Blackberry युजर्ससाठी वाईट बातमी! 4 जानेवारीपासून तुमचे मोबाईल वापरता येणार नाहीत, आत्ताच बॅकअप घ्या

Blackberry हा एक असा ब्रँड ज्याची एके काळी Apple iPhone सारखीच लोकप्रियता होती, त्यावेळच्या स्मार्टफोन्सपैकी सर्वात जास्त मागणी असणारा हा ब्रँड होता. ब्लॅकबेरी कंपनी त्यांच्या एन्क्रिप्शनसाठी ओळखली जात होती आणि जवळजवळ एक दशकापूर्वी सुरक्षेच्या प्रति जागरूक असणाऱ्या युजर्ससाठी किंवा हाय प्रोफाइल युजर्ससाठी Blackberry चे मोबाईल सर्वात पसंतीचे होते.

Blackberry युजर्ससाठी वाईट बातमी! 4 जानेवारीपासून तुमचे मोबाईल वापरता येणार नाहीत, आत्ताच बॅकअप घ्या
Blackberry Phones
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 5:43 PM

मुंबई : ब्लॅकबेरी (BlackBerry) हा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडपैकी एक आहे. कंपनीने त्यांचे लोकप्रिय QWERTY कीपॅड-BlackBerry OS फोन बनवणे काही वर्षांपूर्वी बंद केले, परंतु डिव्हाइसला सॉफ्टवेअर सपोर्ट होता. तथापि, 2022 च्या सुरूवातीस, ब्लॅकबेरी त्याच्या स्मार्टफोनसाठी सपोर्ट थांबवत आहे. ब्लॅकबेरीने गुरुवारी जाहीर केले की, ते सर्व क्लासिक ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 सपोर्टेड स्मार्टफोनचा सपोर्ट बंद करणार आहेत. जे ग्राहक अजूनही त्याच सॉफ्टवेअरवर सुरु असलेले फोन वापरत आहेत त्यांना कंपनीने सांगितले आहे की, ते काही दिवसांपासून सेल्युलर आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीवर दिलेल्या जाणाऱ्या सेवांना सपोर्ट करु शकणार नाहीत. (BlackBerry OS Phones to Stop Working from January 4)

याचा अर्थ असा की कॉल, सेल्युलर डेटा, एसएमएस आणि इमरजन्सी कॉल यांसारखी बेसिक कामं तुम्ही आता ब्लॅकबेरी फोनवरुन करु शकणार नाही. येथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की या बदलामुळे अँड्रॉइडवर चालणाऱ्या ब्लॅकबेरी स्मार्टफोन्सवर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनी 4 जानेवारी 2022 रोजी अधिकृतपणे BlackBerry OS आणि BlackBerry 10 वर चालणाऱ्या स्मार्टफोन्सचा सपोर्ट बंद करणार आहे.

4 जानेवारीपासून ब्लॅकबेरी फोन चालणार नाहीत

“रिमाइंडर म्हणून, BlackBerry 7.1 OS आणि पूर्वीचे BlackBerry 10 सॉफ्टवेअर, BlackBerry PlayBook OS 2.1 आणि पूर्वीच्या व्हर्जनसाठी लेगसी सेवा 4 जानेवारी 2022 नंतर उपलब्ध होणार नाहीत. 4 जानेवारीपासून या परंपरागत सेवा आणि वर नमूद केलेल्या सॉफ्टवेअर वर चालणारे डिव्हाईसेस यापुढे डेटा, फोन कॉल, एसएमएस करण्यासाठी सक्षम नसतील.

तथापि, फेब्रुवारी 2020 मध्ये, TCL ने जाहीर केले की ते यापुढे ब्लॅकबेरी फोनचे उत्पादन करणार नाही. कंपनीचा शेवटचा फोन BlackBerry KEY2 LE हा लॉन्च झाला होता. 2020 मध्ये, टेक्सास-आधारित स्टार्टअप OnwardMobility ने 2021 मध्ये 5G ब्लॅकबेरी फोन लॉन्च करण्यासाठी एक टीझर जारी केला होता. मात्र हे मॉडेल अद्याप समोर आलेले नाही.

ब्लॅकबेरी स्मार्टफोन युजर्सना डेटाचा बॅकअप घेण्याचा सल्ला

वर नमूद केलेल्या सॉफ्टवेअरवर चालणारे ब्लॅकबेरी फोन अजूनही ज्या युजर्सकडे असतील, त्यांना आम्ही हाच सल्ला देऊ की, त्यांनी 4 जानेवारी आधीच त्यांच्या फोनमधील डेटाचा बॅक घेऊन ठेवावा. जेणेकरुन हा फोन बंद पडल्यानंतर तुम्हाला डेटा लॉससारख्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही. Blackberry हा एक असा ब्रँड ज्याची एके काळी Apple iPhone सारखीच लोकप्रियता होती, त्यावेळच्या स्मार्टफोन्सपैकी सर्वात जास्त मागणी असणारा हा ब्रँड होता. ब्लॅकबेरी कंपनी त्यांच्या एन्क्रिप्शनसाठी ओळखली जात होती आणि जवळजवळ एक दशकापूर्वी सुरक्षेच्या प्रति जागरूक असणाऱ्या युजर्ससाठी किंवा हाय प्रोफाइल युजर्ससाठी Blackberry चे मोबाईल सर्वात पसंतीचे होते.

इतर बातम्या

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…

फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज

(BlackBerry OS Phones to Stop Working from January 4)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.