तुमचं कार खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार, 5,00,000 च्या कार लोनवर भरा एवढा EMI
तुम्हीही बँकेकडून कार लोन घेऊन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा बँकेकडून कार लोन घ्यावे जिथे तुम्हाला अत्यंत कमी व्याजदराने कर्ज मिळते. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या कार लोनबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

स्वत:ची गाडी विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं, पण सामान्य माणसाला स्वत:ची गाडी विकत घेणं ही सोपी गोष्ट नाही. एका मध्यमवर्गीय व्यक्तीच्या वर्षानुवर्ष मिळणाऱ्या कमाईएवढी कार खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज असते. अनेक जण बँकेकडून कार लोन घेऊन कार खरेदी करतात आणि दरमहा EMI च्या माध्यमातून कारची रक्कम फेडतात.
तुम्हीही बँकेकडून कार लोन घेऊन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा बँकेकडून कार लोन घ्यावे जिथे तुम्हाला अत्यंत कमी व्याजदराने कर्ज मिळते. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या कार लोनबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
बँक ऑफ बडोदा कार लोन
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना अतिशय चांगल्या व्याजदराने कार लोन देते. बँक ऑफ बडोदा कार कर्जाचे व्याजदर 8.80 टक्क्यांपासून सुरू होतात. या व्याजदराने कर्ज हवे असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असावा. त्याचबरोबर तुमच्या सिबिल स्कोअरच्या आधारे व्याजदर बदलू शकतात.
BOB कडून 5 लाख कार लोनचा मासिक EMI
तुम्ही BOB कडून 5 वर्षांसाठी 5 लाखांचे कार लोन घेत असाल आणि तुम्हाला हे लोन 9 टक्के व्याजदराने मिळत असेल तर तुम्हाला दरमहा 10,379 रुपये EMI म्हणून भरावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही हे लोन 7 वर्षांसाठी घेत असाल तर तुम्हाला दरमहा 8,045 रुपये EMI म्हणून भरावे लागतील.
कार लोनपूर्वी ‘हे’ सूत्र समजून घ्या
20/4/10 फॉर्म्युल्यानुसार कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला तीन गोष्टी माहित असणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये कार लोनचा ईएमआय, कार लोनचा कालावधी आणि कार लोनच्या डाउन पेमेंटचा समावेश आहे.
20/4/10 फॉर्म्युल्यात 20 म्हणजे 20 टक्के डाउन पेमेंट. कार लोन घेताना 20 टक्के डाउन पेमेंट करावे लागते.
20/4/10 फॉर्म्युल्यात 4 म्हणजे 4 वर्षांचा कालावधी. म्हणजेच कार लोनचा कालावधी 4 वर्षांपेक्षा जास्त वाढवू नये.
20/4/10 फॉर्म्युल्यात 10 म्हणजे तुमच्या पगाराच्या 10 टक्के. तुमच्या कर्जाचा मासिक ईएमआय तुमच्या पगाराच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.
आम्ही तुम्हाला20/4/10 फॉर्म्युल्याची सविस्तर माहिती दिली आहे. आता तुम्ही कधीही तुमच्या बजेटनुसार कार घेऊ शकता. तुमचं नुकसान टळू शकेल.