AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट्सअपचं सर्वात मोठं फीचर बंद होण्याच्या मार्गावर

अमेरिकी मॅगजीन Politico च्या रिपोर्ट नुसार, अमेरिकेतील ट्रम्प सरकार इंड टू इंड एन्क्रिप्शन सिस्टम बॅन करण्याचा विचार करत आहे. जगात सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp हा एन्क्रिप्शन या सिस्टममुळे ओळखला जातो.

व्हॉट्सअपचं सर्वात मोठं फीचर बंद होण्याच्या मार्गावर
Follow us
| Updated on: Jul 01, 2019 | 6:19 PM

मुंबई : अमेरिकी मॅगजीन Politico च्या रिपोर्ट नुसार, अमेरिकेतील ट्रम्प सरकार एंड टू एंड एन्क्रिप्शन सिस्टम बॅन करण्याचा विचार करत आहे. जगात सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp हा एन्क्रिप्शन या सिस्टममुळे ओळखला जातो. याशिवाय अॅपलचे मेसेज आणि फेस टाईमही एंड टू एंड एन्क्रिप्शनवर आधारीत आहे. पण ट्रम्प सरकार ही सिस्टम हटवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एंड टू एंड एन्क्रिप्शन सिस्टम जर Whatsapp  मधून हटवली, तर याचा मोठा फटका Whatsapp , आयफोन सारख्या मोठ्या कंपन्यांना बसणार आहे. एंड टू एंड एन्क्रिप्शनमुळे प्रत्येक यूजर्सला प्रायव्हसी मिळते. पण आता हीच सिस्टम बंद होणार असेल, तर यूजर्सही प्रायव्हेसी नसलेले अॅप अनइन्स्टॉल करतील.

एंड टू एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय?

एंड टू एंड एन्क्रिप्शन ही एक सिस्टम आहे. जर आपण व्हॉट्सअॅपवर चाटिंग केली, तर ते मेसेज फक्त सेंडर आणि रिसिव्हर वाचू शकतात. एन्क्रिप्शन सिस्टमुळे कोणतीही कंपनी किंवा इतर कोणत्याही देशातील कायदा आपले मेसेज वाचू शकत नाही. प्रायव्हसीसाठी या अॅपला जगभरात पसंती दिली जात आहे. पण काही देशात या अॅपवर बंदी घातली आहे. पण जर एन्क्रिप्शन सिस्टम बंद केली, तर यूजर्सच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो.

Politico च्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, ट्रम्प प्रशासन नुकतेच या एन्क्रिप्शन सिस्टमवर चर्चा करत होते. तसेच नॅशनल सिक्युरिटी काऊन्सलिंगच्या मीटिंगमध्येही एंड टू एंड एन्क्रिप्शनवर चर्चा करण्यात आली होती.

दरम्यान, यावर अजून कोणता निर्णय घेण्यात आला नाही. सध्या एंड टू एंड एन्क्रिप्शनवर चर्चा सुरु आहे, ही सिस्टम बॅन करायची की यामध्ये बदल करायचा यावर चर्चा सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी ट्रम्प यांनी अॅपलवरही टीका केली होती.

जर एंड टू एंड एन्क्रिप्शन सिस्टम हटवण्यात आली, तर याचा फरक भारतातही पडू शकतो. व्हॉट्सअॅपचे सर्वाधिक यूजर्स भारतात आहेत आणि  व्हॉट्सअॅपही एंड टू एंड एन्क्रिप्शनचा वापर करते. व्हॉट्सअॅपमधून जर एंड टू एंड एनक्रिप्शन हटवण्यात आले, तर व्हॉट्सअॅपची ओळख संपून जाईल.

आता यावर ट्रम्प सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि टेक कंपनीही यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.