ॲपलचा फोल्डेबल फोन लवकरच होणार लॉंच, सॅमसंग-व्हिवोचे वाढणार टेन्शन
सॅमसंग, विवो आणि गुगल सारख्या कंपन्यांकडे आधीच ग्राहकांसाठी फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केलेले आहेत, आता ॲपलही या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाले आहे. कारण अलीकडेच हे उघड झाले आहे की कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन आणि फोल्डेबल आयपॅड लवकरच लाँच केला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात ॲपलचा फोल्डेबल आयफोन कधी लाँच केला जाऊ शकतो?

अमेरिकेत टॅरिफमुळे iPhoneच्या किमती वाढल्याच्या रिपोर्टनुसार, ॲपल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. विश्लेषक जेफ पु यांच्या मते, ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन विकासाच्या टप्प्यात आहे आणि या फोनचे प्रोडक्शन 2026 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि हा फोन पुढील वर्षी लाँच केला जाऊ शकतो. कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये कोणते फीचर्स मिळू शकतात? ते आपण जाणून घेऊयात…
डिस्प्ले आकार
9to5Mac च्या अहवालानुसार, विश्लेषक जेफ पु यांनी त्यांच्या नवीनतम संशोधन नोटनुसार फोल्डेबल आयफोनमध्ये 7.8-इंचाचा अंतर्गत डिस्प्ले असू शकतो. केवळ फोल्डेबल आयफोनच नाही तर फोल्डेबल आयपॅड देखील लाँच होण्याची अपेक्षा आहे.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, फोल्डेबल आयपॅड 18.8-इंचाच्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी मार्चमध्ये असेही वृत्त दिले होते की, ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन 2026 मध्ये ग्राहकांसाठी लाँच केला जाऊ शकतो. या फोनची रचना सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड सीरिजसारखी असू शकते.
फोल्डेबल आयफोनची किंमत (अपेक्षित)
सॅमसंग, विवो, गुगल आणि हुआवेई सारख्या अनेक स्मार्टफोन कंपन्या आहेत ज्यांच्याकडे ग्राहकांसाठी आधीच अनेक फोल्डेबल स्मार्टफोन उपलब्ध आहेत. पण अॅपलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनमध्ये 5.5 इंचाचा कव्हर डिस्प्ले असू शकतो, तर या फोनमध्ये फेस आयडीऐवजी बाजूला टच आयडी सेन्सर देखील दिला जाऊ शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत फोल्डेबल आयफोनची सुरुवातीची किंमत $२३०० म्हणजे आपल्या भारतीय चलनानुसार सुमारे 1,98,112 रुपये इतकी असू शकते. सध्या, अॅपलचा फोल्डेबल फोन कधी लाँच होईल याबद्दल कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु पुढच्या वर्षी, फोल्डेबल आयफोन आणि आयपॅड लाँच होताच बाजारात धुमाकूळ घालतील.