तर Animal अंगाशी येईल… पिक्चर पाहण्याची घाई असेल, तरी हे काम बिलकूल करू नका…

ॲनिमल पाहण्याची चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता असून अनेक जण वीकेंडला हा चित्रपट पाहण्याचाही प्लान आखत असतील. मात्र हा चित्रपट पाहण्याची घाई करत असाल तर तुम्हाला तुरूंगवारी घडू शकते.

तर Animal अंगाशी येईल... पिक्चर पाहण्याची घाई असेल, तरी हे काम बिलकूल करू नका...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 8:23 AM

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘ॲनिमल’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये रणबीरशिवाय अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ॲनिमल पाहण्याची चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता असून अनेक जण वीकेंडला हा चित्रपट पाहण्याचाही प्लान आखत असतील. मात्र हा चित्रपट पाहण्याची घाई करत असाल तर तुम्हाला तुरूंगवारी घडू शकते. जर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्याची तसदी घेतली नाही आणि ऑनलाईन कॉपी डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. हे नक्की काय आहे, ते जाणून घेऊया.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘ॲनिमल’ चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाची क्रेझही प्रचंड आहे. सुरुवातीचे सगळे शो देखील हाऊसफुल्ल जात आहेत. पण, जर तुम्हाला चित्रपट पाहण्याची घाई असेल आणि चित्रपटाचे तिकीट मिळत नसेल किंवा थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करायची इच्छा नसेल. किंवा या चित्रपटाची पायरेटेड कॉपी डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Animal चित्रपटाची पायरेटेड कॉपी डाउनलोड करणे तुम्हाला महागात पडू शकते. चित्रपटाचे निर्माते पायरसीवर कठोर कारवाई करू शकतात आणि त्यासाठी दंडही भरावा लागू शकतो. तसेच पायरेटेड कॉपी डाऊनलोड करताना तुम्ही एखाद्या स्कॅमलाही बळी पडू शकता.

पायरेटेड कॉपी डाउनलोड करण्याचा धोका

चित्रपटाची पायरेटेड कॉपी डाउनलोड केल्याने व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो. पायरेटेड कॉपी अनेकदा व्हायरस किंवा मालवेअरने भरलेल्या असतात. हे व्हायरस किंवा मालवेअर तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा अन्य कोणत्याही डिव्हाइसला हानी पोहोचवू शकतात. ते तुमची वैयक्तिक माहिती देखील चोरू शकतात किंवा तुमच्यया डिव्हाइसवर नियंत्रणही मिळवू शकतात.

कोणत्याही चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी अनेकदा असुरक्षित पद्धतीने बनवल्या जातात. उदाहरणार्थ, हॅकर्सद्वारे वापरलेली साधने ही चित्रपटाची पायरेटेड कॉपी तयार करण्यासाठी वापरली जातात. या टूल्स आणि पद्धतींमध्ये अनेकदा व्हायरस किंवा मालवेअर असतात.

व्हायरस किंवा मालवेअर असलेल्या पायरेटेड कॉपींचे आणखी एक कारण म्हणजे पायरेटेड कॉपी या अनेकदा अज्ञात किंवा संशयास्पद सोर्सकडून डाउनलोड केल्या जातात. यामध्ये अनेकदा व्हायरस किंवा मालवेअर असतात, जे पायरेटेड कॉपींमध्येही समाविष्ट असतात.

पायरसीच्या गुन्ह्यासाठी घडू शकते तुरूंगवारी

भारतात चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी डाऊनलोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. यासाठी त्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

ॲनिमल चित्रपटाची पायरेटेड कॉपी डाउनलोड केल्यास तुम्हाला सहन करावे लागू शकते ‘हे ‘ नुकसान

तुम्हाला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

तुमचे डिव्हाइस खराब होऊ शकते.

तुमच्या डिव्हाइसमध्ये सिस्टम क्रॅश होऊ शकते.

तुमच्या डिव्हाइसला व्हायरस किंवा मालवेअरचा धोका असू शकतो.

तुमची वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते.

म्हणून, कोणत्याही चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी डाउनलोड करणे टाळा.  चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा किंवा ऑफिशिअल स्ट्रीमिंग साईट वापरा.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.