Apple : अमेरिका, चीन, भारत की जपान? कोणत्या देशात वापरला जातो सर्वाधिक आयफोन?

Apple ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. त्याची उत्पादने, विशेषतः आयफोन, जगभरात वापरली जातात. जगातील अनेक देशांमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त लोक आयफोन वापरतात. लोकसंख्येचा विचार केला तर तीन देश या बाबतीत अमेरिकेच्या पुढे आहेत.

Apple : अमेरिका, चीन, भारत की जपान? कोणत्या देशात वापरला जातो सर्वाधिक आयफोन?
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 7:22 PM

अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी ॲपलच्या आयफोनची जगभरात क्रेझ वाढत आहे. जगातील अनेक देशांमध्ये या कंपनीचे फोन सर्वाधिक वापरले जातात. भारतातही आयफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कंपनीने दिल्ली आणि मुंबईतही आपले स्टोर सुरु केले आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतात सध्या फक्त पाच टक्के लोक ॲपल वापरतात. तर अनेक देशांमध्ये अर्ध्याहून अधिक लोकसंख्येकडे आयफोन आहे. आज आम्ही तुम्हाला कोणत्या देशात सर्वाधिक आयफोन वापरले जातात ते सांगणार आहोत.

Apple ही अमेरिकन कंपनी असली तरी तिथले फक्त ५१ टक्के लोकंच आयफोन वापरतात. अमेरिकेत 27 टक्के लोक सॅमसंग फोन वापरतात तर 22 टक्के लोक इतर ब्रँडचे फोन वापरतात. आयफोनचा सर्वाधिक वारपर हा जपानमध्ये केला जातो. या बाबतीत जपान पहिल्या क्रमांकावर आहे. कारण देशातील ५९% लोकांकडे आयफोन आहे. जपानमध्ये नऊ टक्के लोक दक्षिण कोरियातील सॅमसंग कंपनीचे फोन वापरतात, तर ३२ टक्के लोकांकडे इतर कंपन्यांचे फोन आहेत. कॅनडात 56% आणि ऑस्ट्रेलियात 53% लोक आयफोन वापरतात. जरी या देशांची लोकसंख्या अमेरिकेपेक्षा खूपच कमी आहे.

भारतात फक्त ५% लोक आयफोन वापरतात तर १९% लोकांकडे सॅमसंग फोन आहेत. देशातील 76 टक्के लोक Xiaomi, Vivo आणि Oppo यांसारख्या चिनी कंपन्यांचे फोन वापरतात. चीनमध्येही 76% लोक Xiaomi, Vivo आणि Oppo चे फोन वापरतात. ब्रिटनमध्ये Apple iPhone वापरणाऱ्या लोकांची लोकसंख्या 48%, चीनमध्ये 21%, जर्मनीमध्ये 34%, फ्रान्समध्ये 35%, दक्षिण कोरियामध्ये 18%, ऑस्ट्रेलियामध्ये 53%, ब्राझीलमध्ये 16%, इटलीमध्ये 30%, रशियामध्ये 30% आहे. युनायटेड स्टेट्समध्ये 12%, मेक्सिकोमध्ये 20% आणि स्पेनमधील 29% लोकांकडे आयफोन आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.