Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन एसयुव्ही खरेदी करताय? मग ‘या’ तीन अपकमिंग मॉडेल्सवर एक नजर टाकाच…

एसयुव्ही कारमध्ये केवळ ग्राउंड क्लिअरन्स मिळत नाही तर, ड्रायव्हरला चांगला व्युइंग एक्सपिरियंसदेखील मिळतो. सोबत यात देण्यात आलेल्या टायरमुळे छोट्या-मोठ्या खड्ड्यांचा पत्तादेखील लागत नाही. एसयुव्ही कारच्या सुरक्षेतही चांगले बदल करण्यात आलेले आहेत.

नवीन एसयुव्ही खरेदी करताय? मग ‘या’ तीन अपकमिंग मॉडेल्सवर एक नजर टाकाच...
महिंद्रा स्कॉर्पिओImage Credit source: Mahindra
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 7:25 PM

मुंबई : भारतीय ऑटोमोबाइल (Indian Automobile) क्षेत्रात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एसयव्ही (SUV) कारच्या लोकप्रियतेमध्ये अधिकच भर पडत असल्याचे दिसून येत आहे. अशात जर तुम्हीदेखील नवीन एसयुव्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एसयुव्ही कारच्या बाबतीत सांगणार आहोत, ज्या अनेक चांगले फीचर्स, (Features) डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्ससह बाजारात दाखल होणार आहेत. एसयुव्ही कारमध्ये केवळ ग्राउंड क्लिअरन्स मिळत नाही तर, ड्रायव्हरला चांगला व्युइंग एक्सपिरियंसदेखील मिळतो. सोबत यात देण्यात आलेल्या टायरमुळे छोट्या-मोठ्या खड्ड्यांचा पत्तादेखील लागत नाही. एसयुव्ही कारच्या सुरक्षेतही चांगले बदल करण्यात आलेले आहेत. पावसाळ्यामध्येही या सेगमेंटमधील कार्स चांगली कामगिरी करीत असल्याचे सिध्द झाले आहे.

महिंद्रा स्कोर्पियो एन

महिंद्रा स्कोर्पियो कार भारतीय कार बाजारातील एक लोकप्रिय व चांगली मागणी असलेली कार आहे. या कारमध्ये अनेक चांगले फीचर्स व दमदार लूक देण्यात आला आहे. या वेळी कंपनीने केवळ डिझाइनला धरुन बदल केलेले नाहीत तर, चांगले इंटीरियर देखील देण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन स्कोर्पियोचे नाव एन असणार आहे. ऑनलाइन जगतामध्ये या कारबद्दल अनेक माहिती समोर आली आहे. आणि या कारचे कोडनेम १०१ सांगण्यात येत आहे. दरम्यान, सध्याचे मॉडेलदेखील विक्री केले जाणार असून नवीन मॉडललाही सेल करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. अपकमिंग एसयुव्ही कार सहा स्पीड मॅन्यूअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटीक ट्रांसमिशनसह उपलब्ध होणार आहे.

मारुती सुझुकी विटारा ब्रेझा

मारुतीच्या या अपकमिंग एसयुव्ही कारला अधिक आकर्षित बनविण्यासाठी फ्रंट आणि रियर पॅनलला आकर्षक डिझाइन करण्यात आली आहे. केवळ बाहेरच्या बाजून कॉस्मेटीग बदल करण्यात आले नसून केबिनला देखील अधिक चांगले आकर्षक बनविण्यात आले आहे. ही कार भारतामध्ये या महिन्यात ३० जूनपर्यंत दाखल होइल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोबतच यामध्ये क्रूज कंट्रोल, ३६० डिग्री कॅमेरा आदी गोष्टी देखील देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

ह्युंदाई वेन्यू

ह्युंदाइ वेन्यूच्या लाँचिंगनंतर या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता वेन्यूला कॉम्पॅक्ट एसयुव्हीच्या रुपामध्ये ग्राहकांपुढे सादर करण्यात येणार आहे. ही नवीन कार १६ जूननंतर मार्केटमध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरियन कार निर्माता कंपनी असलेली ह्युंदाइ या मॉडेलमध्ये या आधी अनेक बदल केले आहेत. अपकमिंग कारमध्ये नवीन हेडलॅंप, व्हील्स, रियर प्रोफाइल आणि अनेक बदल आढळतील.

LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार.