Apple Store Delhi Opening : सर्वांसाठी उघडले ॲपल साकेत स्टोअरचे दरवाजे, टिम कूक यांच्या हस्ते उद्घाटन

Apple Saket : ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी दिल्लीत भारतातील दुसऱ्या ॲपल स्टोअरचे उद्घाटन केले. हे स्टोअर साकेत, दिल्ली येथे आहे. यापूर्वी 18 एप्रिल रोजी मुंबईत देशातील पहिले ॲपल स्टोअर सुरू करण्यात

Apple Store Delhi Opening : सर्वांसाठी उघडले ॲपल साकेत स्टोअरचे दरवाजे, टिम कूक यांच्या हस्ते उद्घाटन
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 11:36 AM

नवी दिल्ली : अखेर देशाची राजधानी दिल्लीत भारतातील दुसरे ॲपल स्टोअर सुरू झाले आहे. Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कुक (Tim Cook) यांनी साकेत, दिल्ली येथे Apple Store चे आज (20 April) उद्घाटन केले. भारतातील पहिले Apple Store मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे, ज्याचे 18 एप्रिल रोजी उद्घाटन झाले. आयफोन उत्पादक कंपनीला भारतात 25वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कंपनीने भारतात दोन ॲपल स्टोअर्स उघडली आहेत.

साकेत येथील ॲपल स्टोअर पाहण्यासाठी आज खूप गर्दी झाली होती. असेच काहीसे चित्र मुंबईतील पहिल्या ॲपल स्टोअरच्या उद्घाटनावेळी पाहायला मिळाले. एकाच वेळी दोन स्टोअर्स उघडल्याने ॲपल भारतीय ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकेल. त्याचबरोबर ग्राहकांना ॲपलची विविध उत्पादने एकाच छताखाली खरेदी करण्याची संधीही मिळणार आहे.

Apple Store Delhi चे वैशिष्ट्य

दिल्लीतील ॲपल स्टोअर खास डिझाइन केलेल्या वक्र स्टोअरफ्रंटद्वारे ग्राहकांचे स्वागत करते. ॲपलची उत्पादने आणि ॲक्सेसरीज डिस्प्ले दाखवण्यासाठी व्हाईट ओक टेबल्सचा वापर करण्यात आला आहे. तर, स्टोअर फीचर वॉल भारतात बनवण्यात आली आहे. Appleच्या सर्व सुविधांप्रमाणे, Apple Saket 100 टक्के अक्षय उर्जेवर (renewable energy) चालते आणि ते कार्बन न्यूट्रल आहे.

Apple Store Delhi चे डिझाइन

आज दिल्लीत साकेत येथील ॲपल स्टोअरच्या उद्घाटनापूर्वी टीम कुक यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. त्यांनी भारतात गुंतवणूक सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. Apple Store बद्दल बोलायचे तर त्याची रचना खूपच आकर्षक आहे. ॲपल स्टोअरला भारतीय रूप देण्यासाठी आयफोन निर्मात्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कंपनीने दिल्लीच्या अनेक प्रसिद्ध गेट्स, जागांपासून प्रेरणा घेऊन या स्टोअरची रचना केली आहे.

Apple Store Delhi मधील सुविधा

  1. ॲपल स्टोअरमध्ये ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांसाठी पिकअप स्टेशन आहे. येथून ग्राहक त्यांच्या ऑर्डरची डिलिव्हरी घेऊ शकतात.
  2. साकेत स्टोअरच्या टीममध्ये 70 हून अधिक कुशल कर्मचारी आहेत जे भारतातील 18 राज्यांमधून आले आहेत. हे कर्मचारी 15 पेक्षा जास्त भाषा बोलू शकतात.
  3. ही टीम दिल्ली आणि भारतातून आणि परदेशातून येणाऱ्या ग्राहकांना ॲपलची नवीन उत्पादने देण्यासाठी मदत करेल. याशिवाय खरेदीसाठीही मदत होईल.
  4. हँड्स-ऑन टेक्निकल आणि हार्डवेअर सपोर्टसाठी, ग्राहक जीनियस बारमध्ये रिझर्व्हेशन करू शकतात. जीनियस बार अपॉइंटमेंट डिव्हाइस सेट करणे, ॲपल आयडी पुनर्प्राप्त ( recover Apple ID) करणे, ॲपलकेअर योजना निवडणे किंवा सदस्यता बदलणे यासारख्या गोष्टींमध्ये मदत करेल.
  5. ॲपल ट्रेड इन प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना स्वस्त दरात उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल. नवीन Apple डिव्हाइस खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करू शकता.
  6. ॲपल साकेतमध्ये प्रेरणा आणि शिक्षणाची उत्तम संधी असेल. टुडे ॲट ॲपल या अंतर्गत ग्राहकांसाठी मोफत सत्र आयोजित केले जातील. यामुळे ग्राहकांची सर्जनशीलता सुधारण्यास मदत होईल.
  7.  या सत्रांचे नेतृत्व Apple Creatives करतील, जे स्वतः प्रतिभावान कलाकार आणि निर्माते आहेत. छायाचित्रण, संगीत, कला यावर आधारित वेगवेगळी सत्रे असतील.

ॲपल साकेतमध्ये होणारे ‘टुडे ॲट ॲपल’ सेशन

Skills : आयफोनसह सुरुवात करणे

Tips : iPhone वर फोटो एडिट करणे

Art Lab For Kids : आपली स्वत:ची इमोजी तयार करणे

Skills : Apple Watch पर्सनलाइज करणे

Tips : iPad वर आयडिया कॅप्चर करणे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.