Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोन घ्यायचाय?, मग अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून ऑर्डर करा, हजारो रूपये वाचवा!

अॅप्पलचा आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु आयफोनच्या किमती पाहता ते स्वप्न सर्वांचेच पूर्ण होईल असे नाही. परंतु आता तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेझॉन अन्‌ फ्लिपकार्ट तुमच्या मदतीला येणार आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती...

आयफोन घ्यायचाय?, मग अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून ऑर्डर करा, हजारो रूपये वाचवा!
अमेझॉन, आयफोन, फ्लिपकार्ट,
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 12:24 PM

मुंबई : एखादा तरी आयफोन वापरावा अशी प्रत्येकाचीच सुप्त इच्छा असतेच… परंतु आयफोनच्या किमती पाहून प्रत्येकालाच तो घेणे शक्य नसते. आता आयफोन घेण्यासाठी विविध ईएमआयची सुविधा असली तरी त्यातही खिशाला बराच भार सोसावा लागत असतो. परंतु ज्यांना आता आयफोन घ्यायचा आहेत त्यांच्यासाठी फ्लिपकार्टने (Flipkart) एक चांगली संधी दिलेली आहे. अॅप्पलचा ‘आयफोन 12’ (iPhone 12) ची सध्या किंमत फ्लिपकार्टवर 56999 रुपये इतकी आहे. तर अमेझॉनवर ती 54900 रुपये इतकी ठरविण्यात आली आहे. या किंमतीमध्ये 64 जीबी स्टोरेज आणि ब्लू व्हेरिएंटमधील आयफोन उपलब्ध आहे. हा आयफोन 12 विविध फिचर्स (Features) आणि डिझाइनसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये सुपर रेटीना एक्सडीआर डिसप्ले आणि ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा 12 मेगापिक्सल कॅमरा आहे. सोबतच यात 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरादेखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कंपनीकडून या फोनसाठी ए14 बायोनिक चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

किती आहे सूट?

या आयफोन 12 च्या किमतीमध्ये फ्लिपकार्टने तब्बल 13 टक्के सुट दिली आहे. त्यानंतर आयफोन 12 ची किंमत 65900 वरुन 56999 इतकी झाली आहे. इकॉमर्स प्लेटफार्म असलेल्या अमेझॉननेही यात त्याहून अधिक म्हणजे तब्बल 17 टक्क्यांची सूट दिली आहे. त्यामुळे आयफोन 12 ची किंमत 65900 वरुन कमी होउन 52999 इतकी झाली आहे.

आतापर्यंतच्या विविध सेलमधील हा सर्वाधिक सवलत देणारा सेल ठरत आहे. विविध कंपन्यांकडून मोबाईलच्या खरेदीवर आकर्षक सुट देण्यात येणारे सेल आयोजीत करण्यात आले आहेत.

एक्सचेंज ऑफर

दरम्यान, फ्लिपकार्टवर आयफोन 12 च्या खरेदीनंतर जुन्या स्मार्टफोनला एक्सचेंज करण्याचीही ऑफर देण्यात आली आहे. त्यावर जुन्या स्मार्टफोनवर 13 हजार रुपये अजून कमी होउ शकणार आहेत. ही किंमत मोबाईलच्या कंडिशन आणि ब्रँडवर अवलंबून राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Smartwatch : नुकतीच लाँच झालेली ‘ही’ स्मार्टवॉच पाहिलीत का? गेमींगसह विविध हेल्थ फिचर्सचा समावेश

Realme GT Neo 3 5G : Realme GT Neo 3 लाँच होण्यापूर्वीच सेल डेट रिविल, मिळेल 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट

Xiaomi 12 Pro : ‘या’ तारखेला भारतात लॉन्च होणार Xiaomi 12 Pro 5G, जाणून घ्या काय आहे खास या स्मार्टस्मार्टफोनमध्ये

'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.