Apple : iPhone वर हे कसलं विघ्न? मग फॅक्टरीतील कामकाज का थांबवलं

Apple : iPhone 15 ची क्रेझ जगभरात दिसून येत आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी प्रत्येक स्टोअरवर तुफान गर्दी केली आहे. दरम्यान एका बातमीने ग्राहकांची चिंता वाढवली आहे. दक्षिणेतील राज्य तामिळनाडूमधील आयफोन उत्पादन करणाऱ्या फॅक्टरीने या कारणामुळे कामकाज थांबवले आहे, काय आहे हे कारण, त्याचा काय होईल परिणाम

Apple : iPhone वर हे कसलं विघ्न? मग फॅक्टरीतील कामकाज का थांबवलं
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 11:16 AM

नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : दक्षिणेतील राज्य तामिळनाडूमध्ये पेगट्रॉन ही ॲप्पलच्या (Apple (AAPL.O) supplier Pegatron) उत्पादनाची सर्वात मोठी पुरवठादार कंपनी आहे. ही फॅक्टरी चेन्नईमध्ये आहे. सध्या जगभरात iPhone 15 ची क्रेझ आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी रांगाच नाही तर धक्काबुक्की केल्याच्या वार्ता आल्या आहेत. नवीन दमदार आयफोन 15 ला जगभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान पेगट्रॉनच्या प्रकल्पामधून आलेल्या एका बातमीने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. आयफोन तयार करणाऱ्या या फॅक्टरीने मंगळवारी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एका घटनेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या तैवानी कंपनीने सोमवारी काम बंदचा निर्णय घेतला होता. काय आहे घटनाक्रम..

काय घडली घटना

सोमवारी चेन्नईजवळील Pegatron फॅक्टरीत स्पार्किंगची घटना घडली. या आगीची घटना घडल्यानंतर तिच्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यात आले. जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सने याविषयीची बातमी दिली आहे. त्यानुसार, या आगीच्या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले नाही वा मोठा परिणाम झाला नाही. पण आता आगीची घटना का घडली याची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच दुरुस्ती करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

इतके होते उत्पादन

Apple साठी या फॅक्टरीत आयफोन तयार करण्यात येतो. जवळपास 26,000 आयफोन तयार करण्याची या फॅक्टरीची क्षमता आहे. पण नवीन दमदार आयफोन बाजारात आणण्यासाठी येथील उत्पादन क्षमता सातत्याने वाढविण्यात आली. या ठिकाणी सध्या 8,000-12,000 iPhones चे प्रत्येक दिवशी उत्पादन होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया देण्यास नकार

या आगीच्या घटनेबाबत Pegatron ने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर Apple ने पण मत नोंदवले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच यंत्रणा तात्काळ आग विझवण्याच्या बंबासह पोहचली. याठिकाणी पाच तास हे काम सुरु होते. या घटनेत कोणीही जखमी झाले नाहीत, तसेच मोठ्या नुकसानीचा दावा करण्यात आलेला नाही. आगीची कोणती कारणे आहेत, याची चौकशी सुरु असल्याने त्याविषयी अधिक बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. Pegatron मध्ये ॲप्पलच्या आयफोनचे 10 टक्के उत्पादन करण्यात येते.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.