जिओ घेता की एअरटेल? 84 दिवसांच्या वैधतेचा खास प्लॅन, ऑफर्स जाणून घ्या

| Updated on: Jan 03, 2025 | 5:17 PM

तुम्ही जर Airtel किंवा Jio चे सिमकार्ड वापरत असाल तर तुम्हाला ही माहिती आवडेल. या दोन्ही टेलिकॉम कंपन्या ११९९ रुपयांत ८४ दिवसांची वैधता देणारा प्लॅन ऑफर करतात, यात डेटा, कॉलिंग आणि ओटीटी सब्सक्रिप्शनचाही समावेश आहे.

जिओ घेता की एअरटेल? 84 दिवसांच्या वैधतेचा खास प्लॅन, ऑफर्स जाणून घ्या
जिओ, एअरटेल
Follow us on

Jio आणि Airtel या दोन्ही टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांचे नवीन प्लॅन नेहमी अपडेट करत असतात. Airtel आणि Jio या दोन्ही टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी १,१९९ रुपयांचा प्लॅन ऑफर करतात, हा प्लॅन ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. दोन्ही प्लॅनची किंमत समान असली तरी त्यातून मिळणारे फायदे वेगवेगळे आहेत. त्याच किंमतीत कोणता प्लॅन तुमच्यासाठी चांगला आहे, कोणता नाही याबद्दल तुम्ही हा संपूर्ण तपशील वाचा.

एअरटेलचा १,१९९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या १,१९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला काय मिळतं याबद्दल बोलायचं झालं तर हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक फायदे मिळत आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २१० जीबीचा डेटा मिळतो. तर डेली डेटा २.५ जीबी देण्यात आलेला आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांच्या मनोरंजनाची ही काळजी घेत असून या प्लॅनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईम आणि विंकचे सब्सक्रिप्शन देखील फ्री मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

जिओचा ८४ दिवसांचा व्हॅलिडिटी प्लॅन

जिओच्या १,१९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. तर त्याची डेली डेटा लिमिट ३ जीबी आहे. डेटावर नजर टाकली तर एअरटेल जिओपेक्षा जास्त डेटा देत आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली १०० एसएमएस फ्री मिळतात. या प्लॅनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचे सब्सक्रिप्शन फ्री देण्यात आलेले आहे.

जिओच्या दुसऱ्या ८४ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनबद्दल सांगायचे झाल्यास वर नमूद केलेल्या प्लॅनपेक्षा तो थोडा महाग म्हणजे १,७९९ रुपये इतका आहे, पण या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

कोणता प्लॅन घेणे फायदेशीर आहे?

दोन्ही टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना नव्या प्लॅनमधून सर्वोत्तम फायदे देत आहेत. पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार या दोन प्लॅनपैकी एक प्लॅन निवडू शकता. जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर तुम्ही जिओच्या प्लॅनकडे जाऊ शकता. जर तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मोफत हवे असेल तर तुम्ही एअरटेलच्या प्लॅनकडे वळू शकता.