75 हजारांचा Samsung 5G स्मार्टफोन अवघ्या 39 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील?

या सेल दरम्यान काही स्मार्टफोन खूप स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे, त्यापैकी एक सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई हा फोन आहे. Amazon वर सूचीबद्ध माहितीनुसार, हा सॅमसंग 5G स्मार्टफोन फक्त 39,889 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो

75 हजारांचा Samsung 5G स्मार्टफोन अवघ्या 39 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील?
Samsung Galaxy S20 FE 5G (Photo : Amazon)
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 8:30 AM

मुंबई : सॅमसंग जवळजवळ प्रत्येक सेगमेंटमध्ये आपले स्मार्टफोन विकतो. पण त्यांचे प्रीमियम स्मार्टफोन इतरांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे आहेत, ज्याची किंमत देखील खूप जास्त आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका डीलबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये एक नवीन स्मार्टफोन जवळपास अर्ध्या कमी किंमतीत मिळत आहे. (buy Samsung Galaxy S20 FE 5G smartphone in 39889 rupees)

ई-कॉमर्स साइट Amazon ने भारतात मोबाईल आणि टीव्ही सेव्हिंग डे सेलची (Mobile and TV Savings Days) घोषणा केली आहे. Amazon च्या या नवीन सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीजवर अनेक डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. सोबतच कंपनी प्रीमियम फोन पार्टी इव्हेंटमध्ये (Premium Phones Party Event) 12 जानेवारीपर्यंत सर्वात कमी किमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत आहेत. ग्राहकांना फ्लॅगशिप फोनवर 40% पर्यंत सूट आणि Amazon कूपनसह 5000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

अमेझॉनवरील सेल दरम्यान काही स्मार्टफोन खूप स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे, त्यापैकी एक सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई हा फोन आहे. Amazon वर सूचीबद्ध माहितीनुसार, हा सॅमसंग 5G स्मार्टफोन फक्त 39,889 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो आणि या फोनची किंमत 74999 रुपये इतकी आहे. हा फोन 5G सपोर्ट, स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि 120hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई 5 जी स्पेसिफिकेशन

सॅमसंग S20 FE 5G हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 856 SoC वर चालतो. डुअल-सिम (नॅनो + ईएसआयएम) डिव्हाईस अँड्रॉईड 11 वर सॅमसंगच्या वन युआय 3.0 वर चालते. यामध्ये 6.5 इंचांचा फुल-एचडी + (2,400×1,080 पिक्सल) सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 84.8 टक्के आहे आणि पिक्सल डेनसिटी 407ppi आहे.

फोनची वैशिष्ट्ये

सॅमसंग S20 FE 5G वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी आणि एक युएसबी टाईप-सी पोर्टसह येते. मात्र यामध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅकचा अभाव आहे. फोनमध्ये सेंसरमध्ये एक्सेलेरोमीटर, कंपास, फिंगरप्रिंट सेंसर, जायरो सेंसर, हॉल सेंसर, लाईट सेंसर आणि एक निकटता सेंसरचा समावेश आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी बॅकअप आहे, जे 15W फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोन सॅमसंगच्या पावरशेयरला सपोर्ट करते, सपोर्टेड डिव्हाईससह वायरलेस पावर शेअर करण्याची सुविधा आहे. फोनचे माप 159.8×74.5×8.4 मिमी आहे आणि वजन 190 ग्राम आहे.

Samsung Galaxy S20 FE चा कॅमेरा सेटअप

सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफईच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आहे, जो ड्युअल पिक्सेल सेन्सर आहे. सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. यातील तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. यात 30X स्पेस झूमचे वैशिष्ट्य आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Google | वृत्त संकलनातील एकाधिकारशाहीचा दुरुपयोग, गुगलविरोधात भारतात चौकशीचे आदेश

शानदार ऑफर! Oppo चा 12 हजारांचा स्मार्टफोन 9 हजार रुपयांत खरेदीची संधी

कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत

(buy Samsung Galaxy S20 FE 5G smartphone in 39889 rupees)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.