iPhone चार्ज करायला किती वेळ लागतो? या नव्या फिचरमुळे पटकन समजेल…

iPhone Charging Time : तुम्ही आयफोन युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, आज आम्ही तुमच्या आयफोन चार्ज करायला किती वेळ लागू शकतो, आयफोनचा चार्जिंग टाईम कसा काढायचा, याविषयीची माहिती घेऊन आलो आहोत. एका नव्या फीचरच्या मदतीने तुम्ही आयफोन चार्ज करण्याच्या टाईम लाईनबद्दल जाणून घेऊ शकाल. यावरून आयफोन किती वेळ चार्ज होईल, याची तुम्हाला कल्पना येईल.

iPhone चार्ज करायला किती वेळ लागतो?  या नव्या फिचरमुळे पटकन समजेल...
iPhone चार्ज करायला किती वेळ लागतो?
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 8:27 AM

आयफोन किती वेळेत चार्ज होतो? हा अगदी साधा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल. याचंच उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. प्रश्न छोटा असला तरी त्याचं उत्तर आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. कारण, जास्त वेळ फोन चार्ज केल्याने त्याचे दुष्परिणाम देखील आहेतच. आज आयफोन चार्ज करण्याच्या वेळेबद्दल आणि ही वेळ मोजणाऱ्या एका फीचरबद्दल जाणून घ्या.

Apple एका फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे आयफोन किती वेळ चार्ज होईल, याची माहिती मिळेल. आपला आयफोन किती वेळ चार्ज करता येईल, हे माहिती नसल्यामुळे बऱ्याच लोकांना काळजी वाटू शकते. पण नवीन फीचरच्या मदतीने तुम्हाला बॅटरी चार्ज टाईमलाइनची माहिती मिळेल. Apple ज्या फीचरवर काम करत आहे त्याचं नाव ‘बॅटरी इंटेलिजन्स’ असं आहे.

आयफोन चार्जचा वेळ समजेल

Apple च्या अपडेटवर लक्ष ठेवणाऱ्या 9 टू 5 मॅकच्या म्हणण्यानुसार, आयओएस 18.2 बीटा व्हर्जनवर बॅटरी इंटेलिजन्स टूल रिलीज करण्यात आले आहे. हे आपल्याला आयफोन चार्ज होण्यासाठी लागणारा अंदाजित वेळ सांगेल.

‘बॅटरी इंटेलिजन्स’वर अजूनही काम सुरू आहे, त्यामुळे तो सध्या सर्वसामान्यांसाठी लॉन्च होणार नाही. यासाठी आयओएस 18.2 च्या अधिकृत रिलीजची वाट पाहावी लागणार आहे.

Apple आयफोनमध्ये काही अँड्रॉइड फोनसारखे फीचर्स आणण्याचा प्रयत्न करत असताना ‘बॅटरी इंटेलिजन्स’ हे नवे फीचर सुरू होत आहे. आयफोनमध्ये अनेक अँड्रॉइड फीचर्स पाहायला मिळतात. बऱ्याच अँड्रॉइड फोनमध्ये आधीच त्यांचा अंदाजित चार्जिंग वेळ दर्शविला जातो.

Apple बॅटरीचे लाईफ सुधारते

मार्केटमध्ये असलेल्या चार्जर, केबल्स आणि चार्जिंग प्रोटोकॉलची रेंज लक्षात घेता ‘बॅटरी इंटेलिजन्स’ हे फीचर उपयुक्त ठरले आहे. तथापि, लक्षात घ्या की ॲपलचे नवीन फीचर अद्याप त्याच्या विकासाच्या म्हणजेच डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे.

ॲडजस्टेबल चार्जिंग पर्याय

Apple सातत्याने आयफोनच्या बॅटरी लाईफच्या क्षमतेत सुधारणा करत आहे. गेल्या वर्षी टेक कंपनीने आयफोन 15 आणि नवीन मॉडेल्ससाठी ॲडजस्टेबल चार्जिंग पर्याय जोडला होता.

80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग सपोर्ट

‘बॅटरी इंटेलिजन्स’ या पर्यायामुळे Apple युजर्स आयफोनची 80 टक्के बॅटरी चार्ज करू शकतात. यामुळे बॅटरीचे लाईफ अधिक काळ टिकू शकेल. Apple ने युजर्ससाठी त्यांच्या आयफोनची बॅटरी सायकल काउंट तपासण्यासाठी एक नवीन मार्ग देखील सादर केला आहे.

‘बॅटरी इंटेलिजन्स’ या फीचरविषयी सर्व माहिती सांगितली आहे. आता तुम्ही हे फीचर आल्यावर त्याचा वापर करू शकतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.