वीज गेली, CCTV कॅमेरा बंद, तरीही चोरांना पकडणं होईल सोपं, फक्त करा ‘हा’ जुगाड

CCTV Camera System: सीसीटीव्ही कॅमेरा बंद झाला किंवा लाईट गेली तरी चोरटे कॅमेऱ्यात कैद होतील. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लाईट गेली किंवा सीसीटीव्ही कॅमेरा बंद झाला तरी तुमचं घर आणि दुकान सुरक्षित राहिल, असा पर्याय बाजारात आहे. याविषयी जाणून घ्या.

वीज गेली, CCTV कॅमेरा बंद, तरीही चोरांना पकडणं होईल सोपं, फक्त करा 'हा' जुगाड
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 8:25 AM

हल्ली प्रत्येकजण बिल्डींग, घर किंवा दुकानातही सीसीटीव्ही बसवतात. पण लाईट गेली किंवा कॅमेरा बंद पडला आणि त्याचवेळी जर चोर आले तर काय होईल, याचा कधी विचार केलात का? कितीही महागडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. आता आम्ही यावर काही पर्याय शोधले आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरा हा आपल्या घराच्या आणि दुकानाच्या सुरक्षिततेसाठी असतो. सीसीटीव्ही कॅमेरा बंद केल्यास फुटेज रेकॉर्ड होणार नाही. अशावेळी एखादा चोर येऊन चोरी करत असेल तर चोरट्यांचा शोध घेणे अवघड होऊ शकते. पण एक पर्याय आहे, त्यानुसार तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा शटडाऊन किंवा वीज नसल्याच्या टेन्शनपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते.

कॅमेरा बंद पडल्यास काय करायचे?

घर असो, दुकान असो किंवा कार्यालय, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर आता सामान्य झाला आहे. पण वीज गेली किंवा सीसीटीव्ही कॅमेरा बंद पडला तर काय करायचे? आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, वीज गेली किंवा सीसीटीव्ही कॅमेरा बंद झाला तरी तुमचं घर आणि दुकान सुरक्षित राहिल असा पर्याय बाजारात आहे. बॅटरीवर चालणारा सीसीटीव्ही कॅमेरा हा पर्याय तुमच्यासमोर आहे.

बॅटरीवर चालणारा सीसीटीव्ही कॅमेरा हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. याचा उपयोग कठीण परिस्थितीत चोरट्यांचा शोध घेण्यासाठी होऊ शकतो. बॅटरीवर चालणारे कॅमेरे वायरलेस असतात. हे कॅमेरे लाईटशिवाय काम करतात. हे सहज बसवता येतात. चला तर मग जाणून घेऊया बॅटरीवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेत कशी मदत करतात, याची माहिती जाणून घेऊया.

‘या’ कॅमेऱ्यांना लाईटची गरज नाही

बॅटरीवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे सामान्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणेच काम असतात. पण त्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यांना लाईटची अजिबात गरज भासत नाही. हे कॅमेरे बॅटरीवर चालतात. जर तुमच्या भागात लाईटची समस्या असेल तर तुम्ही हे कॅमेरे नक्कीच बसवू शकता. याचा तुम्हाला निश्चित उपयोग होऊ शकतो.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बॅटरी

या कॅमेऱ्यांची बॅटरी काही महिने टिकते. बॅटरीवर चालणाऱ्या काही कॅमेरा सिस्टीममध्ये चार्ज करण्याचा पर्याय असतो, तर काहींमध्ये बॅटरी बदलली जाते. आपण किती वेळ कॅमेरा वापरता, यावर हे अवलंबून असते.

वायरलेस रेकॉर्डिंग आणि स्टोरेज

हे कॅमेरे Wi-Fi द्वारे कनेक्ट होतात. त्यामुळे व्हिडीओ रेकॉर्डिंग स्टोअर करण्यासाठी वेगळ्या डिव्हाईसची आवश्यकता नसते. आपण त्यांना क्लाउडवर देखील संग्रहित करू शकता. जर तुम्हाला फुटेज स्थानिक पातळीवर साठवायचे असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग मायक्रो एसडी कार्डवर सेव्ह करू शकता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.