ॲप्पलचा मॅकबुक एअर 2022 नवीन डिझाइनसह लाँच… M2 चिपसह विविध फीचर्सचा समावेश

2022 मॅकबुक एअर मोठ्या 13.6 इंचाच्या डिसप्लेसह उपलब्ध आहे. मॅकबुक एअरच्या सर्व बाजूंनी लहान बेझल्स देण्यात आले आहे. डिसप्लेवर एक नॉच आहे ज्यामुळे हे नवीन प्रोडक्ट 14 इंच मॅकबुक प्रोसारखे दिसते.

ॲप्पलचा मॅकबुक एअर 2022 नवीन डिझाइनसह लाँच... M2 चिपसह विविध फीचर्सचा समावेश
Image Credit source: aninews
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 1:18 PM

ॲप्पलने iOS 16 आणि watchOS 9 सारख्या नवीन सॉफ्टवेअर अपडेट्ससह नवीन हार्डवेअरचा समावेश करण्यासाठी WWDC 2022 वर आधारीत प्रणाली स्वीकारली आहे. ॲप्पलने नुकतेच मॅकबुक एअर 2022 नवीन डिझाइनमध्ये लाँच केले आहे. मॅकबुक एअरमध्ये (MacBook Air) आता M2 चिप देण्यात आली असून त्यासोबतच एक नॉच केलेला डिसप्ले आणि मॅगसेफ सपोर्टसह अनेक फीचर्स यात काम करणार आहेत. 2022 मॅकबुक एअर मोठ्या 13.6 इंचाच्या डिसप्लेसह उपलब्ध आहे. मॅकबुक एअरच्या सर्व बाजूंनी लहान बेझल्स (Bezels) देण्यात आले आहे. डिसप्लेवर एक नॉच आहे ज्यामुळे हे नवीन प्रोडक्ट 14 इंच मॅकबुक प्रोसारखे दिसते. नवीन एअर 11 मिमी जाड आहे आणि चार रंगांमध्ये (colours) उपलब्ध असून त्यात सिल्वर, स्पेस ग्रे, स्टारलाईट गोल्ड आणि मिडनाईट ब्लू यांचा समावेश असणार आहे.

40 टक्के अधिक कार्यक्षम

ॲप्पलचा दावा आहे, की लॅपटॉपमध्ये डिसप्लेवर 500 निट्स पीक ब्राइटनेस असून एअर देखील सायलेंट, फॅन-लेस डिझाइनसह उपलब्ध आहे. नवीन M2 चिपमुळे 2022 एअर त्याच्या आधीच्या व्हेरिएंटपेक्षा 40 टक्के चांगले काम करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. नवीन 2022 मॅकबुक एअरवरील नॉचमध्ये आता 1080p फेसटाइम एचडी वेबकॅम देखील दिला आहे. नवीन मायक्रोफोन आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टिंग स्पीकर देखील उपलब्ध आहेत.

20 मिनिटांत 80 टक्के चार्ज

नवीन मॅकबुक एअरने टच बार कायम ठेवला आहे. टच बार व्हेरिएंटची किंमत 2022 मॅकबुक एअरपेक्षा जास्त असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. नवीन मॅकबुकमध्ये एक नवीन पॉवर अॅडॉप्टर देण्यात आले असून ते फक्त 20 मिनिटांत 80 टक्के चार्ज करण्यात मदत करते. यात दोन युएसबी-सी पोर्टही उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे किंमत?

नवीन 2022 मॅकबुक एअर M2 ची किंमत 1,19,900 रुपये आणि शिक्षणासाठी 1,09,900 रुपये आहे. ॲप्पलने M2 सह नवीन 13 इंचाचा MacBook Pro देखील लाँच केला असून त्याची सुरुवातीची किंमत 1,29,900 रुपये असेल. दरम्यान ड्युअल यूएसबी-सी पोर्ट पॉवर अॅडॉप्टरची किंमत 5,800 रुपये आहे. ॲप्पल पुढील महिन्यापासून भारतात नवीन मॅकबुक एअर आणि मॅकबुक प्रो व्हेरिएंटची विक्री सुरु करेल असा अंदाज आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.