4GB रॅम, 64GB स्टोरेज, 7,499 रुपयात शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याची शेवटची संधी

तुम्हाला जर बेस्ट परफॉर्मन्ससह स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. (Amazon Fab Phones Fest)

4GB रॅम, 64GB स्टोरेज, 7,499 रुपयात शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याची शेवटची संधी
Coolpad Cool 5
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 4:37 PM

मुंबई : तुम्हाला जर बेस्ट परफॉर्मन्ससह स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण अमेझॉन फॅब फोन्स फेस्ट (Amazon Fab Phones Fest) सेलमध्ये 7,499 रुपयांमध्ये तुम्ही एक चांगला स्मार्टफोन विकत घेऊ शकता. Coolpad Cool 5 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. कूलपॅडच्या या फोनवर अमेझॉनच्या सेलमध्ये 1500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. (Amazon fab phones fest : coolpad cool 5 smartphone in just Rs 7499)

खरं तर अमेझॉन फॅब फोन्स फेस्ट सेलचा आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही हा स्मार्टफोन आज खरेदी केला तर तुम्ही हा स्मार्टफोन 7499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. त्यानंतर तुम्हाला या फोनसाठी 8,999 रुपये मोजावे लागतील. या सेलमध्ये आपल्याला सर्व कूलपॅड फोनवर बम्पर सूट मिळू शकते. या सेलमध्ये कंपनी आपल्या सर्व फोनवर भारी सूट देत आहे.

7,499 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या कूलपॅड कूल 5 स्मार्टफोनच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचं स्क्रीन रिझोल्यूशन 720 × 1520 पिक्सल इतकं आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 9.0 Pie वर चालतो आणि त्यात मीडियाटेक हेलियो पी 22 प्रोसेसर (Mediatek Helio P22) देण्यात आला आहे. याशिवाय या फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 4000 mAh बॅटरी मिळेल जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. याशिवाय या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी सेन्सर 13 मेगापिक्सलचा आणि दुसरा 2 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनवरही डिस्काऊंट

अमेझॉन फॅब फोन्स फेस्ट 22 मार्चपासून सुरु झाला आहे, आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. या मर्यादित सेलमध्ये स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंतच्या सवलतीसह आपल्याला बर्‍याच ऑफर्सचा लाभ मिळू शकतो. कूलपॅड कूल 5 व्यतिरिक्त आपण कूलपॅड कूल 6 सारख्या पॉप अप कॅमेर्‍याने सुसज्ज असलेल्या उत्कृष्ट स्मार्टफोनवर बम्पर सूट मिळवू शकता. अशा परिस्थितीत, आपल्याला अधिक चांगला कॅमेरा, अधिक स्टोरेज, मोठा डिस्प्ले आणि पॉवरपुल बॅटरीसह स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर अमेझॉन फॅब फोन फेस्ट ही एक चांगली संधी ग्राहकांसमोर उपलब्ध आहे.

इतर बातम्या

Realme 8 series मधील स्मार्टफोन्सवर 1999 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

जबरदस्त कॅमेरा, 256GB स्टोरेजसह OnePlus 9 आणि 9 Pro बाजारात, किंमती…

मोबाईल फुटला, डिस्प्ले गेला, डोन्ट वरी, हा 7 हजाराचा स्मार्टफोन घ्या आणि निश्चिंत राहा

(Amazon fab phones fest : coolpad cool 5 smartphone in just Rs 7499)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.