AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातला पहिला 18GB RAM वाला स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

Asus ROG Phone 5 हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन तीन वेरिएंट्समध्ये सादर केला आहे.

जगातला पहिला 18GB RAM वाला स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त...
Asus ROG Phone 5
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 9:34 AM

मुंबई : Asus ROG Phone 5 हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन तीन वेरिएंट्समध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये ROG Phone 5, ROG Phone 5 Pro, आणि ROG Phone 5 Ultimate (Limited एडिशन) या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या तिन्ही मॉडल्समध्ये 144Hz चा सॅमसंग AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो ROG Phone 3 पेक्षा 23 टक्के अधिक ब्राईट आहे. ROG Phone 5 चे तिन्ही स्मार्टफोन्स Qualcomm Snapdragon 888 ने सुसज्ज आहेत. ROG Phone 5 मध्ये 8GB आणि 12GB RAM ऑप्शन, ROG Phone 5 Pro मध्ये 16GB RAM आणि ROG Phone 5 Ultimate मध्ये 18GB RAM देण्यात आला आहे. (Asus ROG Phone 5 With Pro and Ultimate Variants Launched with 18GB Ram in check price-feature)

भारतात Asus ROG Phone 5 च्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी आहे, 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 57,999 रुपये आहे. त्याचबरोबर, Asus ROG Phone 5 Pro च्या 16 जीबी + 512 जीबी स्टोरेज फोनची किंमत 69,999 रुपये आहे तर Asus ROG Phone 5 Ultimate च्या 18 जीबी + 512 जीबी स्टोरेज फोनची किंमत 79,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने ग्लॉसी फिनिशसह Asus ROG Phone 5 हा स्मार्टफोन फँटम ब्लॅक अँड स्टॉर्म व्हाइट कलर ऑप्शनसह बाजारात आणला आहे. त्याच वेळी फँटम ब्लॅक शेडमध्ये Asus ROG Phone 5 Pro सादर करण्यात आला आहे आणि मॅट फिनिशसह Asus ROG Phone 5 इन स्टॉर्म व्हाइट कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. तथापि, या स्मार्टफोनच्या उपलब्धतेबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

या स्मार्टफोनबरोबरच कंपनीने ROG Kunai 3 गेमपॅड, प्रोफेशनल डॉक, ROG क्लिप आणि लाइटिंग आर्मर केससुद्धा बाजारात सादर केली आहे. याव्यतिरिक्त हा फोन AeroActive Cooler 5 सोबत येतो, ज्यात दोन फिजिकल एअर ट्रिगर बटण, एक किकस्टँड आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे.

Asus ROG Phone 5 के स्पेसिफिकेशन्स

Asus ROG Phone 5 स्मार्टफोन Android 11 आधारित ROG UI आणि ZenUI कस्टम इंटरफेसवर चालतो. यात 6.78 इंचांचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे जो 20.4: 9 च्या अॅस्पेक्ट रेश्योसह येतो आणि याचा रीफ्रेश रेट 144 हर्ट्ज इतका आहे. या व्यतिरिक्त डिस्प्लेमध्ये DC Dimming सपोर्ट देण्यात आला आहे आणि तो Corning Gorilla Glass Victus ने प्रोटेक्टेड आहे.

हा स्मार्टफोन ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 एसओसी (Qualcomm Snapdragon 888 SoC) प्रोसेसरवर चालतो. हा फोन Adreno 660 GPU आणि 18 जीबी रॅमसह येतो. याशिवाय फोनमध्ये ऑल न्यू थर्मल डिझाईन देण्यात आलं आहे, ज्याला GameCool 5 म्हणतात. ROG Phone 3 प्रमाणे या फोनला AirTrigger 5, ड्युअल फ्रंट-फायरिंग स्पीकर्स, मल्टी अँटिना, वाय-फाय आणि क्वाड माइक नॉईस कॅन्सलेशन करणारे अ‍ॅरेदेखील देण्यात आले आहेत. यासह, त्यामध्ये सर्वोत्तम गेमिंग अनुभवासाठी आपल्याला एक अल्ट्रासोनिक बटण मिळेल. त्याच वेळी, ROG Phone 5 Ultimate च्या मागील कव्हरमध्ये दोन अतिरिक्त कॅपेसिटिव्ह एरियाज आढळतील.

Asus ROG Phone 5 चा कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो शूटरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याशिवाय फोनच्या फ्रंट पॅनलवर तुम्हाला 24 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. Asus ROG Phone 5 मध्ये 512 जीबी पर्यंत स्टोरेज स्पेस आहे, ही स्पेस वाढवता येऊ शकत नाही, परंतु त्यात एक्सटर्नल HDD चा सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.0, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे. त्याच वेळी, एक्सटर्नल एक्सेसरीजसाठी यात पोगो पिन कनेक्टर आहे. याशिवाय या फोनमध्ये 6,000 एमएएचची ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आली आहे.

इतर बातम्या

मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, ‘या’ दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro

Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट

Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार

(Asus ROG Phone 5 With Pro and Ultimate Variants Launched with 18GB Ram in check price-feature)

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....