AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel Recharge Plan : स्वस्त रिचार्जचा प्लॅन पाहिजे, रोज डेटाही अधिक हवा, जाणून घ्या स्वस्त आणि मस्त प्लॅन

एअरटेलच्या 296 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 25 GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस आणि 30 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्सची सुविधाही उपलब्ध आहे. याविषयी तुम्ही अधिक जाणून घ्या...

Airtel Recharge Plan : स्वस्त रिचार्जचा प्लॅन पाहिजे, रोज डेटाही अधिक हवा, जाणून घ्या स्वस्त आणि मस्त प्लॅन
Image Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 6:04 AM

मुंबई : मोबाईल (Mobile) रिचार्ज हा दर महिन्याचा खर्च बनलाय. त्यामुळे स्वस्त रिचार्ज प्लॅन मिळावा, असं प्रत्येकाला वाटत असतं, एअरटेल, आयडीयासह टेलिकॉम कंपन्यांकडून स्वस्त रिचार्ज कसा मिळेल. याकडे पाहिलं जातं. त्यातही डेटा अधिक मिळाल्यास आणि त्याची वैधता अधिक असल्याच ग्राहक त्या प्लॅनला जास्त पसंती देतात. भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये (Indian Telecom Service) एअरटेल (Airtel) सतत जिओला (Jio) आव्हान देत आहे. Airtelनं वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रीपेड टॅरिफ प्लॅनमध्ये देखील बदल केले आहेत. ज्यामध्ये 31 दिवसांसाठी अधिक डेटा आणि अधिक सोयीसह योजनांचा समावेश आहे. तुम्हीही एअरटेलचे असेच प्लान शोधत असाल तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला एअरटेलच्या 31 दिवसांच्या वैधतेसह आणि अधिक सुविधांसह येणाऱ्या प्लॅनची ​​माहिती देणार आहोत. जाणून घेऊया…

319 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या 319 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 2 GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळतात. प्लॅनची ​​वैधता 31 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये Apollo 24/7 Circle, Wink Music आणि मोफत HelloTune देखील आहेत. जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल आणि मोफत संगीताचा आनंद घेऊ इच्छित असाल तर हा प्लान तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. या प्लॅनसह, तुम्हाला Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.

एअरटेलच्या 296 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या 296 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 25 GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस आणि 30 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्सची सुविधाही उपलब्ध आहे. ही योजना Apollo 24/7 Circle, Wink Music आणि Free HelloTune सह देखील येते.

109 रुपयांच्या प्लॅन

या यादीतील सर्वात स्वस्त एअरटेल प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर 109 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200 एमबी डेटा मिळेल. प्लॅनमध्ये 99 रुपयांचा टॉक टाईम देखील मिळेल. या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय 109 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2.5 पैसे प्रति मिनिट दराने लोकल आणि एसटीडी कॉल करता येतात.

वरील मोबाईल रिचार्जचे प्लॅन आपण बघितले आहेत. यामुळे आपल्याला स्वस्त रिचार्जचा प्लॅन मिळवता येऊ शकतो. विशेष म्हणजे यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चही वाचवता येऊ शकतो. प्लॅन बघून स्वस्त प्लॅन खरेदी केल्यास हे सर्व शक्य आहे. त्यामुळे वरील प्लॅन बघा आणि यापैकी तुम्हाला कोणता योग्य वाटतो, तो प्लॅन बिनधास्त निवडा.

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.