Amazfit Bip U Pro स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अ‍मेझफिटने शुक्रवारी जाहीर केले की, ते भारतात 5,000 रुपयांच्या किंमतीत नवीन स्मार्टवॉच Amazfit Bip U Pro लॉन्च करणार आहेत.

Amazfit Bip U Pro स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Amazfit Bip U Pro
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 7:59 AM

मुंबई : स्मार्ट वेअरेबल ब्रँड अ‍मेझफिटने शुक्रवारी जाहीर केले की, ते भारतात 5,000 रुपयांच्या किंमतीत नवीन स्मार्टवॉच बिप यू प्रो (Amazfit Bip U Pro) लॉन्च करण्यासाठी सज्ज आहेत. पुढील आठवड्यात हे स्मार्टवॉच लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. हे स्मार्टवॉच Amazon आणि कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर ब्लॅक, पिंक आणि ग्रीन या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. (Amazfit Bip U Pro India launch set for April second week)

या स्मार्टवॉचमध्ये 1.43 इंचाच्या एचडी टीएफटी-एलसीडी कलर डिस्प्लेसह 2.5 डी कॉर्निंग गोरिल्ला 3 देण्यात येईल. यामध्ये, युजर्सना त्यांना हवा तो फोटो बॅकग्राऊंडसाठी अपलोड करता येईल. यामध्ये 50 वॉच फेस देण्यात आले आहेत. त्यापैकी कोणताही एक वॉचफेस तुम्ही निवडू शकता. अमेझफिट बिप यू प्रो हे स्मार्टवॉच अॅलेक्सा आणि जीपीएससह सुसज्ज आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आपण आपल्या अ‍ॅमेझॉन बिप यू प्रो वर Amazon अॅलेक्साशी देखील बोलू शकता, ज्यामुळे युजर्सना व्हॉईस इंटरॅक्शन, म्युझिक प्ले करणे, अलार्म, वेदर फोरकास्ट, ट्रॅफिक अपडेट, स्पोर्ट्स अपडेट आणि अन्य रियल-टाइम अपडेट मिळेल.

अमेझफिट बिप यू प्रो डेली ट्रॅकिंग अॅक्टिव्हिटी आणि 60 हून अधिक स्पोर्ट्स मोडसह सुसज्ज असेल ज्यात धावणे, सायकलिंग, योगा, नृत्य, स्केटिंग, किकबॉक्सिंग आणि बरेच काही समाविष्ट आहे. हे डिव्हाइस आपल्याला अधिक प्रभावीपणे कार्य करण्यात मदत करण्यासाठी रियल-टाइम क्रिटिकल मीट्रिकचे वितरण करते.

मोबाईलवरील प्रत्येक नोटिफिकेशन पाहता येणार

स्मार्टवॉचला तुमची स्थिति (पोझिशन) दर्शवण्यासाठी हे वॉच अॅपशी कनेक्ट केलं जाऊ शकतं. हे वॉच फुट स्टेप्स, कॅलरीज, डिस्टन्ससारख्या आपल्या देनंदिन अॅक्टिव्हिटीज ट्रॅक करतं. यामुळे आपल्याला अधिक अॅक्टिव्ह राहण्यासाठी प्रेरणा मिळते. कंपनीने म्हटले आहे की, अमेझफिट बिप यू प्रो तुमच्या स्मार्टफोनवर विविध अॅप्सद्वारे टेक्स्ट मेसेज, ई-मेल आणि नोटिफिकेशन्सना सिंक करु शकतं.

8 स्पोर्ट्स मोड आपोआप ओळखणार

अलीकडेच कंपनीने भारतात Amazfit T-Rex Pro स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. टी-रेक्स प्रोमध्ये नेव्हिगेशनसाठी एक गोल डायल आणि चार फिजिकल बटणे आहेत. स्मार्टवॉच 10ATM वॉटर रेजिस्टंट आहे. हे वॉच ब्लड ऑक्सिजन सॅचुरेशन (SpO2) मॉनिटर करु शकतं. यात 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि नवीन एक्सरसाइज वर्कआउट रिकॉग्निशन अल्गोरिदम आहे, जे आठ स्पोर्ट्स मोड आपोआप ओळखतं आणि वर्कआऊट डेटा रेकॉर्ड करतं. या स्मार्टवॉचचे वजन 59.4 ग्रॅम आहे आणि कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.0 समाविष्ट आहे. Amazfit T-Rex Pro RTOS ऑपरेटिंग सिस्टमवर चालतं आणि Android 5.0 किंवा आयओएस 10.0 किंवा त्यापेक्षा पुढील सिस्टिमवर चालणार्‍या स्मार्टफोनला सपोर्ट करतं.

इतर बातम्या

भारतात OnePlus 9 Pro ची विक्री सुरु, कंपनीकडून शानदार ऑफर

12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

OnePlus 9 ला टक्कर देणाऱ्या Vivo X60 Pro मध्ये काय आहे खास?

(Amazfit Bip U Pro India launch set for April second week)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.