WhatsApp वर अॅमेझॉनकडून ऑफरचा मेसेज तर सावधान! वाचा काय आहे सत्य
अनेक यूजर्सला हा मेसेज मिळाला आहे. www.amazon.com वर प्रत्येकासाठी एक मोफत भेट आहे अशा मेसेजमुळे नेटकरीही आनंदी होऊन लिंकवर क्लिक करत आहेत.
नवी दिल्ली : सध्या एक बनावट व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल (WhatsApp viral message) होत आहे. अॅमेझॉन आपल्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत भेटवस्तू (Free Gifts) देणार असल्याचं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे. सगळ्यात विशेष म्हणजे भेट म्हणून कंपनी स्मार्टफोन (Smartphones) देऊ करत आहे. अनेक यूजर्सला हा मेसेज मिळाला आहे. www.amazon.com वर प्रत्येकासाठी एक मोफत भेट आहे अशा मेसेजमुळे नेटकरीही आनंदी होऊन लिंकवर क्लिक करत आहेत. पण याबद्दल एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. (alert if you received message from amazon on whatsapp about offers online fraud)
जेव्हा यूजर्स या मेसेजवर क्लिक करतात तेव्हा “अभिनंदन, आमच्या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी आपली निवड झाली आहे. ‘आजच्या मोफत भेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे Huawei Mate 40 Pro 5G Full Netcom 8GB +’ . दर बुधवारी आम्ही याप्रमाणे 100 वापरकर्ते निवडतो आणि त्यांना आश्चर्यकारक बक्षिसे जिंकण्याची संधी देतो. या सर्वेक्षणचा हेतू आमच्या वापरकर्त्यांचा आहे.
द्यावी लागतील या चार प्रश्नांची उत्तरे
अॅमेझॉन सर्वेक्षणांद्वारे वापरकर्त्यांसाठी सर्विस क्वालिटी सुधारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सर्वेक्षण करण्यासाठी टाइमर सेट केला आहे. ज्यात लिंग, वय, अॅमेझॉन सर्व्हिस क्वालिटी आणि ती व्यक्ती वापरत असलेले स्मार्टफोन प्लॅटफॉर्म असे चार प्रश्न आहेत. ही माहिती दिल्यानंतर, वापरकर्त्यांना मोफत भेट घेण्यासाठी एक बॉक्स उघडावा लागेल. ज्यानंतर त्याला हा संदेश पाच व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा इतर 20 मित्रांसह सामायिक करण्यास सांगितले जाते.
सायबर गुन्हेगार नजर ठेवून
तज्ज्ञांच्या मते हा एक बनावट संदेश आहे. जेथे सायबर गुन्हेगार आपले वैयक्तिक तपशील शोधू शकतात. ते आपल्याला कॉल करण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी किंवा ओळख चोरीसाठी डेटा वापरू शकतात. यामुळे असा मेसेज आला तर त्याची आधी खात्री करा. कारण अॅमेझॉनने याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांच्या साईटवर यासंबंधी कोणतीही जाहिरात नाही.
असे मेसेज नेहमी टाळा
तज्ञांच्या मते, अशा संदेशावरील मेसेजवर क्लिक करणे टाळा. हे सायबर गुन्हेगारांचे जाळे असू शकते. हॅकर्स आपला फोन किंवा कंम्प्यूटर हॅक करण्यासाठी याचा वापर करू शकतात. जर तुम्हाला एखाद्या अज्ञात क्रमांकाचा संदेश मिळाला तर तो घोटाळा म्हणून व्हॉट्सअॅपवर नोंदवा आणि त्याला ब्लॉक करा. (alert if you received message from amazon on whatsapp about offers online fraud)
संबंधित बातम्या –
Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे दिलासा, वाचा तुमच्या शहरातले दर
1 लाख गुंतवून होईल 1 लाख 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं
SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…
(alert if you received message from amazon on whatsapp about offers online fraud)