जिओ सिम वापरणाऱ्यांसाठी आणखी एक खुशखबर
मुंबई : रिलायंस जिओच्या ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आहे. जिओ सिम वापरणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक फायदे मिळणार आहेत. जिओ युजर्सला जिओ व्हिडीओ अॅपच्या माध्यमातून 621 चॅनल मोफत पाहता येणार आहेत. ही संख्या इतर मोबाईल कंपनीच्या तुलनेत दुप्पट आहे. विशेष म्हणजे, इतर डीटीएच कंपन्यांच्या टेलिव्हीजनवर दाखवल्या जाणाऱ्या चॅनेलच्या संख्येपेक्षाही अधिक आहे. जिओचा रिचार्ज केल्यानंतर, प्ले स्टोअरवरून […]
मुंबई : रिलायंस जिओच्या ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आहे. जिओ सिम वापरणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक फायदे मिळणार आहेत. जिओ युजर्सला जिओ व्हिडीओ अॅपच्या माध्यमातून 621 चॅनल मोफत पाहता येणार आहेत. ही संख्या इतर मोबाईल कंपनीच्या तुलनेत दुप्पट आहे. विशेष म्हणजे, इतर डीटीएच कंपन्यांच्या टेलिव्हीजनवर दाखवल्या जाणाऱ्या चॅनेलच्या संख्येपेक्षाही अधिक आहे.
जिओचा रिचार्ज केल्यानंतर, प्ले स्टोअरवरून माय जिओ व्हिडीओ अॅप मोफत डाऊनलोड करता येते. हे डाऊनलोड झाल्यानंतर जिओ युजर्सला दहा-बारा नव्हे, तर तब्बल 621 चॅनल्स मोफत पाहता येणार आहेत. यामध्ये 50 अध्यात्मिक चॅनल्सचा तर 49 एज्युकेशनल चॅनल्सचा समावेश आहे. तसेच, लहान मुलांसाठी 27 किड्स चॅनल्स दाखवली आहेत. तर आठ बिझनेस चॅनल्स देखील आहेत.
हे सर्व चॅनल्स भारतातील प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या भाषांमध्ये हिंदी, इंग्रजी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी, उडीया, भोजपुरी, उर्दू आणि बंगाली यांचा समावेश आहे. यामध्ये इंग्रजी भाषेत 46 एचडी आणि हिंदीत 32 एचडी चॅनल्स आहेत.
दुसरीकडे, एअरटेलकडून (Airtel) मोबाईलवर केवळ 375 टेलिव्हीजन चॅनल्स युजर्सला दाखवली जातात. याउलट जिओ आपल्या युजर्सला 621 चॅनल्ससोबत 10 हजार चित्रपट मोफत देते. तर व्होडाफोनवर 300 चॅनल्स पाहायला मिळतील.
संबंधित बातम्या : कॉलिंग आणि नेट वर्षभर फ्री, जिओचा धमाकेदार प्लॅन