Baleno च्या एसयुव्ही व्हर्जनसाठी वेटिंगवर आहात? ‘या’ शहरात दिसेल पहिली झलक…
मारुती बलेनोच्या या आगामी एसयुव्ही कारमध्ये शार्प लुकिंग एलईडी हेडलाइट आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स दिसण्याची अपेक्षा आहे. मारुती ग्रँड विटारामध्ये या प्रकारचे फीचर्स देण्यात येत आहेत. त्यामुळे बलेनोतही ते बघायला मिळतील, असा अंदाज आहे.
मुंबई : मारुतीच्या (Maruti) अनेक अशा कार आहेत, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत. मारुतीच्या बहुतेक गाड्या बजेट कार व मायलेज तसेच लूकच्या बाबतीतही खास असतात. त्यामुळे ग्राहकांचा मारुतीच्या गाड्यांकडे अधिक कल दिसतो. मारुतीची अशीच एक लोकप्रिय कार बलेनो आहे. तिची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही, ती एक प्रीमियम क्लास हॅचबॅक कार आहे. परंतु आता ती एसयुव्ही (SUV) कार व्हेरिएंटमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. मारुती बलेनो क्रॉस (Baleno Cross) असे या कारचे नाव आहे. ‘गाडीवाडी’ नावाच्या वेबसाइट्सने शेअर केलेल्या रिपोर्ट्सनुसार, ही कार पहिल्यांदा दिल्ली एनसीआरमध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपो 2023 दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. या कारबाबत आतापर्यंत बरीच माहिती समोर आली आहे. नुकताच कारचा फस्ट लूकदेखील लिक झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, ही कार लाइटवेट हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे.
आकर्षक डिझाईन
सध्या या कारचे कोडनेम YTB किंवा Baleno Cross असे सांगण्यात येत आहे. इतर लीक्सनुसार, मारुती या आगामी कारच्या रुफवर कूप-प्रकाराचे डिझाइन देउ शकते. अशा प्रकारचे .डिझाईन या आधी मारुती ग्रँड विटाराला दिसून आले होते. त्याच पार्श्वभूमीवर हे डिझाईन वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
5 सीटर कार
बलेनो क्रॉस ही कार 5 सीटर कार असेल तसेच पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या 2023 ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच ग्राहकांसमोर तिची पहिली झलक दिसण्याची अपेक्षा आहे.
दमदार लूक
मारुतीच्या या अपकमिंग एसयूव्ही कारमध्ये शार्प लुकिंग एलईडी हेडलाइट आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स पाहायला मिळतील. मारुती ग्रँड विटारामध्ये हा प्रकार दिसू लागला आहे. सध्या बलेनोची विक्री Nexa शोरूममधून केली जात असली तरी बलेनो क्रॉस कोठून विकली जाईल याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.