मोठे बदल करु शकते, ही कंपनी मोठ्या कर्जाशी झुंजत आहे. ही कंपनी त्यांचे प्रीपेड प्लॅन्स महाग करू शकते. तथापि, कंपन्यांनी त्यांचे दर वाढवल्यामुळे, सेवांच्या गुणवत्तेकडे लक्ष केंद्रीत केले जाऊ शकते.
इतर बातम्या
जगातील पहिला 18GB रॅम स्मार्टफोन ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या याची खासियत
तुम्हीही फेसबुक, गूगल अकाऊंटसाठी ‘हा’ पासवर्ड वापरत नाही ना? काही सेकंदात होऊ शकतो हॅक
आता गूगल पे सह पैशाचे व्यवहार सोपे होणार, मिळतील उत्कृष्ट वैशिष्ट्ये
(Airtel prepaid plans will costlier from November 26, other telcom Companies can hikes tariffs by 20-25 percent)