6 कलर ऑप्शन्स, 1 टीबी स्टोरेजसह Iphone 13 उद्या लाँच होणार, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि सर्वकाही
Apple iPhone 13 सीरीज लाँच होण्यास आता केवळ काही तास बाकी आहेत. कारण आयफोन प्रेमींची प्रतीक्षा 14 सप्टेंबरला संपणार आहे.
मुंबई : Apple iPhone 13 सीरीज लाँच होण्यास आता केवळ काही तास बाकी आहेत. आयफोन प्रेमींची प्रतीक्षा 14 सप्टेंबरला संपणार आहे. लाँच होण्यापूर्वी या सीरीजबद्दल नवीन खुलासे केले जात आहेत. आधी आम्ही तुम्हाला त्याच्या किंमतीबद्दल सांगितले होते, आता समजले आहे की ही स्मार्टफोन सीरीज आयफोन 12 सीरीज प्रमाणे सहा रंग पर्यायांसह लॉन्च केली जाईल. चला तर मग त्याचे डिटेल्स जाणून घेऊयात.. (Apple can launch 1TB storage models of iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max, know price, features and everything)
सहा कलर ऑप्शन्स
Apple iPhone 13 Mini स्मार्टफोन iPhone 12 Mini प्रमाणे सहा रंगांसह साद केली जाईल. कंपनी हा फोन ब्लॅक, ब्लू, पर्पल, पिंक, रेड आणि व्हाईट कलर ऑप्शनसह लॉन्च करेल. असे मानले जातेय की, हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल, त्यात 128GB आणि 256GB व्हेरिएंटचा समावेश आहे.
त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स स्मार्टफोन चार कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध होईल. ज्यात ब्लॅक, सिल्व्हर, गोल्ड आणि ब्राँज रंगाचे पर्याय समाविष्ट आहेत. आयफोन 13 प्रो स्मार्टफोन 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला जाईल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, आयफोन 13 प्रो मॅक्स हे व्हेरिएंट स्मार्टफोन 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच केलं जाऊ शकतं. काही रिपोर्ट्सनुसार हा फोन 1 टीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो.
किती असेल किंमत?
वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी आयफोन 13 प्रो मॅक्स $1,099 म्हणजेच सुमारे 80,679 रुपयांसह लॉन्च करेल. काही रिपोर्ट्सनुसार या फोनची किंमत याहून जास्त असू शकते. फोनचा पहिला सेल 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयफोन 13 प्रो मॅक्समध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत असू शकतो. त्याच्या डिस्प्लेमध्ये छोटे नॉच दिले जातील, किंवा कदाचित यामध्ये Face ID 2.0 फीचर मिळू शकते.
नेटवर्कशिवाय कॉल, मेसेज करता येणार?
Apple कंपनीने आपल्या आयफोन लाइनअपमधील आयफोन 12 मध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी ऑफर केली. याला लोकांचा भरपूर पाठिंबा मिळाला. अशा स्थितीत या वर्षीच्या आयफोनमध्ये कंपनी 5G तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढे टाकणार आहे. आयफोन 13 मध्ये नवीन सेल्युलर रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विश्लेषक मिंग ची कू के यांच्या मते, आयफोन 13 लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच LEO सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचरसह येऊ शकतो, जे फोन नेटवर्क नसतानाही आपल्याला कॉल करण्यास आणि एसएमएस पाठविण्यात मदत करेल.
कु म्हणाले की, LEO तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आयफोनमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे सेल्युलर कनेक्टिव्हिटी अपग्रेड असणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमचे डिव्हाइस सॅटेलाइट आधारित कम्युनिकेशन क्रिएट करेल. तुमचे डिव्हाइस 4G किंवा 5G नेटवर्क रेंजच्या बाहेर असतानाही हे शक्य होईल. 2019 मध्ये ब्लूमबर्गने पहिल्यांदा अहवाल दिला होता की, Apple लवकरच आयफोनमध्ये LEO उपग्रह सॅटेलाइट कम्युनिकेशन मोड वापरणार आहे.
डिस्प्लेमध्ये बदल
iPhone 13 ची एक इमेज समोर आली आहे. iPhone 13 चा डिस्प्ले नॉच पूर्वीपेक्षा लहान असेल. असंच डिझाईन iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या सर्वच स्मार्टफोन्समध्ये दिलं जाणार आहे. iPhone 13 आणि iPhone 13 Pro मध्ये 6.1 इंचांचा डिस्प्ले दिला जाईल. तर iPhone 13 Pro Max मध्ये 6.7 इंचांची स्क्रीन दिली जाऊ शकते. तसेच iPhone 13 mini स्मार्टफोन iPhone 12 mini प्रमाणे 5.4 इंचांच्या डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो.
या स्मार्टफोन्सबद्दलच्या अहवालानुसार, आयफोन 13 प्रो चा नॉच 5.35 मिमी लांबीसह दिला जाऊ शकतो, तर आयफोन 12 प्रोमध्ये हा नॉच 5.30 मिमी लांबीसह आहे. दुसरीकडे, आपण जर या फोनच्या रुंदीबद्दल बोलायचे झाल्यास या नवीन आयफोनची रुंदी 26.8 मिमी इतकी असेल, तर आधीच्या आयफोन 12 प्रोची रुंदी 34.83 मिमी इतकी होती.
इतर बातम्या
Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी
Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली
(Apple can launch 1TB storage models of iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max, know price, features and everything)