AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSNL 5G : मोठी अपडेट, आता बीएसएनएलची 5G इंटरनेट सेवा; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली ही महत्वाची माहिती

BSNL 5G Service : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज पॅकमध्ये वाढ केल्याने देशभरात ग्राहकांनी रोष व्यक्त केला. त्यानाराजीने लाखो ग्राहकांनी बीएसएनएलकडे मोर्चा वळवला आहे. आता ग्राहकांसाठी सरकारने आनंदवार्ता आणली आहे. BSNL 5G Service लवकरच सुरु होईल.

BSNL 5G : मोठी अपडेट, आता बीएसएनएलची 5G इंटरनेट सेवा; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली ही महत्वाची माहिती
BSNL 5G Internet Service
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 10:47 AM

खासगी दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले. त्या नाराजीतून ग्राहकांनी धडाधड सिम पोर्ट सुरु करत निषेध नोंदवला. गेल्या दहा दिवसांत बीएसएनएल कंपनीकडे सर्वाधिक सिम पोर्ट करण्यात आल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले. आता ग्राहकांना अजून एक आनंदवार्ता मिळाली आहे. BSNL 5G ची सेवेची ग्राहकांना मोठी प्रतिक्षा आहे. बीएसएनएल लवकरच 5G सेवा सुरू करणार आहे. काय आहे अपडेट?

काय आहे आनंदवार्ता

हे सुद्धा वाचा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक महत्वपूर्ण अपडेट दिली आहे. BSNL 5G ची त्यांनी स्वतः चाचणी केली आहे. बीएसएनएलची 5G सेवा लवकरच सुरु होणार आहे. कंपनीला त्यात यश मिळाले आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्समध्ये (C-DOT) ही चाचणी झाली. त्यावेळी शिंदे पण उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी व्हिडिओ कॉल केला आणि BSNL च्या 5G सेवेची चाचणी केली. यावेळी त्यांनी बीएसएनएलच्या 5जी नेटवर्कची क्षमता जोखली.

चाचणीला यश

ही चाचणी यशस्वी झाल्याने आता लवकरच BSNL 5G नेटवर्क सुरु होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे बीएसएनएलकडे मोठ्या प्रमाणावर ग्राहक येण्याची शक्यता आहे. सध्या जिओ, व्होडाफोन-आयडिया, एअरटेलच्या अनेक ग्राहकांनी बीएसएनएलकडे मोर्चा वळवला आहे. 5G नेटवर्क सुरु झाल्यास ग्राहकांचा बीएसएनएलकडे ओढा वाढेल. टेक तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी जलद 5जी इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्याची वकिली केली आहे.

5G सोबतच 6G च्या चर्चेला जोर

5G ची सेवा सुरु होण्याची प्रतिक्षा असतानाच आता 6G च्या चर्चेला जोर चढला आहे. 6G सेवेसाठी पण चाचपणी सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. 6G तंत्रज्ञानावर पण केंद्र सरकारने काम सुरु केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी याविषयीची माहिती दिली. आता तंत्रज्ञानाता बीएसएनएल मागे राहून चालणार नाही. जगभरात 6G तंत्रज्ञान विकसीत होत असताना आपण मागे राहून चालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 5G सोबतच 6G च्या चर्चेला जोर चढला आहे.

संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....