Baby Shark Doo Doo | तब्बल 10 बिलियन Views घेणारा पहिला YouTube Video, असं काय ग्रेट आहे काय व्हिडीओत?

You Tube : हे गाणं पाहण्यासाठी बाळ असायला हवं असा काही नियम नाहीच! पण बाळ असेल, तर हे गाणं किती मौल्यवान आहे, याची जाणीव लगेचच होऊन जाईल. तर अशा या जादुई गाण्यानं एक मैलाचा दगड युट्युबवर पार केला आहे.

Baby Shark Doo Doo | तब्बल 10 बिलियन Views घेणारा पहिला YouTube Video, असं काय ग्रेट आहे काय व्हिडीओत?
Source : YouTube व्हिडीओतील Screenshot
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 4:57 PM

तुमच्याकडे जर लहान बाळ असेल आणि तुम्ही त्याला तुम्ही ‘बेबी शार्क डू डू..’ हे गाणं दाखवलेलं नसेल, असं होणं 99.99 टक्के अशक्य गोष्ट आहे. बेबी शार्क डू डू सुरु झालं, की लहान मुलांचं रडगाणं थांबलंच समजा! बेबी शार्क डू डू (Baby Shark Dance), ही एक जादुई गोष्ट आहे, यावर आता लाखो लोकांचा विश्वास बसला आहे. हे गाणं दाखवून कितीतरी लहान मुलांना त्यांच्या आईनं जेवणाचे खास भरवले असतील. कितीतरी मुलं ही गाणी ऐकता ऐकता निवांत झोपून गेली असतील. कितीतरी मुलांना त्यांचे आईवडील या गाण्यात गुंगवून, मुलांचा डोळा चुकवत ऑफिसला निघून गेले असतील. असा एकापेक्षा एक आठवणी या गाण्यानं दिलेल्या आहेत. पण ज्यांना हे गाणं माहीत नाही, त्यांच्यासाठी या गाण्याचं महत्त्व जाणून घेणंही तितकच इंटरेस्टिंग असणार आहे. अर्थात हे गाणं पाहण्यासाठी बाळ असायला हवं असा काही नियम नाहीच! पण बाळ असेल, तर हे गाणं किती मौल्यवान आहे, याची जाणीव लगेचच होऊन जाईल. तर अशा या जादुई गाण्यानं एक भलामोठा टप्पा युट्युबवर पार केला आहे. तब्बल 10 मिलियन व्हूज घेणारा हा युट्युबवरील पहिला व्हिडीओ (You Tube Video) बनलाय. हा एक भारी रेकॉर्ड असून याआधी असा रेकॉर्ड युट्युबवर दुसऱ्या कुणालाच करायला जमलं नव्हतं.

तर रेकॉर्डबद्दल थोडंस!

बेबी शार्क डू डू.. या गाण्याचा काही एकच व्हिडीओ युट्युबवर नाही. असे अनेक व्हिडीओ युट्युबवर आहेत. त्यातले अनेक व्हिडीओ हे मिलियनमध्ये व्हूज असलेले आहेत. अशातच ज्या बेबी शार्क डू डूचा व्हिडीओ एक दोन बिलियन नव्हे तर चक्क 10 बिलियन व्हूज देऊन गेला आहे, तो अपलोड केलाय Pinkfong Baby Shark – Kids’ Songs & Stories या युट्युब चॅनेलनं. या चॅनेलला 54.8 मिलियन सबस्क्राईबर्स या चॅनेलला असून आता पर्यंत तब्बल 32 मिलियन लोकांनी गाणं लाईक केलं आहे.

आई शार्क, पप्पा शार्क, आजी, शार्क, सगळे शार्क असणाऱ्या या व्हिडीओमध्ये काही ग्रेट लॉजिकची गोष्ट तुम्ही शोधत असाल, तर तुम्ही चुकताय! या गाण्यात लॉजिकचं काही नाही. गाणं लहान मुलांना आपलंसं वाटतंय, इतकीच एक थोर आणि भारी गोष्ट या गाण्यात आहेत. लहान मुलांसाठीच हे खास गाणं साकारण्यात आलं आहे.

दोन मिनिटं सोळा सेकंदाचा हा व्हिडीओ 18 जून 2016 रोजी अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल 10,007,738,348 इतके Views मिळाले असून, तुम्ही चेक पर्यंत या व्हिडीओनं हा आकडा आणखी वाढलेला असणार आहे. आतापर्यंत हिट्सचे नवनवे रेकॉर्ड करणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडीओंच्या तुलनेत बेबी शार्क डू डू या व्हिडीओनं सगळ्यांचा पछाडलंय. भलेही हे गाणं इंग्रजीत असेल. पण भारतासह जगभरातल्या सगळ्यांच भाषेतील मुलांना या व्हिडीओनं भुरळ पाडली असल्याचं, या व्हिडीओला मिळत असलेल्या व्हिडीओ Views वरुन दिसून आलंय.

पाहा व्हिडीओ-

संबंधित बातम्या :

यूट्यूब शॉर्ट्समधून कमावण्याची संधी, दरमहा 10 हजार डॉलर्सची होऊ शकते कमाई

YouTube लोगोऐवजी 1 लाख कोटी हा आकडा दिसतोय? जाणून घ्या त्यामागचं कारण

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.