iPhone 14 Max : सप्टेंबर महिन्यात लाँच होणार नवा आयफोन, जाणून घ्या किंमत !

ॲपल कंपनी यंदा iPhone 14 mini लाँच करणार नाही. त्याऐवजी कंपनी iPhone 14 Max बाजारात सादर करू शकते. लीक्स नुसार, ही नवी आयफोन सीरिज 6 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. iPhone 14 Max चे अनेक शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

iPhone 14 Max : सप्टेंबर महिन्यात लाँच होणार नवा आयफोन, जाणून घ्या किंमत !
i phone 14 maxImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 10:22 AM

ॲपल कंपनीचा (Apple company) नवा फोन लवकरच बाजारात लाँच होणार आहे. आयफोन 14 हा आयफोन 13 सारखा असू शकतो. त्याचे नाव आयफोन मॅक्स 14 (iPhone 14 Max) असून iPhone 14 mini ऐवजी हाच नवा फोन बाजारात येणार आहे. लीक्स नुसार, नवीन आयफोनच्या विशाल आकारामुळे त्याला मॅक्स (max) असे नाव देण्यात आले आहे. नवा येणारा हा आयफोन मॅक्स 14 स्मार्टफोन आयफोन 14 प्रो मॅक्स एवढा मोठा असेल. गेल्या दोन वर्षांपासून ॲपल कंपनीच्या स्मार्टफोनच्या प्रत्येक नव्या सीरिजमध्ये आयफोन मिनी व्हेरिएंटचाही समावेश असतो. मात्र आयफोन 14 या सीरिजमध्ये मिनी व्हेरिएंट नसेल. हा फोन सप्टेंबर महिन्यात बाजारात लाँच (to launch in 1st week of September) होण्याची शक्यता आहे. यावेळी पहिल्यांदाच ॲपल कंपनीच्या आयफोनचा डिस्प्ले 6.7 इंच इतका असेल.

iPhone 14 Max: संभाव्य किंमत

रिपोर्ट्सनुसार, आयफोन मॅक्स, प्रो डिझाइनमध्ये सादर करण्यात येणारा आयफोन असेल. ॲपल कंपनी, परवडणाऱ्या दरात हा फोन बाजारात सादर करणार आहे. टेक वेबसाइट एचटी टेकने दिलेल्या माहितीनुसार, आयफोन मॅक्सची संभाव्य किंमत 899 डॉलर ( अंदाजे 71,529 रुपये) पासून सुरू होऊ शकते. तर आयफोन प्रो मॅक्सच साठी 1,999 डॉलर ( सुमारे 95,400 रुपये) मोजावे लागू शकतात.

iPhone 14 Max स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स:

– ॲपल कंपनीचा हा नवा आयफोन 14 सीरीज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात लाँच होऊ शकते. आयफोन मॅक्स 14 फोनमध्ये हे संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पहायला मिळू शकतात.

हे सुद्धा वाचा

– आयफोन मॅक्स 14 चा डिस्प्ले साइज आयफोन 14 प्रो मॅक्स इतकाच असेल. युजर्सना त्यामध्ये 6.7 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले पहायला मिळेल.

– आयफोन 13 सीरिजप्रमाणे आयफोन 14 मॅक्स मध्येही नॉच डिझाइन डिस्प्ले मिळेल. लीक झालेला, i-शेप्ड पंच होल डिस्प्ले केवळ प्रो मॉडेलमध्येच असेल.

– आयफोन 14 मॅक्सम्धेय मोठ्या डिस्प्लेशिवाय इतर स्पेसिफिकेशन्स आयफोन 14 सारखीच असतील. युजर्सना या फोनमध्ये 12 मेगा पिक्सेल कॅमेऱ्यासह मागे ड्युएल कॅमेरा सेटअपही मिळेल.

– महत्वाची गोष्ट म्हणजे, आयफोन 14 सीरिजमध्ये आयफोन 13 सीरिजपेक्षा मोठा कॅमेरा सेन्सर मिळेल. याचाच अर्थ हा की, प्रकाश कमी असला तरी युझर्सना चांगला फोटो / परफॉर्मन्स मिळेल.

– हा नवा आयफोन 14, iOS 15 चिपेसट सह मिळणार आहे. ही तीच चिपसेट आहे, जी आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्समध्ये वापरण्यात आली होती. तर आयफोन 14 प्रो मॉडेल्समध्ये iOS 16 चिपसेटचा सपोर्ट मिळणार आहे.

– आधीच्या आयफोनबाबत बोलायचे झाले तर, आयफोन 13 ची बॅटरी लाइफ चांगली होती, जी दिवसभर चालायची. तर आयफोन 14 मॅक्स मध्ये आयफोन 13 पेक्षा उत्तम बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.