मोबाईलच्या मार्केटमध्ये सॅमसंगने (Samsung) आपले स्थान अतिशय पक्के केले आहे. सॅमसंग हा भारतातील टॉप ब्रँडपैकी एक आहे, सॅमसंगचे एक वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन ग्राहकांच्या गरजा ओळखून नवीन फोन्सची निर्मिती करीत असतो. अगदी बजेट फोनपासून ते एक्सपेन्सिव्ह स्मार्टफोन (Smartphone) बनविण्यात सॅमसंगचा हातखंडा मानला जातो. त्यामुळे स्पर्धेच्या काळातही सॅमसंगने आपली लोकप्रियता शाबूत ठेवली आहे. सॅमसंग झेड आणि सॅमसंग एस सीरिजअंतर्गत हाय एंड फ्लॅगशिप फोनदेखील (Flagship phones) प्रचंड लोकप्रिय आहेत. आता, अमेझॉन सॅमसंग समर सेलमध्ये सॅमसंग फोन्सवर मोठ्या सवलती देण्यात येत आहे.
Samsung Galaxy M12 आणि Samsung Galaxy M32 5G या स्मार्टफोनलाही चांगली ऑफर देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5G तसेच Samsung Galaxy S21 5G आणि Samsung Galaxy Z Flip सारखे फ्लॅगशिप स्मार्टफोन अमेझॉनच्या समर सेलमध्ये मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. काही फोन्सवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. या लेखातून सॅमसंगच्या कोणत्या स्मार्टफोनवर किती ऑफर देण्यात आली आहे याची माहिती आपण घेणार आहोत…
या स्मार्टफोनची किमत 32,999 रुपये असून ऑफरनुसार त्याची किंमत 26,499 ठेवण्यात आली असून यात तुम्ही तब्बल 6,500 रुपयांची बचत करु शकणार आहात. सॅमसंग गॅलेक्सी M53 5G ॲमेझॉन समर सेल 2022 दरम्यान 20 टक्के सवलतीत उपलब्ध आहे.
हा फोन तुम्हाला सॅमसंग समर सेलवर 28 टक्के सवलतीसह उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 24,999 असून ऑफवर हा फोन 17,999 ला उपलब्ध आहे. यात तुम्ही जवळपास 7 हजारांची सुट मिळवू शकतात.
या फोनची किंमत 12,999 रुपये असून ऑफरवर तुम्हाला 9,999 रुपयांना मिळू शकतो. त्यावर 3 हजारांच्या सवलतींसह 23 टक्के सवलत मिळवू शकतात.
सॅमसंगच्या या मोबाईलची मूळ किंमत 36,999 असून 30 टक्के सवलतीसह हा फोन तुम्ही केवळ 25,999 रुपयांना मिळवू शकतात यात तुम्ही चक्क 11,000 बचत करु शकतात.
ॲमेझॉन समर सेलमध्ये या फोनवर 26 टक्के सवलत देण्यात आली आहे. या मोबाईलची मूळ किंमत 16,999 आहे. सवलतीच्या दरात हा फोन तुम्हाला केवळ 12,499 रुपयांमध्ये मिळू शकतो. या फोनमागे तुम्ही 4,500 रुपयांची बचत करू शकतात.
या स्मार्टफोनवर ॲमेझॉनकडून मेगा ऑफर देण्यात आली आहे. या स्मार्टफोनवर तब्बल 53 टक्के सूट देण्यात आलेली आहे. या फोनची मुळ किंमत 74,999 इतकी असून तो तुम्ही सवलतीच्या दरात केवळ 34,990 रुपयांना खरेदी करू शकणार आहात. या फोनवर तुम्ही भरघोस अशी 40,009 रुपयांची बचत करू शकणार आहात.
या स्मार्टफोनची मुळ किंमत 23,999 रुपये आहे. ऑफरमध्ये हा फोन 20,999 रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर तुम्ही 13 टक्के सवलतीसह तीन हजार रुपयांची बचत करू शकणार आहात.
40,999 रुपयांचा हा फोन तुम्ही केवळ 32,499 रुपयांना खरेदी करू शकणार आहात. यात तुम्हाला 21 टक्क्यांची सूट मिळत असून 8,500 रुपयांची बचत होणार आहे.
83,999 रुपये मुळ किंमत असलेला हा फोन तुम्ही 55,949 रुपयांना खरेदी करू शकणार आहात. या फोनवर 33 टक्क्यांची सूट असून तुम्ही 28,050 रुपयांची बचत करू शकतात.
हा सर्वाधिक महागडा फोन असून याची किंमत 99,999 रुपये आहे. ऑफरअंतर्गत हा मोबाईल तुम्ही 88,999 रुपयांना खरेदी करू शकतात. यावर तुम्ही 11 टक्के सवलत मिळवून 11 हजार रुपयांची बचत करू शकणार आहात.