Year End Sale : अॅपलच्या प्रॉडक्ट्सवर मिळवा घसघशीत सूट; 69,900 रुपयांना मिळणार iPhone 13!

अॅपल (Apple) सेलमध्ये iPhones तसंच Apple Watch Series 7, AirPods 3, AirPods Pro, MacBook, iPads यासारख्या इतर उत्पादनांवर विशेष सवलत दिली जाणार आहे.

Year End Sale : अॅपलच्या प्रॉडक्ट्सवर मिळवा घसघशीत सूट; 69,900 रुपयांना मिळणार iPhone 13!
आयफोन-13
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 4:31 PM

मुंबई : अॅपल (Apple) उत्पादनांचे तुम्ही शौकीन असाल आणि यापैकी एक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या सेलमध्ये iPhones तसंच Apple Watch Series 7, AirPods 3, AirPods Pro, MacBook, iPads यासारख्या इतर उत्पादनांवर विशेष सवलत दिली जाणार आहे.

iPhone 13 सेलमध्ये फक्त Rs.69,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर एक्सचेंज करणार असाल तर ही किंमत अजून कमी होईल. Apple Days सेलदरम्यान iPhone 13 Mini 60,400 रुपयांना उपलब्ध आहे. iPhone 13 Proची किंमत 1,08,900 रुपयांपासून सुरू होते, iPhone 13 Pro Maxची किंमत 1,18,400 रुपयांपासून, iPhone 11ची किंमत 43,400 रुपयांपासून आणि iPhone 12ची किंमत 56,200 रुपयांपासून सुरू होते. HDFC बँकेचे ग्राहक अॅपल उत्पादनांवर 10,000 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

अॅपलची ऑफर नेमकी काय? सेलमध्ये सर्वात मोठी ऑफर iPhone 13वर दिली जातेय. सर्वात कमी किंमत 61,900 रुपयांमध्ये तो घेता येईल. आयफोन 13ची किंमत 79,900 रुपये आहे परंतु ती 75,900 रुपयांना ऑफर केला जातोय. याशिवाय, HDFC बँकेचे ग्राहक कमाल 6,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक घेऊ शकतात, ज्याची किंमत 69,900 रुपये आहे. जर तुमच्याकडे जुना चालू स्थितीतला स्मार्टफोन असेल जो तुम्हाला एक्सचेंज करायचा असेल, तर त्याचं एक्सचेंज व्हॅल्यू 5,000 रुपये मिळत आहे आणि त्यावर 3,000 रुपयांची सूट दिली जाईल, तर एकूण सूट सुमारे 18,000 रुपये होईल.

Apple Days Sale: इतर उत्पादनांवर रु. 10,000 पर्यंत कॅशबॅक इतर iPhonesवर HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी 6,000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफरदेखील आहे. iPhone 13 मिनी 6,000 रुपयांच्या कॅशबॅकसह उपलब्ध आहे, तर iPhone 12, iPhone 13 Pro आणि Pro Max 5,000 रुपयांच्या कॅशबॅकसह उपलब्ध आहेत. त्याच वेळी, iPhone 11वर 4,000 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे.

iPad 9th Gen Rs 26,600मध्ये उपलब्ध आहे ज्यात HDFC बँक 3,000च्या कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे, तर iPad Air 4th Gen Rs 46,900मध्ये Rs 4,000च्या कॅशबॅक ऑफरसह आणि iPad Pro Rs 63,500मध्ये 4,000 कॅशबॅकसह खरेदी करता येईल. सर्वात मोठी कॅशबॅक ऑफर Macवर उपलब्ध आहे. MacBook Air M1ची सर्वात कमी किंमत Rs 77,610 आहे आणि ती HDFC बँक ग्राहकांसाठी Rs 6,000 कॅशबॅकसह येते. MacBook Pro M1ची किंमत रु. 1,03,610 आणि रु. 7,000च्या कॅशबॅकसह आहे. MacBook Pro M1 Pro रु. 1,71,200मध्ये उपलब्ध आहे आणि रु. 10,000च्या मोठ्या कॅशबॅकसह येतो.

Apple Watch Series 7 देखील 36,100 रुपयांना उपलब्ध आहे, ज्यामध्ये 3,000 रुपयांच्या कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, Apple Watch SE 2,000 रुपयांच्या कॅशबॅकसह 25,900 रुपयांना उपलब्ध आहे. AirPods Pro Rs 17,990मध्ये उपलब्ध आहे आणि Rs 2,500च्या कॅशबॅक ऑफरसह येतो.

टीप – शेवटच्या वर्षामुळे, विजय सेल्सवर Apple Days ऑफर दिली जातेय. Apple Days Sale आता Vijay Sales इथे ऑनलाइन आणि स्टोअर्सवर थेट उपलब्ध आहे. हा सेल आजपासून म्हणजेच 24 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

शानदार ऑफर! 5.50 लाखांची मारुती कार अवघ्या 2 लाखात, 24KMPL मायलेज

WhatsApp News Emoji : व्हाट्सअॅपवर चॅटिंगची मजा होणार आणखी ‘रंगतदार’, इमोजीमध्ये आणणार व्हेरिएशन

Google Pay New Feature : ‘गुगल पे’मध्ये आलं नवं फिचर, आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.